जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / किचनमधील या 5 गोष्टी आहेत नॅचरल पेन किलर, काही मिनिटातच मिळेल वेदनेपासून आराम

किचनमधील या 5 गोष्टी आहेत नॅचरल पेन किलर, काही मिनिटातच मिळेल वेदनेपासून आराम

किचनमधील या 5 गोष्टी आहेत नॅचरल पेन किलर,  काही मिनिटातच मिळेल वेदनेपासून आराम

किचनमधील या 5 गोष्टी आहेत नॅचरल पेन किलर, काही मिनिटातच मिळेल वेदनेपासून आराम

आपल्या किचनमध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या विविध आजार बरे करण्यासाठी किंवा त्यांची दाहकता कमी करण्यासाठी लाभदायक ठरू शकतात. तेव्हा आपल्या किचनमध्ये असलेल्या अशा गोष्टीं विषयी जाणून घेऊयात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 26 मे : एखाद्या किरकोळ आरोग्यविषयक समस्येसाठी औषधांच्या तुलनेत नैसर्गिक गोष्टींचा वापर केला तर फारसे दुष्परिणाम जाणवत नाहीत. तसंच या गोष्टी अनेक प्रकारे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करू शकतात. आपल्या किचनमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वेदनाशामक म्हणजेच पेनकिलर  म्हणून काम करू शकतात. या गोष्टींचा वापर निसर्गोपचारात वर्षानुवर्षे होत आहे. या गोष्टींचा वापर करण्याचा मुख्य फायदा असा की, यामुळे लिव्हर, किडनी आणि आतड्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या आणि वेदना कमी करू शकणाऱ्या या गोष्टींविषयी जाणून घेऊयात. बर्फ : प्रत्येक घरात फ्रीजमध्ये बर्फ उपलब्ध असतो. बर्फात अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे बर्फाचा वापर कोणत्याही प्रकारची वेदना आणि सूज कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. जर तुमचे स्नायू, लिगामेंट्स दुखत असतील किंवा त्याला सूज आली असेल, दुखापत झाल्यानंतर 48 तासांच्या आत 20 मिनिटांच्या अंतराने आईस पॅक किंवा बर्फ एखाद्या कापडात गुंडाळून त्याने शेकावे. यामुळे वेदना आणि सूज कमी होते. गरम पाणी :  तीव्र वेदना असल्यास गरम पाण्याने शेकणं फायदेशीर ठरतं. यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो. पौष्टिक घटकांचा प्रवाह सुरू होतो. यामुळे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते आणि वेदना कमी होतात. दुखापत झाली असेल तर गरम पाण्यात एक सुती कापड भिजवावं आणि पिळून घ्यावं. त्यानंतर या कापडाने वेदना होत असलेल्या भागावर शेक द्यावा. दुखापत झाल्यानंतर दर दोन तासांनी 15 मिनिटे गरम पाण्याने शेकल्यास आराम मिळतो.

    News18लोकमत
    News18लोकमत

    हळद : हळदीत अँटिइन्फ्लेमेशन गुणधर्म असतात. यामुळे सूज आणि वेदना कमी होतात. वेदना जाणवत असेल तर एक कप गरम दुधात एक चमचा हळद टाकून दूध प्यावं. जर तुम्ही रोज रात्री हळद दूध घेतलं तर वेदनांपासून मुक्ती मिळेल. तसेच दूध-हळदीचा लेप तयार करून तोदेखील तुम्ही वापरू शकता. आलं : आलं हे नैसर्गिक वेदनाशामक आहे. यात अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. व्यायामासारख्या गोष्टींमुळे स्नायू दुखत असतील तर आलं त्यावर परिणामकारक ठरते. तुम्ही चहात आलं टाकून तो पिऊ शकता. अन्न पदार्थात मसाला म्हणून त्याचा वापर करू शकता. लवंग : नैसर्गिक अ‍ॅनेस्थेटिक गुणधर्म असलेला पदार्थ आहे. यामध्ये सुन्न करणारा गुणधर्म आहे. यामुळे दातदुखी कमी होते. आर्थराटिक इन्फ्लेमेशन कमी होण्यास मदत होते. जर कधी दात दुखत असेल तर एक लवंग चघळावी. जर स्नायू दुखत असतील तर त्यावर लवंग तेल लावल्यास लवकर आराम पडतो. दातांच्या समस्येवर लवंग गुणकारी मानली जाते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात