‘द सन’च्या रिपोर्टनुसार पॅरामेडिक्स रियाना हिंगीसने यॉर्कशायर अॅम्बुलन्स सेवेच्या ड्युटीवर असताना आपल्या सहकारी नर्सबरोबर एक टिक टॉक व्हीडिओ तयार केला. दोघींनी अॅम्बुलन्समध्येच जस्टिन बीबरच्या गाण्यावर डान्स केला. पण, सोशल मीडियावर युजर्सनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आणि त्या किती अंनप्रोफेशनल आहेत हे त्यांना दाखवून दिलं.
25 वर्षीय रियाना ही साऊथ यॉर्कच्या डोनकास्टरमध्ये राहणारी आहे. गेल्या 18 महिन्यांपासून रियाना ॲम्ब्युलन्स सेवेसाठी काम करते आहे. तिने हा व्हीडीओ टिकटॉकवर पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये दोघी डान्स करतात आहेत. याआधी देखील तिने असे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.
सोशल मीडियावर युजर्सनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. एका युजर्सनी म्हटलं की, आत्ता लक्षात आलं ॲम्ब्युलन्स एक तासाऐवजी तीन तासांनी का पोहोचते. तर, दुसऱ्या युजर्सने कोरोना काळात लोक मरत असताना यांना डान्स करण्यासाठी वेळ कसा मिळाला असा प्रश्न उपस्थित केला.
मागच्या वर्षी कोरोनाचा कहर सुरू असताना देखील रियानाने डान्स व्हिडिओ तयार करणं सुरूच ठेवलं होतं. तिने एप्रिल महिन्यातही टिकटॉक व्हिडिओ पोस्ट केले होते. या व्हीडिओमध्ये युनिफॉर्म घालूनचं डान्स केला आहे.
याशिवाय यॉर्कशायर ॲम्ब्युलन्स सेवेच्या मुख्य कार्यालयात देखील या दोघींनी व्हीडिओ तयार केला होता. कंपनीने यावर खुलासा करताना रियानाच्या व्हीडिओबद्दल नुकतंच माहिती झाल्याचं सांगितलं तर, या दोघी ब्रेकमध्ये हे व्हीडिओ तयार करत असल्याचं सांगत आणि काम करताना प्रोफेश्नल राहण्याचा सल्ला दिला.