मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /दररोज प्रवास करणारे असतात जास्त आनंदी, संशोधकांनी काढला निष्कर्ष

दररोज प्रवास करणारे असतात जास्त आनंदी, संशोधकांनी काढला निष्कर्ष

दररोज प्रवास करणारे असतात जास्त आनंदी

दररोज प्रवास करणारे असतात जास्त आनंदी

दररोज कामानिमित्त काही अंतर प्रवास करणाऱ्यांना ते कटकटीचं वाटतं. खरं तर अशा लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी व जीवन सुंदर होण्यासाठी या प्रवासाचा महत्त्वाचा वाटा असतो, असं एक अभ्यास सांगतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 21 जानेवारी : प्रवासामुळे आनंद तर मिळतोच, शिवाय खूप काही अनुभवही गाठीशी जमा होतात. मात्र दररोज कामानिमित्त काही अंतर प्रवास करणाऱ्यांना ते कटकटीचं वाटतं. खरं तर अशा लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी व जीवन सुंदर होण्यासाठी या प्रवासाचा महत्त्वाचा वाटा असतो, असं एक अभ्यास सांगतो. त्याबाबत ‘नवभारत टाइम्स’नं एक वृत्त दिलं आहे.

    दररोज प्रवास करणाऱ्या लोकांच्या सामाजिक जीवनाबाबत, त्यांच्या आरोग्याबाबत एक अभ्यास करण्यात आला. UCL संशोधकांनी केलेल्या या अभ्यासात घरी असणाऱ्यांच्या तुलनेत दररोज स्थानिक ठिकाणाहून लांब प्रवास करणारे लोक जास्त आनंदी असतात, असा निष्कर्ष काढण्यात आला. घरापासून 24-25 किलोमीटर अंतरावर प्रवास करून जाणाऱ्या लोकांबाबत एक अभ्यास करण्यात आला. UCL बार्टलेट स्कूल ऑफ एनव्हायर्नमेंट, एनजीओ अँड रिसर्चचे मुख्य लेखक डॉ. पाउलो एसीन्स यांनी त्याबाबत माहिती दिली आहे. दररोज इतका प्रवास करणाऱ्या लोकांचं सामाजिक जीवनही चांगलं असतं. तसंच त्यांचं आरोग्यही चांगलं राहतं.

    हेही वाचा - रोज सकाळी कॉफी पिता? तुमची ही सवय आरोग्यावर करू शकते गंभीर परिणाम

    उत्तर इंग्लंडमधील 3014 प्रातिनिधिक नागरिकांचं यात सर्वेक्षण करण्यात आलं. या लोकांच्या प्रवासात येणाऱ्या अडचणींचा त्यांच्या आयुष्यावर होणारा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम यात तपासण्यात आला. संशोधनानुसार, 55 पेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये प्रवासातील अडचणी, त्यांचा सामाजिक आयुष्यातला सहभाग आणि आरोग्य यांचा दृढ संबंध असतो. या वयातले लोक जास्त एकटे असतात. वेगवेगळी ठिकाणं शोधणंही त्यांना अवघड असतं. त्यांचा मित्रपरिवारही कमी असतो.

    प्रवास रोजचा असो किंवा सहलीचा, त्यामुळे अनेक फायदे मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्या ठिकाणी जाताना आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडतो. नवे अनुभव घेतो. त्यामुळे अडचणीही आव्हानं वाटू लागतात आणि ती आव्हान पार केल्यानं आत्मविश्वास वाढतो. प्रवास केल्यानं निसर्गसौंदर्य पाहता येतं. नवे लोक भेटतात. मन शांत होतं. जुने विचार नाहीसे होतात व ताजतवानं वाटतं. बरेचदा असं होतं, की प्रवासात व नियोजित ठिकाणी आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषा बोलल्या जात असतात. अशा वेळी त्या लोकांशी संवाद साधताना थोड्या समस्या येऊ शकतात. मात्र यामुळेच नवं काही शिकताही येतं. संभाषणकला यामुळे चांगली होते. त्यामुळेच प्रवास करणं फायद्याचं ठरतं.

    थोडक्यात, प्रवास केल्यामुळे अनेक चांगल्या गोष्टींचा अनुभव घेता येतो, मन ताजंतवानं होतं. त्यामुळेच घरापासून थोड्या दूरच्या अंतरावर फिरायला जाणं किंवा कामानिमित्त जाणं शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी लाभदायक ठरू शकतं.

    First published:

    Tags: Lifestyle, Travelling