• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • तुमची मासिक पाळी अनियमित होण्यामागे नेमकी कोणती समस्या कारणीभूत आहे पाहा

तुमची मासिक पाळी अनियमित होण्यामागे नेमकी कोणती समस्या कारणीभूत आहे पाहा

आपल्याकडे आजही सॅनिटरी पॅड वापरणंच सुरक्षीत मानलं जातं.

आपल्याकडे आजही सॅनिटरी पॅड वापरणंच सुरक्षीत मानलं जातं.

मासिक पाळी अनियमित होण्याची अनेक कारणं आहेत.

 • myupchar
 • Last Updated :
 • Share this:
  साधारणपणे 10 ते 15 या वयात मुलींना पाळी यायला सुरुवात होते. नियमित पाळी येणं म्हणजे शरीराचे महत्त्वाचे अवयव व्यवस्थित काम करत असल्याचा संकेत आहे. पाळीच्या चक्राचा सरासरी कालावधी 28 दिवसांचा असतो. जर हे चक्र समान अंतराने दर महिन्याला होते तर पाळी नियमित आहे असं मानलं जातं. एका नियमित चक्राचा काळ 21 ते 35 दिवस असू शकतो. पण जर एका महिन्यात लवकर पाळी आली आणि दुसऱ्या महिन्यात उशिराने आली तर मात्र ते अनियमित आहे असं मानलं जातं. जर एखाद्या महिन्याला पाळी आली नाही तर तेही अनियमित समजलं जातं. पूर्ण महिन्यातील हार्मोनच्या पातळीतील वाढ आणि कमी होणे हे या चक्राला नियंत्रित करते. myupchar.com चे डॉ. विशाल मकवाना यांनी सांगितलं, एखाद्या वेळी पाळीमध्ये अनियमितता आली तर काळजीचं कारण नाही. पण जर नेहमीच असं होत असेल तर मासिक पाळीच्या या चक्राला नियंत्रित करणं कठीण होऊ शकतं. अनियमित मासिक पाळीची काही कारणं असू शकतात त्याविषयी महिलांना माहिती असणं आवश्यक आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ओव्हरीमध्ये सीस्ट (अंडाशयात गाठ) अनियमित मासिक पाळीचं सगळ्यात मोठं कारण आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) प्रजनन क्षमता कमी असण्याशी जोडलं गेलं आहे. यात महिलेच्या शरीरात पुरुष हार्मोन निर्माण होतात, त्याच्यामुळे मासिक पाळी अनियमित होते. त्यावर उपचार करणे जरूरी आहे. दीर्घकाळ मासिकपाळी अनियमित असणं, चेहरा आणि शरीरावर अधिक केस उगवणं, वजन वाढणं, तारुण्य पिटिका येणं, तेलकट चेहरा इत्यादी पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमची लक्षणं आहेत. तणाव तणाव मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम करतो त्याने महिलांना मासिक पाळी उशिरा येऊ शकते. तणाव शरीरातील हार्मोनवर प्रभाव टाकतो. तणावाचं नियोजन करणं आवश्यक आहे असं केलं नाही तर महिलांच्या इतर स्वास्थ्य समस्यावरही त्याचा परिणाम होतो. लठ्ठपणा myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. अनुराग शाही यांनी सांगितलं, अधिक वजन असणं किंवा लठ्ठपणा याने महिलांना वंध्यत्व आणि अनियमित मासिक पाळीसारख्या समस्या होऊ शकतात. अतिरिक्त वजनामुळे हार्मोन परिवर्तन होते आणि त्याने पाळीत उशीर होऊ शकतो. काही शारीरिक व्यायाम करून वजन कमी करणं गरजेचं आहे. औषधं महिला गर्भनिरोधक गोळ्या घेत असतात, त्याचा मासिक पाळीवर परिणाम होतो.. कधी कधी अँटीडिप्रेसेंट्स गोळ्यांचे सेवन महिलांमधील मासिक पाळी अनियमित होण्यास कारणीभूत होऊ शकतात. काही आरोग्य समस्या काही जुन्या आरोग्याशी निगडीत परिस्थितींमुळे देखील महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होऊ शकते. मधुमेहदेखील मासिक पाळी अनियमित करण्याचे कारण होऊ शकतो. मधुमेहाने हार्मोन प्रभावित होतात आणि पोषणाच्या कमतरतेनेदेखील पाळी अनियमित होऊ शकते. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - महिलांचे आरोग्य  न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
  First published: