Home /News /lifestyle /

Clean Beard: हिवाळ्यात तुमचीही दाढी झालीय रफ & ड्राय? या टिप्स वापरून मिळवा विराट कोहली लुक

Clean Beard: हिवाळ्यात तुमचीही दाढी झालीय रफ & ड्राय? या टिप्स वापरून मिळवा विराट कोहली लुक

Tips To Clean Beard: हल्ली प्रत्येक दुसरा पुरुष तुम्हाला दाढी राखलेला पाहायला मिळेल. पण दाढी राखण्यासोबतच दाढीच्या स्वच्छतेकडेही विशेष (Clean Beard) लक्ष देणे गरजेचे आहे.

    मुंबई, 20 जानेवारी : दाढी ठेवण्याचा ट्रेंड (Beard Trend) सध्या जोरात आहे. जवळजवळ प्रत्येक दुसरा पुरुष तुम्हाला दाढी राखलेला पाहायला मिळेल. पण दाढी राखण्यासोबतच तिच्या स्वच्छतेकडेही (Clean Beard) लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः हिवाळ्यात अधिक काळजी घ्यावी लागते अन्यथा तुमच्या दाढीमध्ये खाज येणे, कोंडा होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. तसे, पाहता सहसा लोक त्यांच्या दाढीची स्वच्छता आणि काळजी घेतात. मात्र, या काळात नकळतपणे केलेल्या निष्काळजीपणामुळे दाढीमध्ये अनेक (Tips To Clean Beard) समस्या निर्माण होतात. त्यामुळेच दाढी साफ करताना काही खास गोष्टींची काळजी घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. जेणेकरून त्यात कोणतीही घाण राहत नाही आणि दाढी मऊ आणि चमकदार राहते, तसेच दाढीची वाढही चांगली राहते. जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या टिप्स ज्यांचा अवलंब करून आपण आपल्या दाढीतील या समस्या टाळून जबरदस्त लूक मिळवू शकतो. दाढी कशी स्वच्छ करावी आपल्यापैकी काही दाढी ठेवणारे लोक दाढीच्या स्वच्छतेबाबत खूप अॅक्टिव असतात. तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे दाढी लवकर साफ करत नाहीत. या दोन्ही सवयी दाढीची स्थिती बिघडवू शकतात. खरे तर दाढी जास्त धुतल्याने त्यातील नैसर्गिक तेलकटपणा संपतो. त्यामुळे ती कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. यामुळे दाढीचा पोत देखील बदलतो. त्याचप्रमाणे दाढी फार कमी किंवा अजिबात न धुतल्याने त्यामध्ये घाणीचे थर साचतात. ज्यामुळे नंतर खाज येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच दाढी जास्त धुतली जाऊ नये आणि खूप कमीही धुवू नये. यासाठी दिवसातून एकदा स्वच्छ पाण्याने दाढी धुणे पुरेसे आहे. खूप गरम पाणी नको हिवाळ्यात लोक दाढी धुण्यासाठी अनेकदा गरम पाण्याचा वापर करतात. पण दाढी धुण्यासाठी पाणी कधीही जास्त गरम होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. कारण ते दाढीच्या केसांमधले नैसर्गिक तेल तर काढून टाकतेच, पण केसांना कोरडेपणाही आणते. त्यामुळे दाढीच्या केसांची चमकही कमी होते आणि वाढही नीट होत नाही. त्यामुळे गरम पाण्याने दाढी धुणे टाळावे. दाढी-वॉश वापरा दाढी धुण्यासाठी आपण अनेकदा साबण वगैरे वापरतो. परंतु बहुतेक साबणांमध्ये आढळणारे रसायने दाढीच्या केसांना नुकसान पोहोचवू शकतात. म्हणूनच दाढी धुण्यासाठी आपण नेहमी बाजारात उपलब्ध असलेल्या चांगल्या दाढी-वॉशचा वापर केला पाहिजे. हे वाचा - Hair care tips : केस धुताना जवळपास 90 टक्के लोक या चुका करतात; नंतर उपायांवर वेळ घालवतात क्लीन्झर कसा लावायचा दाढी धुण्यासाठी वापरण्यात येणारे क्लिंजर वापरण्याचाही एक योग्य मार्ग आहे. या दरम्यान दाढी जास्त चोळू नका. यासोबतच दाढीमध्ये क्लिंजर गोलाकार हालचालींमध्ये लावा. अशा प्रकारे आतून बाहेरून हलवा. यामुळे तुमच्या दाढीतील रक्ताभिसरण चांगले राहते. ज्यामुळे दाढीचे केस मजबूत आणि चमकदार राहतील. हे वाचा - टक्कल पडण्याची भीती दिवस-रात्र सतावतेय? केस गळती थांबवण्यासाठी मेथी-कांद्याचा असा करा वापर मॉइश्चरायझरचा वापर दाढी धुतल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर किंवा दाढी-तेल लावणे चांगले. कारण यावेळी दाढीच्या केसांची छिद्रे उघडी असतात आणि त्यात मॉइश्चरायझर किंवा दाढीचे तेल सहज शोषले जाते. त्यामुळे दाढी मऊ आणि चमकदार राहते. ही पद्धत दाढीच्या केसांना कोरडेपणापासून देखील वाचवते. (सूचना : येथे दिलेली माहिती वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Personal life

    पुढील बातम्या