मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight loss tips: रात्री चुकूनही खाऊ नका या गोष्टी, वजन नियंत्रणात ठेवणं होईल अशक्य

Weight loss tips: रात्री चुकूनही खाऊ नका या गोष्टी, वजन नियंत्रणात ठेवणं होईल अशक्य

जर तुम्ही वजन कमी (control weight) करण्याचा प्रयत्न करत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी खाण्याचे टाळावे. काही पदार्थ असे आहेत, त्यांचे रात्रीच्यावेळी सेवन केल्याने शरीरावर चरबी वाढू शकते. त्याविषयी जाणून घेऊया.

जर तुम्ही वजन कमी (control weight) करण्याचा प्रयत्न करत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी खाण्याचे टाळावे. काही पदार्थ असे आहेत, त्यांचे रात्रीच्यावेळी सेवन केल्याने शरीरावर चरबी वाढू शकते. त्याविषयी जाणून घेऊया.

जर तुम्ही वजन कमी (control weight) करण्याचा प्रयत्न करत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी खाण्याचे टाळावे. काही पदार्थ असे आहेत, त्यांचे रात्रीच्यावेळी सेवन केल्याने शरीरावर चरबी वाढू शकते. त्याविषयी जाणून घेऊया.

नवी दिल्ली, 25 डिसेंबर : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वजन कमी (weight loss) ठेवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. मात्र, वजन कमी करणे एखाद्या आव्हानाइतकेच मोठे काम आहे. यासाठी व्यायाम आणि सकस आहाराचा अवलंब करण्यासोबतच काही पदार्थ खाणे टाळणे गरजेचे आहे. चरबी जमा होणार याची काळजी घ्यावी लागते. विशेषतः रात्रीच्या वेळी काही पदार्थ खाणे टाळावे.

जर तुम्ही नुसत्या डाएटिंग ऐवजी स्मार्ट इटिंग केलं तर तुमचे वजन लवकर कमी होऊ शकते. तसेच, तुम्हाला अशक्तपणासारखीही कोणती समस्या (weight loss tips) जाणवणार नाही. जर तुम्ही वजन कमी (control weight) करण्याचा प्रयत्न करत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी खाण्याचे टाळावे. 'झी न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार, काही पदार्थ असे आहेत, त्यांचे रात्रीच्यावेळी सेवन केल्याने शरीरावर चरबी वाढू शकते. त्याविषयी जाणून घेऊया.

1. रात्री कोबी खाणे

कोबी, ब्रोकोलीसारखे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण रात्री झोपण्यापूर्वी ते खाणे हानिकारक ठरू शकते. कारण, कोबीमध्ये असलेले फायबर पोटात रात्रभर पचण्यास वेळ लागतो. त्यामुळे झोपेवरही परिणाम होतो आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. या दोन्ही गोष्टींमुळे वजन वाढू शकते.

2. झोपण्यापूर्वी नॉनव्हेज खाण्याचे तोटे

जर तुम्ही रात्री नॉनव्हेज खाण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला वजनही कमी करायचे असेल तर थांबा. कारण कोबीप्रमाणेच नॉनव्हेज अन्नही झोपताना नीट पचत नाही. ज्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. सकाळच्या जेवणातच नॉनव्हेज खाणे फायदेशीर ठरू शकते.

हे वाचा - थंडीच्या दिवसात Heart Attack चा धोका अधिक; व्यायाम करताना या गोष्टींची खबरदारी घ्या

3. कॉफी

कॉफी प्यायल्याने शरीरात चपळता आणि ऊर्जा येते. पण, या ऊर्जेमुळे वजनही वाढू शकते. कारण, रात्रीच्या वेळी कॉफी प्यायल्याने कॅफिनमुळे झोपेवर परिणाम होतो आणि शरीराच्या घड्याळात अडथळा येऊ शकतो. अपुऱ्या झोपेमुळे शरीराचे वजन वाढत असल्याचे अनेकदा दिसून येते.

4. दारू

अल्कोहोल किंवा दारूचे सेवन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे तुमचे वजन वाढवू शकते. याचे पहिले कारण म्हणजे झोपण्यापूर्वी दारू प्यायल्याने झोप नीट लागत नाही आणि वजनही वाढते. बहुतेक लोक अल्कोहोलसोबत स्नॅक्स म्हणून अनेक वजन वाढवणारे पदार्थ खातात, ज्यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकणार नाही.

हे वाचा - Yellow Teeth Treatment: पिवळे दात चारचौघात खराब करतात स्मार्ट लूक, या उपायांनी 7 दिवसात चमकतील

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Food, Health, Lifestyle, Weight, Weight loss tips