मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्ही आवडीने खात असलेले हे 5 पदार्थ आहेत अतिशय घातक; वाढवतात हृदयविकाराचा धोका

तुम्ही आवडीने खात असलेले हे 5 पदार्थ आहेत अतिशय घातक; वाढवतात हृदयविकाराचा धोका

अन्नामुळे आधी तुमच्या रक्तातलं कोलेस्टेरॉल वाढतं, त्यानंतर ब्लड प्रेशर वाढतं, मग हृदयविकाराचा झटका येतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांची माहिती देणार आहोत, ज्यांचं अधिक सेवन तुमच्या हृदयासाठी चांगलं नाही.

अन्नामुळे आधी तुमच्या रक्तातलं कोलेस्टेरॉल वाढतं, त्यानंतर ब्लड प्रेशर वाढतं, मग हृदयविकाराचा झटका येतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांची माहिती देणार आहोत, ज्यांचं अधिक सेवन तुमच्या हृदयासाठी चांगलं नाही.

अन्नामुळे आधी तुमच्या रक्तातलं कोलेस्टेरॉल वाढतं, त्यानंतर ब्लड प्रेशर वाढतं, मग हृदयविकाराचा झटका येतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांची माहिती देणार आहोत, ज्यांचं अधिक सेवन तुमच्या हृदयासाठी चांगलं नाही.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 29 सप्टेंबर : कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येणं, हृदयविकारच्या समस्या असणारे अनेकजण पाहायला मिळतात. साधारणपणे आपली जीवनशैली आणि काही सवयी हृदयाच्या आरोग्यासाठी जबाबदार असतात. हेल्दी लाईफस्टाइलचा अवलंब केल्यास हृदयविकाराचा धोका कमी करता येतो. हृदयाच्या आरोग्याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठीच जागतिक हृदय दिन दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आज, गुरुवारी हा दिवस साजरा करण्यात येत असून या निमित्ताने आम्ही तुम्हाला असे काही खाद्यपदार्थ सांगणार आहोत, ज्यांचं जास्त प्रमाणात सेवन हे तुमच्या हृदयासाठी धोकादायक ठरु शकतं.

World Heart Day 2022: निरोगी हृदयासाठी अक्रोड खाणे आहे सर्वोत्तम; 'हार्ट डे'निमित्त जाणून घ्या फायदे

निरोगी जीवनासाठी, आपण आपल्या हृदयाची काळजी घेणं आवश्यक आहे. हृदयविकार हे केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात मृत्युचं प्रमुख कारण बनलं आहे, आणि त्याचा धोका सातत्याने वाढतोय. याचं एक कारण अनहेल्दी फूड खाण्याच्या सवयी आणि बदलेली जीवनशैली असू शकतं. अशा अन्नामुळे आधी तुमच्या रक्तातलं कोलेस्टेरॉल वाढतं, त्यानंतर ब्लड प्रेशर वाढतं, मग हृदयविकाराचा झटका येतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांची माहिती देणार आहोत, ज्यांचं अधिक सेवन तुमच्या हृदयासाठी चांगलं नाही.

फ्रेंच फ्राईज : हे खूप गरम तेलात शिजवले जातात, व यामध्ये भरपूर सोडियम, ट्रान्स फॅट्स, कार्ब्ज असतात. ते आरोग्यासाठी खूप धोकादायक मानले जातात.

नारळ पाणी सगळ्यांसाठीच फायदेशीर नसतं, अशा लोकांनी पिताना काळजी घ्या

पिझ्झा : हा बहुतांश तरुणांची पहिली पसंती आहे. पण त्यात फॅट आणि सोडियमचं प्रमाण जास्त असतं. यातील चीज कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर वाढवतं, व यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जर तुम्हाला हृदयविकाराचा धोका कमी करायचा असेल, तर पिझ्झा तयार करताना गहू आणि ऑलिव्ह ऑइल वापरा.

रेड मीट : रेड मीटमध्ये (Red Meat) भरपूर सॅच्युरेटेड फॅट आणि मीठ असतं, त्यामुळे असं मांस महिन्यातून एकदाच खाण्याचा सल्ला दिला जातो. हे मांस खाल्याने शरीराची प्रोटिनची गरज पूर्ण होत असली तरी हे मांस अतिरिक्त चरबी कोलेस्टेरॉल वाढवतं आणि हृदयविकाराच्या झटक्याचं कारण बनतं.

इन्स्टंट नूडल्स : हा कॉलेजमधील विद्यार्थी, अविवाहित व्यक्ती यांचा आवडता पदार्थ असतो. कारण नूडल्स कमी वेळात व सोप्या पद्धतीने तयार करता येतात. परंतु, रोज नूडल्स खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. यामध्ये तेल आणि सोडियमचा वापर जास्त होतो, ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

ब्लेंडेट कॉफी : ब्लेंडेड कॉफीमध्ये भरपूर कॅलरी आणि फॅट असतात. तसंच त्यात असलेल्या साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. शरीराला सर्वाधिक नुकसान कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे होतं, जे ब्लड प्रेशर वाढवण्याचं काम करतं आणि नंतर हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

तुमची लाईफस्टाइल, खाण्याच्या सवयी यांचा तुमच्या आरोग्यावर खूप परिणाम होत असतो. काही सवयी आरोग्यासाठी चांगल्या असतात. तशाच काही सवयी या घातक असतात. शरीरासाठी घातक ठरणाऱ्या सवयी वेळीच बदलणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Food, Heart Attack, Superfood