जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Travelling Tips : Long drive ला जाण्याआधी या गोष्टी केल्यात का तपासा; नाहीतर अडचणीचा ठरेल प्रवास

Travelling Tips : Long drive ला जाण्याआधी या गोष्टी केल्यात का तपासा; नाहीतर अडचणीचा ठरेल प्रवास

Travelling Tips : Long drive ला जाण्याआधी या गोष्टी केल्यात का तपासा; नाहीतर अडचणीचा ठरेल प्रवास

Travel Hacks For Long Trips: अनेकदा लांबच्या प्रवासाला जाण्याच्या उत्साहात (Excitement) लोक काही गोष्टींचा विचार करायला विसरतात. त्‍यामुळे आपल्या प्रवासाचा आनंद खराब होऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : लाँग ड्राईव्हवर (Long drive) जाणं हा अनेकांचा छंद असतो. दुसरीकडे, ज्यांना प्रवास करायला (Travelling) आवडतो त्यांच्यासाठी लाँग ड्राईव्ह एखाद्या एडवेंचरपेक्षा कमी नसतं. पण अनेकदा लांबच्या प्रवासाला जाण्याच्या उत्साहात (Excitement) लोक काही गोष्टींचा विचार करायला विसरतात. त्‍यामुळे आपल्या प्रवासाचा आनंद खराब होऊ शकतो. खरं तर लाँग ड्राईव्हवर जाणं हे अनेकांचे स्वप्न असतं. त्याच वेळी, काही लोक प्रवासाच्या नियोजनात इतके व्यग्र होतात की ते खाण्यापासून आरोग्यापर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच आज आपण लाँग ड्राईव्हच्या काही टिप्स जाणून घेणार आहोत, त्यामुळे आपण प्रवास सुरक्षित करू शकतो आणि प्रवासाचा पुरेपूर आनंद (Travel Hacks For Long Trips) घेऊ शकतो. नीट झोप बहुतेक लोक लाँग ड्राईव्हबद्दल इतके उत्साही असतात की, निघण्यापूर्वी पुरेशी झोप घेणं विसरतात. एका सर्वेक्षणानुसार, 60 टक्क्यांहून अधिक ड्रायव्हर्स लाँग ड्राइव्हवर असताना पेंगतात किंवा त्यांना झोप लागते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. म्हणूनच प्रवासाला जाण्यापूर्वी 7-8 तास पुरेशी झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. आहाराची विशेष काळजी घ्या लाँग ड्राईव्ह दरम्यान तळलेले किंवा जंक फूड खाणं टाळा. शक्य असल्यास आपल्यासोबत निरोगी अन्न पदार्थ घ्या. तसेच, गाजर आणि बदाम यासारख्या गोष्टी तुम्हाला प्रवासात तुमची एनर्जी लेव्हल राखून सतर्क राहण्यास मदत करतील. पाणी सोबत ठेवा लाँग ड्राईव्हला जात असाल तर प्रवासाच्या अंतरानुसार पाण्याच्या बाटल्या सोबत घ्यायला विसरू नका. ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही आणि तुम्ही निस्तेज होण्याऐवजी उत्साही व्हाल आणि प्रवासाचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल. थांबणं आवश्यक आहे प्रवासादरम्यान सतत ड्रायव्हिंग टाळा आणि दर 2-3 तासांनी एक छोटा ब्रेक घ्या, यामुळे तुम्हाला आरामही मिळेल. काही वेळ बाहेर जाऊन बॉडी स्ट्रेच करायला विसरू नका. हे वाचा -  ठोस किमतीला शेतकऱ्यांकडून शेणाची खरेदी करून मिथेन गॅसची निर्मिती; या सरकारचा मोठा निर्णय च्युइंगम चघळणे अनेक संशोधनांनुसार, च्युइंगम मेंदूला सक्रिय आणि सतर्क ठेवतं. त्यामुळे प्रवासादरम्यान थोडा वेळ च्युइंगम चघळत राहा. यामुळे तुम्हाला झोप येणार नाही आणि तुम्हाला खूप थंड वाटेल. गाडी चालवताना सरळ बसा जर तुम्ही सहलीवर गाडी चालवत असाल तर तुमच्या शरीराच्या स्थितीकडे नक्कीच लक्ष द्या. गाडी चालवताना सरळ बसण्याचा प्रयत्न करा आणि काही वेळा दीर्घ श्वास घ्या. याच्या मदतीने तुम्ही स्नायू दुखणे टाळू शकाल. हे वाचा -  Hibiscus Oil : घनदाट-काळ्या केसांसाठी जास्वंदीचं तेल वापरून पाहा; कोंडा, केस गळतीवरही आहे फायदेशीर गाणे ऐका प्रवासात गाणी ऐकणं कोणाला आवडत नाही. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी तुमच्या आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट तयार करा आणि त्यांचा पुरेपूर आनंद घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात