Love आणि Sex : मुलींना आपण प्रेमाबद्दल काय शिकवतो?

Love आणि Sex : मुलींना आपण प्रेमाबद्दल काय शिकवतो?

भारतातील अनेक तरुण मुली एकतर चित्रपटांतून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून रिलेशनशिपबाबत शिकतात. त्यांना मुलांशी बोलण्याची परवानगी नसते, परिणामी पुरुषांशी त्यांचा संपर्क बिलकुल येत नाही. त्यामुळे जेव्हा अखेर त्या रिलेशनशिपमध्ये येतात तेव्हा नेमकी पुरुषाकडून काय अपेक्षा ठेवावी याची साधी कल्पनाही त्यांना नसते.

  • Share this:

कीर्तनाचं (नाव बदललेलं) पहिलं लग्न झालं, तेव्हा लग्नानंतर आपल्याला काय हवं? आपल्या जोडीदाराकडून कसली अपेक्षा ठेवावी हेदेखील तिला माहिती नव्हतं. तिला याबाबत माहिती तरी कशी असेल, कारण तामिळनाडूतल्या अशा एका छोट्याशा गावात ती लहानाची मोठी झाली, जिथं मुलींना मुलांसोबत बोलण्यास मनाई होती. कधीच कोणत्या पुरुषाशी न बोलणारी कीर्तना अचानकपणे आठवड्याचे 7 दिवस 24 तास एका पुरुषासोबत राहू लागली. लहान असताना तिनं फक्त आपल्या आई आणि वडीलांचं नातं पाहिलं होते.

“माझे आईबाबा एकमेकांशी क्वचितच बोलायचे. आई घरीच असायची, गृहिणी होती, स्वयंपाक करायची आणि माझे वडील कामावर जायचे”

काही काळाने कीर्तनाच्या आईने शिक्षिका म्हणून नोकरी सुरू केली, मात्र महिलांनी काम करावं, हे तिच्या वडीलांना काही रूचलं नाही, त्यांना कीर्तनाच्या आईचं नोकरी करणं न आवडल्याने त्यांनी तिला नोकरी सोडायला लावली. त्यामुळे लग्नानंतर जेव्हा कीर्तनाच्या पतीने तिला नोकरीवर जाण्यापासून रोखलं तेव्हा कीर्तनाने ते सहजपणे स्वीकार केलं, तिला हे अगदी सामान्य वाटलं.

भारतातील अनेक तरुण मुली एकतर चित्रपटांतून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून रिलेशनशिपबाबत शिकतात. त्यांना मुलांशी बोलण्याची परवानगी नसते, परिणामी पुरुषांशी त्यांचा संपर्क बिलकुल येत नाही. त्यामुळे जेव्हा अखेर त्या रिलेशनशिपमध्ये येतात तेव्हा नेमकी पुरुषाकडून काय अपेक्षा ठेवावी याची साधी कल्पनाही त्यांना नसते. कीर्तनाचं म्हणायचं तर तिचा पती शांत आणि थोडा दूरच राहणारा होता. (distant). बहुतेक अरेंज मॅरेज (arranged marriages) प्रमाणे त्यांच्या रिलेशनशिपमध्येही कुठेच प्रेम नव्हतं. दिवसभर घरी राहून, फक्त स्वयंपाक करून कीर्तनाला कंटाळा येत असला, तरी दुसऱ्या कोणत्या पर्यायची अपेक्षाही तिला नव्हती.

“माझं लग्नानंतर जे आयुष्य आहे, तसंच माझ्या पालकांनाही जगताना मी पाहिलं आहे. त्यामुळे माझा पती माझ्यावर प्रेम दाखवत नसला आणि मी फक्त घरीच राहावं अशी त्याची अपेक्षा असेल, तरी ते मला सामान्य वाटायचं”

अनेक व्यक्तींना रिलेशनशिपमध्ये आपल्याला नेमकं काय हवं हे माहिती नसतं, तेव्हा तो मार्ग जेंडरच्या माध्यमातून सहजरित्या निवडला जातो. म्हणजे पुरुष काम करणार आणि महिला घराकडे लक्ष देणार. यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याचं अद्वितीय सामर्थ्य (unique strengths) आणि टॅलेन्ट (talent) गवसत नाहीत. आज जग बदललं आहे. बेस्ट शेफचा विचार करायचा झाल्यास त्यामध्ये अनेक पुरुष आहेत आणि यशस्वी सीईओचा विचार करायचा झाल्यास त्यात अनेक महिला आहेत.

त्यामुळे आजच्या महिलांना रिलेशनशिपमध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे हे समजण्यासाठी जेंडरच्या माध्यमाची गरज नाही.

