हृदय निरोगी असेल तर अनेक गोष्टींवर आपण मात करू शकतो. मात्र सध्या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. जसलोक हॉस्पिटलमधील रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डिओलॉजिस्ट डॉ. निहार मेहता यांनी हृदय निरोगी ठेवण्याचे काही सहज आणि सोप्पे उपाय सांगितले आहेत. शारीरिक कार्य : जास्त वेळ बसून राहणं हे धुम्रपाना इतकंच हानिकारक आहे. निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. दिवसभरात किमान ३० ते ४५ मिनिटं व्यायाम करणं आवश्यक आहे. तसंच आठवड्याला ५ ते ६ दिवस काम करणं आवश्यक आहे. यामध्ये चालणं, सायकलिंग, पोहणं किंवा धावणं यांसारख्या व्यायामांचा समावेश करा. डाएट: असं म्हटलं जातं की, मनुष्याच्या हृदयाचा मार्ग पोटातून जातो. म्हणूनच हृदयाचे अनेक आजार हे पोटामुळे होतात. त्यामुळे जंक फूड, लोणी, चीज, फास्ट फूड आणि डेझर्ट खाण्यावर निर्बंध घातले पाहीजेत. या गोष्टी खाणं पूर्णपणे बंद करणं ही काळाची गरज आहे. फळं आणि भाज्या- आपण काय खाऊ नये याच्यासोबतच, आपण कोणत्या गोष्टी योग्य प्रमाणात खाव्यात याचा विचार करणंही महत्त्वाचं आहे. हृदयाचे आजार रोखण्यासाठी दररोज २ ते ३ फळं आणि किमान वाटीभर वेगवेगळ्या भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत. फळांचा रस घेण्यापेक्षा ताजी फळं खाण्यावर जोर असावा. तसेच भाज्या जास्त प्रमाणात शिजवू नये, त्यामुळे त्यातील जीवनसत्त्व नाहीसे होतात. ४.योग आणि ध्यान- नियमित योग आणि ध्यानमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच मानसिक ताण आणि हृदयावरचा ताण कमी होण्यास मदत होते. ५.तंबाखूचं सेवन थांबवा- तंबाखूचा उपयोग सिगरेट, विडी, चघळण्यासाठी, ब्रश किंवा पानमध्ये केला जातो. तंबाखू सेवन थेट हृदयरोगाची निगडित आहे. त्यामुळे तंबाखूचं सेवन सोडवणं फार आवश्यक आहे. ६.अल्कोहोलचे सेवन बंद करा- विशिष्ट मर्यादेपर्यंत, अल्कोहोलचे हृदयाला फायदे होतात. मात्र, त्याहून जास्त अल्कोहोल शरीराला अत्यंत घातक आहे. पुरुषांसाठी दिवसाला २ ग्लास पेय आणि स्त्रियांसाठी १ ग्लास पेय चालते. १ ग्लास पेय म्हणजे २५ मि.ली. व्हिस्की, ब्रँडी, वोडका चालतो. तसेच १२५ मि.ली. वाइन किंवा ३४० मि.ली. बियर घेऊ शकता. या पलीकडे अल्कोहोलचे सेवन शरीराला घातक आहे. ७.व्यायाम- योग्य व्यायाम करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जिममध्ये जाऊन व्यायाम करत असाल किंवा मॅरेथॉनमध्ये धावत असाल तर सुरूवातीलाच हृदयाच्या सर्व चाचण्या करुन घेणं आवश्यक आहे. अचानक फिटनेसची कोणतीही गोष्ट सुरू करू नका. याचा हृदयावर फार घातक परिणाम होऊ शकतो. ८.ताण कमी ठेवणं- धकाधकीच्या आयुष्यात मनावरचा ताण कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. मनावरचा ताण टाळण्यासाठी तुम्हाला आवडेल ते काम करा. एखादा छंद जोपासा. संगीत ऐकणं, कुटुंबासह वेळ घालवणं, लाँग ड्राइव्हला जाणं, सिनेमा- नाटक पाहणं किंवा समुद्री चौपाटीवर बसणं… तुम्हाला ज्याची आवड आहे ते वेळातवेळ काढून नियमितपणे करा. ९.मानसिक आरोग्य- आपण नेहमी शारीरिक स्वास्थ्याकडे अधिक लक्ष देतो आणि मानसिक स्वास्थ्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो. हृदयविकाराच्या अनेक कारणांपैकी मानसिक् स्वास्थ्य हे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. कामाच्या दबावामुळे आणि कमी होत चाललेल्या कौटुंबिक वेळेमुळे मनावरचा ताण वाढतच चालला आहे. मानसिक रोगाशी निगडित समस्यांवर उपचार करण्यासाठी मनोवैज्ञानिक आणि मानसोपचार तज्ज्ञांची वेळीच मदत घ्यावी. १०.नियमित तपासणी- उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टरॉल हे त्रिकूट अनेक रोगांचं कारण आहे. त्यामुळेच या रोगांची नियमित तपासणी करत राहणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.