Home /News /lifestyle /

11 हजार वोल्टचा करंट लागल्यानंतरही बचावला पण...; मृत्यूच्या दारातून परत आल्यानंतरची अवस्था पाहूनच हादराल

11 हजार वोल्टचा करंट लागल्यानंतरही बचावला पण...; मृत्यूच्या दारातून परत आल्यानंतरची अवस्था पाहूनच हादराल

11 हजार वोल्टचा करंट लागल्यानंतर याआधी कुणी वाचल्याचं कधीच पाहिलं नसल्याचं सांगत ही व्यक्ती नशीबवान असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

    लंडन, 13 मे : एखाद्याला विजेचा शॉक लागला की त्याचं वाचणं अशक्यच. काही लोकांचा तर जागच्या जागीच मृत्यू होता. पण एका व्यक्तीने मात्र सर्वांनाच धक्का दिला आहे. तब्बल 11 हजार वोल्टचा करंट लागल्यानंतरही ही व्यक्ती बचावली आहे. मृत्यूच्या दारातून ही व्यक्ती परत आली खरी. पण त्यानंतर त्या व्यक्तीची जी अवस्था झाली ती पाहून तुम्ही हादराल (Man got 11000 volt electric shock dead for few minutes). यूकेच्या मॅनचेस्टरमध्ये राहणारा 29 वर्षांना डॅरेन हॅरिस ( (Darren Harris) 2020 साली त्याच्यासोबत भयंकर दुर्घटना घडली. विजेच्या झटक्यामुळे तो मृत्यूच्या दारात पोहोचला होता (Man got 11000 volt electric shock survived). डेली स्टारच्या रिपोर्टनुसार डॅरेन वोलव्हरहॅम्प्टन एका बंद पडलेल्या स्टील प्लांटमध्ये अर्बन एक्सप्लोरिंग करायला गेला होता. अर्बन एक्सप्लोरिंग म्हणजे अशा बंद किंवा पडीक ठिकाणी एखाद्या गोष्टीचा शोध घ्यायला जाणं.  डॅरेन ज्या बिल्डिंगमध्ये गेला होता ती कोसळण्याच्या स्थितीत होती. त्यामुळे तिथे वीज नसावी असं त्याला वाटलं. त्यामुळे त्याने नकळतपणे एका विजेच्या तारेला स्पर्श केला. तेव्हा त्याला 11 हजार व्होल्टचा शॉक लागला. विजेचा धक्का बसताच तो खूप दूरवर फेकला गेला आणि जवळजवळ त्याचा मृत्यूच झाला होता. हे वाचा - जिवंतपणी नरकयातना! कोरोना रुग्णासोबत भयंकर कृत्य; संतापजनक VIDEO समोर डॅरेनने सांगितल्यानुसार काही क्षण तो मृतावस्थेतच होता. अचानक तो शुद्धीवर आला पण त्याच्या शरीराभोवती आगीचा विळखा होता. त्याला आपल्या हात आणि मानेच्या आतील हाडही दिसत होता. चेहरा भाजून गळल्यासारखा झाला होता. त्याचं शरीर म्हणजे आगीचा गोळा झाला होता. त्याच अवस्थेत तो तिथून बाहेर पडला. धावत रस्त्यावर आला. तिथून एक अॅम्ब्युलन्स जाताना दिसली आणि त्या अॅम्ब्लुलन्ससमोरच तो आडवा पडला. त्यानंतर त्याला शुद्ध आली ती रुग्णालयात. 27 दिवसांनंतर त्याचे डोळे उघडले. त्याला बर्मिंघमच्या क्विन एलिझाबेथ रुग्णालयात दाथल करण्यात आलं होतं. तिथं तो इंड्युस्ड कोमात होता. इंड्युस्ड कोमा म्हणजे औषधं देऊन कोमात टाकणं. त्याच्या शरीराचे कित्येक अवयव फेल होऊ लागले. डॉक्टरांनी त्याच्या तब्बल 23 सर्जरी केल्या. आर्टिफिशिअल स्किनला त्याच्या इतर त्वचेशी जोडलं. पण या प्रक्रियेत त्याचं नाक आणि कान कापावं लागलं. हे वाचा - Shocking! जोशाजोशात गेला जीव; बाथरूममध्ये शारीरिक संबंधादरम्यान महिलेचा मृत्यू डॉक्टर्सनी डॅरनसा नशीबवान म्हटलं आहे. कारण अशा स्थितीत याआधी कुणी वाचल्याचं त्यांनी कधीच पाहिलं नाही. डॅरेन बरेच कालावधी डिप्रेशनमध्ये राहिला. त्याने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. पण आता तो स्वतःला स्वीकारत आहे. आता 3डी प्रिटिंग तंत्रज्ञानामार्फत तो आपले कान पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी त्याने क्राऊड फंडिंगचीही मदत घेतली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Surgery, Uk, World news

    पुढील बातम्या