रिलेशनशिपमध्ये गुंतण्यापूर्वी तरुण मुलींनी आपलं परिपूर्ण असं व्यक्तिमत्व बनवायला हवं. जर महिलांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा, सामर्थ्य आणि मतं पूर्णपणे समजली तर त्यांच्या व्यक्तिमत्वाशी मिळतंजुळतं असं रिलेशनशिप शोधण्याचा त्या प्रयत्न करतील. मात्र भारतात जेव्हा कीर्तनासारख्या अनेक महिलांचं कॉलेज पूर्ण होताच लग्न होतं तेव्हा हे सर्व कठीणच आहे.

नव्या जीवनशैलीशी जुळवून घेण्यासाठी कीर्तना खूप प्रयत्न करत होती, मात्र कठीण होतं. फक्त घरात राहणं तिला आवडत नव्हतं. आपल्या मॅनेजमेंट डिग्रीचा आपल्याला काही उपयोग करता येत नाही, याचंही तिला वाईट वाटत होतं. काही वर्षांनंतर तिनं अखेर स्वत: निर्णय घेतला, पतीला तिनं घटस्फोट दिला. तिच्या या निर्णयाने तिच्या कुटुंबाला धक्काच बसला. मात्र तरीही ती खचली नाही, ताठ मानेनं उभी राहिली. तिला लगेचच जॉब मिळाला. लग्न झाल्यानंतरही तरुण महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायला हवं, यासाठी तिनं इतर महिलांना प्रोत्साहित केलं.

“आपल्या स्वत:च्या कमाईचे पैसे असणं किती चांगलं असतं. यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळतो, तुम्ही अभिमानी होता.” आजच्या घडीला महिलांनी हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. अधिकाधिक महिला लग्नानंतरही जॉब करतात आणि पैसे कमावतात. ज्यामुळे त्यांच्या आयुष्याला एक ध्येय, स्वातंत्र्य आणि सुरक्षा मिळते.

कीर्तना आज दुसरं लग्न करून आपला पती आणि मुलीसह आनंदाने आयुष्य जगते आहे. तिच्या कामावरील एका सहकाऱ्यासोबतच तिनं लग्न केलं. ज्या कंपनीत कीर्तनाची तिच्या पतीशी ओळख झाली, त्याच कंपनीत कीर्तना उच्च स्तरीय व्यवस्थापकपदी आहे. कीर्तनाला स्वत:मधील कलागुण आणि कौशल्यांना वाव देता येतो आहे,  तर दुसरीकडे तिचा पती आता पार्टटाईम नोकरी करतो आणि उरलेल्या वेळात मूलं आणि घरदाराकडे लक्ष देतो. जेंडर रोल (gender roles) पासून दूर गेल्याने दोघांचंही आयुष्य उत्तम सुरू आहे.

कीर्तना म्हणते, "मला काम करायला खूप आवडतं. माझ्या नव्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे आम्ही दोघंही एकमेकांशी मोकळेपणाने बोलतो”

फक्त पुरुषांनी निर्णय घ्यावेत, असं गृहित धरलं जात असल्याने भारतातील बहुतेक महिलांना आपल्या जोडीदाराशी संवाद साधावा हे शिकवलं जात नाही. मात्र हे एकविसावं शकत आहे आणि महिलांनाही रिलेशपमध्ये समान संधी मिळणं भाग आहे. याची महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे तुमच्या गरजा, इच्छा आणि मर्यादा मोकळेपणाने आणि स्पष्टपणाने मांडणं. प्रत्येकवेळी हे सोपं असेलच असं नाही. काही वेळा तडजोडही करावी लागेल, मात्र हादेखील रिलेशनशिपचाच एक भाग आहे.

लग्न हे बंधन नाही तर सकारात्मक गोष्ट आहे हे सर्व तरुण मुलींनी जाणून घ्यावं, असं कीर्तनाला वाटतं.

"महिलांनी काळजी आणि समानता याची अपेक्षा ठेवावी. तुम्ही तुमच्या पतीपेक्षा जास्त कमवत आहात, यात काहीच हरकत नाही. महिला काम करू शकतात आणि मग त्यांच्यामागे घरी पुरुष मुलांना सांभाळू शकतात. पती-पत्नी मुलांसमोर आपलं एकमेकांवरील प्रेम व्यक्त करू शकतात. आपल्याला नियमांमध्ये अडकून राहण्याची गरज नाही. जोडीदाराचं एकमेकांवरील प्रेम आणि एकमेकांप्रती असलेला आदर सर्वात महत्त्वाचा आहे"

लेखिका – अनघा

Redwomb मध्ये इंटर्न म्हणून काम करते. Redwomb हे सेक्सबाबत लोकांना माहिती देणारं ऑनलाईन व्यासपीठ आहे.

First published: February 6, 2020, 10:34 PM IST

ताज्या बातम्या