मुंबई : उन्हाळा आला की केस आणि त्वचा ऑइली होडा (डँड्रफ) व चेहऱ्यावर मुरुमांचं (पिंपल्स) प्रमाण वाढतं. कडक ऊन आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी हानिकारक आहे. त्यामुळे कोणत्याण्याची समस्या वाढते. केसांमध्ये कोंही परिस्थितीत त्यांचं संरक्षण करणं आवश्यक आहे. उन्हाळ्यात दीर्घ काळ कडक सूर्यप्रकाशात राहिल्यास स्कॅल्पचं नुकसान होऊ शकतं. यामुळे केस कोरडे होतात. म्हणून घराबाहेर पडताना टोपी किंवा स्कार्फने डोकं झाकणं आवश्यक आहे. ‘ओझिवा’चे को-फाउंडर मिहीर गडानी यांनी उन्हाळ्यात कडक उन्हापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी 10 टिप्स दिल्या आहेत. उन्हाळ्यात केसांना जास्त प्रमाणात कॉस्मेटिक किंवा रंग लावू नका. उन्हाळ्यात कलर्ड केसांमध्ये खूप बदल होतात. त्यामुळे या काळात केसांसाठी केमिकल वापरणं किंवा केमिकल ट्रीटमेंट घेणं टाळायला हवं. उन्हाळ्यात केस रंगवायचे असतील तर ऑरगॅनिक कॉम्पोझिशन्स वापरा.
उन्हामुळे केस खूप कोरडे होतात का? सूर्याच्या उष्णतेपासून केस सुरक्षित ठेवण्याचा सर्वांत चांगला मार्ग म्हणजे टोपी किंवा स्कार्फ घालणं. स्कार्फ घालायचा नसेल, तर SPF असलेलं लिव्ह-इन कंडिशनर वापरू शकता. कामामुळे घराबाहेर पडावं लागत असल्यास पुरेसे एसपीएफ असलेलं हेअर प्रॉडक्ट वापरा. केसांच्या प्रकारानुसार खास हेअर मास्क किंवा सनस्क्रीन प्रॉडक्टदेखील निवडू शकता. कामावरून घरी पोहोचल्यानंतर केस पाण्याने धुवा. केस स्वच्छ धुऊन आउट कंडिशनर वापरा. ते तुमच्या केसांना चमकदार करतील. केसांचं टेक्श्चर व केसांच्या प्रकारासाठी योग्य असलेला कंडिशनर नेहमी निवडायला हवा. शाम्पूचा जास्त वापर केसांसाठी हानिकारक आहे. दररोज शाम्पू लावू नका. कारण त्यामुळे स्कॅल्प कोरडा होता आणि केस कमकुवत होतात. केसांचं नुकसान होतं. स्कॅल्पवर जास्त घाम येत असेल आणि केस सहज ग्रिसी होत असतील तर माइल्ड शाम्पूचा पर्याय निवडावा. लक्षात ठेवा, शाम्पू फक्त स्कॅल्पवर लावा, केसांना लावू नका. कारण त्यामुळे केस ड्राय होतात. उन्हाळ्यात शरीर थंड करण्यासाठी दुपारी पोहायला जाणं अनेकांना आवडतं. पाण्यातलं क्लोरीन आणि सूर्यप्रकाशातल्या यूव्ही किरणांमुळे केस सहजपणे खराब होऊ शकतात. त्यामुळे पोहायला जाण्यापूर्वी केसांना लिव्ह-इन कंडिशनर लावा आणि स्विमिंग कॅप घाला. पोहल्यानंतर क्लोरीनयुक्त पाण्यामुळे केसांना होणारं नुकसान कमी करण्यासाठी चांगला शाम्पू वापरा. ब्लो ड्रायर जास्त वापरू नका. कारण त्यातली हिट उन्हाळ्यात केसांना हानी पोहोचवू शकते. त्याऐवजी केस नेहमीपेक्षा अर्धा तास आधी धुवा, जेणेकरून ते हवेत सुकायला पुरेसा वेळ मिळेल. स्टाइलिंग आयर्न व कर्लर्सपासून दूर राहा. केसांना त्यांच्या नैसर्गिक स्थितीत राहू द्या. उन्हाळ्यात तापमानामुळे केसांच्या टोकांचं सर्वाधिक नुकसान होतं. या काळात केसांमध्ये स्प्लिट एंड्स व ड्राय टिप्स दिसणं साहजिक आहे. त्यामुळे नवीन हेअरकट करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असते. केस लहान करायचे नसतील तर स्मॉल ट्रिमरने केस सेट करू शकता, यामुळे केसांचे स्प्लिट एंड्स निघून जातील व केसांची वाढ होईल.
