मुंबई, 11 नोव्हेंबर : सगळ्यात प्राचीन धर्म असा हिंदू धर्माचा उल्लेख आढळतो. हिंदू धर्मात देव, देवपूजा, धार्मिक विधी यांना विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार तेहतीस कोटी देव आहेत असं मानलं गेलं आहे. त्यापैकी श्रीहरि विष्णुला तुळस अत्यंत प्रिय आहे असं म्हणतात. तुळशीमध्ये औषधी गुणधर्मही खूप आहेत. प्रत्येक हिंदू घराच्या मुख्य दारासमोर तुळशीचं छोटेसं रोप लावलेलं असतं. त्याची नियमित पूजाही केली जाते. परंतु, ज्या घरात सतत कलह, भांडणं, अशांतता असते, त्या घरांत लक्ष्मी राहत नाही. परिणामी, वाईट किंवा दूषित वास्तुत तुळस वारंवार कोमेजते किंवा खुरटते. वास्तूतील वातावरणाचा झाडांवर गंभीर परिणाम होतो. जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती. ‘प्रभात खबर’ने याबद्दलची माहिती देणारं वृत्त दिलं आहे. तुळस ही सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानली जाते. ज्या घरात तुळस आहे तिथे लक्ष्मीचाही वास असतो. कारण, तुळस ही श्रीहरिला प्रिय आहे. इतकंच नाही तर आयुर्वेदाच्या दृष्टिने तुळशीला खूप महत्त्व आहे. अनेकदा सर्दी, खोकला यावर तुळशीचा काढा उपकारक ठरतो. तसंच शरीरातील उष्णतेचं प्रमाण वाढल्यास तुळशीचं बी घेणं हितावह ठरतं. परंतु, ज्या वास्तुत गृहकलह आहेत किंवा जी वास्तू काही कारणाने दूषित आहे. अशा ठिकाणी, तुळशीची वाढ खुंटते. परिणामी, तुळशीचं रोप कोमेजतं. हेही वाचा - थंडीच्या मोसमात ‘खा’ हे पदार्थ तुळशीचं रोपटं कशामुळे कोमेजतं? अनेकदा जेव्हा आपण घरातील कुंडीत तुळस लावतो, तेव्हा त्याची खूप काळजी घेतो. त्याला नियमितपणे पाणी घालतो. सूर्यप्रकाश उत्तम मिळेल अशा ठिकाणीच ती ठेवली जाते. खेडेगावातील प्रत्येक अंगणात तुळशी वृंदावन हे असतंच. परंतु, सगळ्या गोष्टी अनुकूल असूनही तुळशीच्या रोपट्याची वाढ खुंटते. कालांतराने, ते कोमेजतं आणि निर्जीव होतं. ही गोष्ट तुमच्या निदर्शनास आली असेल, तर तुमच्यावर किंवा कुटुंबावर कुठलंतरी संकट येणार आहे असा त्याचा अर्थ आहे असं हिंदू धर्मशास्त्रात म्हटलं आहे. तसंच शास्त्रात असं म्हटलं आहे की, ही संकटापूर्वीची चाहूल आहे. यामुळे हळूहळू घरातून लक्ष्मी निघून जाते. धनहानी होण्याचेच हे संकेत मिळतात. परिणामी, घरात दारिद्र्य येण्याची दाट शक्यता असते. आपल्यावर कुठलंही संकट येऊ नये, प्रगतीच्या मार्गात अडथळे येऊ नयेत, आरोग्य उत्तम राहावं यासाठी देवपूजा, नामस्मरण केलं जातं. तसंच शास्त्रांत तुळशी पूजनाचं ही महत्त्व सांगितलं आहे. तुळशीची नियमित पूजा केल्यास वास्तुतील वाईट शक्तींचा बिमोड होतो. जाणून घेऊयात तुळशी पूजनाचे काही फायदे :- · शास्त्रानुसार, तुळशी वृंदावनाजवळ बसून कुठलंही स्तोत्र, जप केल्यास मिळणारं फळ हे अनंतपटीनं वाढतं. · तुळशी पूजनाने भूत, प्रेत, पिशाच्च, ब्रह्मराक्षस आणि दैत्य आपल्यापासून दूर राहतात. · तुळशी पूजनाने वाईट किंवा नकारात्मक विचारांचा नाश होतो. · पद्म पुराणानुसार, तुळशी पानवरून येणारं पाणी आपल्या डोक्यावर पडल्यास गंगास्नानाचं आणि 10 गायींचं दान केल्याचं फळ मिळतं. · तुळशी पूजनामुळे सगळ्या रोगांचा नायनाट होतो आणि उत्तम आरोग्य लाभतं. · तुळशी पूजन, तुळशीचं रोप लावल्याने सगळी पापं नाहीशी होतात. · तुळशी पूजनाने स्वर्ग आणि मोक्षाचं दार उघडतं. · श्राद्ध आणि यज्ञ करताना तुळस वापरल्याने पदरी महापुण्य पडतं. · तुळशीचं केवळ नाव घेऊन पुण्याची प्राप्ती होते. सगळी पापं धुतली जातात.
तुळशीचं रोप घरात लावणं हे सुख, समृद्धी आणि उत्तम आयुरारोग्यची नांदीच ठरते. परंतु, तुळस आणि त्याच्यातील बहुगुणी तत्त्वांविषयी आपल्याला पुरेशी माहिती नसते. यासाठी तुळशीचं रोप हे प्रत्येकाने घरी लावावं. नुकतीच अनेकांच्या घरी तुलसी विवाह सोहळा झाला असेल. त्याच तुळशीचं हे महत्त्व आपल्याला माहीत नसतं, ते सांगण्याचा हा प्रयत्न.