आपल्या आरोग्यासाठी जशी झोप महत्त्वाची असते तसंच झोपण्याच्या पद्धतीदेखील महत्त्वाच्या आहेत. आता त्यात ही बाब जर गरोदर महिलांच्या बाबतीत असेल तर त्यात काळजी घेणं महत्त्वाचं आहे. गरोदर महिलेने योग्य पद्धतीने झोपलं नाही तर त्याने आईला आणि बाळाला मोठा धोका निर्माण होतो.
गरोदर असतानाच्या सुरुवातीच्या काळात महिलांनी पाठीवर झोपणं चिंतेची बाब आहे. पण जसं-जसं महिने वाढत जातात तसं-तसं शरीराचं वजन वाढण्यास सुरुवात होते.
गर्भ वाढण्याबरोबरच पाठीवर ताण पडण्यास सुरुवात होते. जेव्हा गर्भवती महिला पाठीवर झोपते तेव्हा गर्भाशयाचा सगळा भार शरीराच्या भागांवर पडतो. याचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे रक्त प्रवाह सुरळीत होत नाही.
याचबरोबर जेव्हा एखादी गर्भवती महिला जास्त वेळ पाठीवर झोपतात त्यांच्या हृदय आणि फुप्फुसांवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे श्वासोच्छवासचा त्रास होतो.
त्याचबरोबर मज्जारज्जू म्हणजेच (spinal cord)वर ताण पडतो आणि मणक्याचे दुखणे सुरू होते. त्यामुळे गरोदर महिलांना रात्रभर झोप न लागण्याचा अनुभव असेलच.
खरंतर गरोदर महिलांनी कोणत्याही एकाच पोजीशनमध्ये जास्त वेळ झोपणं चुकीचं आहे. त्यासाठी थोड्यावेळा झोपण्याची पद्धत बदलणं महत्त्वाचं आहे.
महिलांनो, हे लक्षात असू द्या की गरोदर असताना डावीकडच्या बाजूने झोपणं सगळ्यात फायद्याचं आहे. शरीराला आराम मिळावा यासाठी पायांखाली उशी ठेवून झोपा आणि स्वत:ची सगळ्यात काळजी घ्या कारण गरोदर पणात एक छोटीशी चुक तुम्हाला खूप महागात पडेल.