Women Hygiene : महिलांच्या पँटीवर पांढरा-पिवळा असा डाग का दिसतो?उन्हाळ्यातले काही महिने को-वॉशिंग किंवा कंडिशनर वॉशिंग खूप आवश्यक आहे. भरपूर घाम आणि घाण यामुळे केस उन्हाळ्यात खराब होतात. त्यामुळे केसांची नियमित स्वच्छता करणं गरजेचं असतं. या काळात फक्त केस धुणं पुरेसं नाही. केस चांगल्या क्वालिटीच्या रिप्लेनिशिंग कंडिशनरने धुताय, याची खात्री करा. आपले केस ओले केल्यानंतर, दोन मिनिटं कंडिशनर लावून ठेवा आणि नंतर चांगले परिणाम मिळवण्यासाठी केस स्वच्छ थंड पाण्याने धुवा. उन्हाळ्यात ऑइली केसांची समस्या सतावत असेल तर नियमित को-वॉशिंगने तुमचे केस ग्रीसी होतील. अशा परिस्थितीत ड्राय शाम्पू निवडणं, हा एक चांगला पर्याय आहे. स्कॅल्पवर आणि केसांवर बेबी टॅल्कम पावडर थोडीशी शिंपडून नंतर ते विंचरू शकता. यामुळे केस ऑइली होत नाही. उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्याच्या सर्वांत सोप्या आणि प्रभावी टिप्सपैकी ही एक आहे. या व्यतिरिक्त उन्हाळ्यात पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ पिणं आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांत स्वतःला हायड्रेटेड ठेवण्याचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे पाणी व पाण्याचं प्रमाण जास्त असलेल्या फळांचं सेवन करणं योग्य ठरतं. पुरेशा प्रमाणात पाणी पिणं ही केस आणि त्वचेच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. भरपूर ताजी हंगामी फळं आणि हिरव्या भाज्या खायला हव्यात. कारण ते त्वचेला फक्त हायड्रेटच करत नाहीत, तर त्यात अनेक आवश्यक व्हिटॅमिन्स व मिनरल्सदेखील असतात. चांगला आणि पौष्टिक आहार घेण्याबरोबरच रोजच्या रुटीनमध्ये प्लांट बेस्ड बायोटिन पूरक आहारदेखील घेऊ शकता. कारण ते केस, त्वचा आणि नखं निरोगी ठेवून त्यांचं पोषण करते. हेअरकेअर आणि स्किनकेअरच्या बाबतीत काटेकोरपणे पालन करण्यासारखी गोष्ट म्हणजे स्वच्छ आणि प्लांट बेस्ड प्रॉडक्ट्स वापरणं होय. कारण ते प्रॉडक्ट्स कोणत्याही ऋतूमध्ये केसांचं व त्वचेचं रक्षण करतात. केसांचं नुकसान होण्यास कोणतेही घटक कारणीभूत असले तरी जास्त चांगले परिणाम मिळविण्यासाठी रोजच्या हेअर रूटीनमध्ये व्हेगन आणि सल्फेट्स, पॅराबेन्स, डाईस आणि आर्टिफिशिअल सुगंध यांसारखी हानिकारक केमिकल्स नसलेली प्रॉडक्ट्स वापरा.