मुंबई, 30 डिसेंबर : घरात सुख-समृद्धी, आरोग्य आणि पैसा टिकावा असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी अनेक लोक वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचा सल्लादेखील घेतात. घरात सुख-समृद्धी, आरोग्य आणि पैसा टिकावा यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले गेले आहेत. हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळस ही लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं. रोज तुळशीपूजन केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात, असं जाणकार सांगतात. वास्तुशास्त्रात घराच्या दारात तुळस लावण्याचे काही नियम सांगितले गेले आहेत. या नियमांचं पालन केलं तर लक्ष्मीमातेची कृपादृष्टी प्राप्त होते, असं वास्तुशास्त्र अभ्यासकांचं मत आहे. वास्तुशास्त्रानुसार तुळशी संदर्भात नियमांबाबत सविस्तर जाणून घेऊया. `दैनिक जागरण`ने या विषयीची माहिती दिली आहे. वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक वस्तू योग्य दिशेला ठेवावी. वस्तू ठेवण्याची दिशा चुकली तर त्यामुळे सकारात्मकऐवजी नकारात्मक परिणाम दिसू लागतात. हिंदू धर्मात तुळस पूजनीय मानली जाते. भगवान विष्णू आणि लक्ष्मीमातेची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी नियमित तुळशीचे पूजन करावे, असं धर्मशास्त्र सांगतं. मात्र तुळस लावण्याचे आणि ठेवण्याचे काही नियम वास्तुशास्त्रात सांगितले आहेत. ज्या ठिकाणी तुळशीचं रोप ठेवलं आहे, त्या ठिकाणी काही वस्तू कदापि ठेवू नयेत. तुळशी जवळ काही वस्तू ठेवल्यातर धनहानी होण्याची शक्यता असते. हेही वाचा - पुत्रदा एकादशीला वाचावी/ऐकावी ही व्रत कथा; विष्णूच्या कृपेने होईल अपत्यप्राप्ती वास्तुशास्त्रानुसार, तुळशीजवळ कोणतंही काटेरी रोप ठेवू नये. तुळशीजवळ कॅक्टस अर्थात निवडुंग ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येते. जर तुम्ही तुळशीजवळ कॅक्टस लावलं असेल तर ते तातडीने काढून टाकावं. तुळशीजवळ कॅक्टस असेल तर घरात अशांतता राहते. त्याचप्रमाणे तुळशीच्या रोपाजवळ झाडू, केरसुणी ठेवू नये. तुळशीच्या रोपाला चुकूनही कधी झाडू लागू नये. तुळस पवित्र मानली जाते. त्यामुळे केर-कचऱ्याशी संबंधित वस्तू तुळशीच्या रोपाजवळ कदापि ठेवू नयेत.
तुळशीच्या रोपाजवळ चुकूनही चपला-बूट ठेवू नयेत. यामुळे तुळशीचा अपमान होतो. जर असं केलं तर घरातील सुख-समृद्धी, समाधान नष्ट होते आणि धनहानी होते. तसेच आर्थिक समस्या निर्माण होतात. ज्या ठिकाणी तुळशीचे रोप लावले किंवा ठेवले असेल, त्याठिकाणी अस्वच्छता नसावी. तुळशीच्या रोपाजवळ नेहमी स्वच्छता ठेवावी. घरातील कचरा तुळशीपासून दूर ठेवावा, असं वास्तुशास्त्राच्या जाणकारांचं मत आहे. हिंदू धर्मानुसार, तुळशीला रोप जल अर्पण करावं, तुळशीची पूजा करावी. यामुळे घरात लक्ष्मी मातेचा वास राहतो. धनलाभ होतो. घरामध्ये सुख-समृद्धी राहते. मात्र तुळशीची पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.