मुंबई, 4 नोव्हेंबर : महागाई आणि वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे मिळणाऱ्या पगारात कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी बहुतांश जणांना तारेवरची कसरत करावी लागते. खर्च भागवण्यात अडचणी येत असल्याने कर्जाचा बोजाही वाढताना दिसतो. ही समस्या सोडवण्याकरिता काही जण ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र अभ्यासकांचा सल्ला घेतात. आर्थिक समस्या कमी होण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय केले असता आर्थिक समस्या दूर होतात. तसंच घरात पैशाची आवक वाढते, असं जाणकार सांगतात. लक्ष्मीमातेला धनदेवता मानलं जातं. लक्ष्मी मातेची आराधना केल्यास आर्थिक समस्या दूर होतात, असं मानलं जातं. याशिवाय कुबेर आणि शुक्र ग्रहामुळेदेखील सुख-समृद्धी, धनलाभ होतो. धनप्राप्तीसाठी शुक्रवारी काही उपाय केल्यास निश्चित फलदायी ठरतो. तसंच नियमित दानधर्म केल्यास पैशांची कमतरता भासत नाही. शुक्रवारी गरजू, गरीब व्यक्तींना मिठाई आणि कपडे दान करावेत. या दिवशी पाण्यात थोडं दूध घालून चंद्राला अर्घ्य द्यावं. अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी प्रार्थना करावी. शुक्रवारी सात्त्विकता ठेवावी. यामुळे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. संपत्ती मिळावी यासाठी शुक्रवारी लक्ष्मीमातेला गुलाबी फूल वाहावं. त्यानंतर तुपाचा दिवा लावून लक्ष्मीमातेची आरती करावी. या दिवशी लहान मुलींना पांढरी मिठाई दान करावी. यामुळे वडिलोपार्जित संपत्ती मिळते.
Vastu Tips : हे 7 सोपे वास्तू उपाय करा; कर्जातून व्हाल मुक्त आणि हातात टिकेल पैसानोकरीत उत्पन्न वाढावं यासाठी शुक्रवारी पिंपळाच्या झाडाखाली मिठाई आणि पाणी ठेवावं. त्यानंतर झाडाला तीन प्रदक्षिणा घालाव्यात. त्यानंतर नोकरीत प्रगती होण्यासाठी प्रार्थना करावी. शक्य असल्यास पिंपळाचं झाड लावावे. यामुळे नोकरीतल्या पैशासंबंधीच्या समस्या दूर होतील. व्यवसायात धनप्राप्तीसाठी शुक्रवारी गुलाबी फुलावर अर्थात कमळात बसलेल्या लक्ष्मीमातेचा फोटो लावावा. त्यानंतर लक्ष्मीमातेला गुलाबाचं अत्तर अर्पण करावं. हे अत्तर रोज लावून कामाला जावं. यामुळे व्यवसायासंबंधी समस्या दूर होतील. व्यापारी वर्गाने गुलाबाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मीमातेचा फोटो आपल्या दुकानात किंवा कार्यस्थळी लावावा. कर्जाशी निगडित समस्या भेडसावत असतील, तर शुक्रवारी कडुनिंबाची एक फांदी घरी घेऊन यावी. ती पाण्याने स्वच्छ करावी. त्यानंतर काचेच्या भांड्यात मीठ घातलेल्या पाण्यात ती ठेवावी. यामुळे कर्जाशी निगडित समस्या दूर होतील. `शुक्रवारी लक्ष्मीमातेची विशेष पूजा, आराधना केली, तर आर्थिक समस्या निश्चित दूर होतात. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारते,` असं जाणकारांनी सांगितलं.