मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Travel Tips : तुम्हीही हिल स्टेशनवर जाण्याचा विचार करताय? मग या महत्त्वाच्या गोष्टी बॅगेत असाव्यातच

Travel Tips : तुम्हीही हिल स्टेशनवर जाण्याचा विचार करताय? मग या महत्त्वाच्या गोष्टी बॅगेत असाव्यातच

हिल स्टेशन्सला पर्यटकांची पसंती असते. जर तुम्ही देखील भारतातील कोणत्याही हिल स्टेशनला फिरण्याचा किंवा भेट देण्याचा विचार करत असाल तर नेहमी काही खास वस्तू तुमच्या बॅगेत (Travel Tips) असाव्यातच.

हिल स्टेशन्सला पर्यटकांची पसंती असते. जर तुम्ही देखील भारतातील कोणत्याही हिल स्टेशनला फिरण्याचा किंवा भेट देण्याचा विचार करत असाल तर नेहमी काही खास वस्तू तुमच्या बॅगेत (Travel Tips) असाव्यातच.

हिल स्टेशन्सला पर्यटकांची पसंती असते. जर तुम्ही देखील भारतातील कोणत्याही हिल स्टेशनला फिरण्याचा किंवा भेट देण्याचा विचार करत असाल तर नेहमी काही खास वस्तू तुमच्या बॅगेत (Travel Tips) असाव्यातच.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : देशात अशी अनेक शहरं आहेत, जिथे खूप उष्णता असते. त्यामुळं अनेकदा या शहरांतील लोक सुट्टीसाठी वेळोवेळी हिल स्टेशनला (hill station) जाणं पसंत करतात. शिमला, मनाली, नैनिताल ही अशी सर्व हिल स्टेशन्स आहेत, जी पर्यटकांची पसंती आहेत. जर तुम्ही देखील भारतातील कोणत्याही हिल स्टेशनला फिरण्याचा किंवा भेट देण्याचा विचार करत असाल तर नेहमी काही खास वस्तू तुमच्या बॅगेत (Travel Tips) असाव्यातच.

तुम्ही भारतातल्या कोणत्याही हिल स्टेशनला भेट देण्यासाठी तुमची बॅग पॅक करत असाल, तर अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपण विसरतो. पण त्या घेणं खूप गरजेचं असतं. आज आम्ही तुम्हाला अशाच आवश्यक वस्तूंची यादी सांगणार आहोत, ज्या तुम्ही प्रवासादरम्यान तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये ठेवाव्यात.

लेदर जॅकेट आणि स्वेटर सोबत ठेवा

हिल स्टेशनवर तापमान खूप कमी असतं. त्यामुळं लेदर जॅकेट सोबत घ्या. कारण, हे जॅकेट चांगली ऊब देतं आणि कमी जागेत ठेवताही येतं. शिवाय, लेदर जॅकेटमुळं तुमचा लुकही चांगला दिसतो. यासोबतच रोजच्या वापरासाठी स्वेटर ठेवा. तसंच एखादा जास्तीचा स्वेटर सोबत ठेवा.

बॉडी वॉर्मर सोबत ठेवा

बर्‍याच वेळा खूप जास्त थंडी असलेल्या ठिकाणी एकापेक्षा जास्त स्वेटर घातल्यानं समस्या निर्माण होतात आणि अॅलर्जी देखील होते. त्यामुळं जेव्हा हिल स्टेशनवर जाल, तेव्हा नेहमी बॉडी वॉर्मर बाळगा. ते वजनाला हलकेदेखील असण्याबरोबरच आणि शरीराला आरामदायीही असतात. यासोबत मफलर किंवा टोपी नक्कीच बाळगा.

आपत्कालीन क्रमांक सोबत ठेवा

तुम्ही जेव्हा फिरायला जाल, तेव्हा इमर्जन्सी नंबर नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करण्याशिवाय एखाद्या छोट्या डायरीत लिहून ती डायरी सोबत ठेवा. काही कारणानं तुम्ही मोबाईल वापरू शकला नाहीत तर, या डायरीचा उपयोग होईल.

हे वाचा - तुम्हीही मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून किंवा एटीएममधून पैसे काढत आहात? मग जाणून घ्या परिणाम

प्रथमोपचार पेटी (first aid kit)

अनेकवेळा असं घडतं की, जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत प्रवास करता, तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणानं लहान-मोठी दुखापत होते. त्या वेळी ताबडतोब उपयोगी पडतील अशी औषधंही या किटमध्ये ठेवा.

हे वाचा - लॉन्च होणार Samsung चा जबरदस्त 5G Smartphone, कमी किमतीत मिळतील कमाल फीचर्स

सेल्फी स्टिक आणि डिजिटल कॅमेरा

डिजिटल कॅमेरा ही अशीच एक गोष्ट आहे, जी तुमची सहल खूप खास बनवू शकते आणि तेथील आठवणी तुम्ही कायमसाठी सोबत आणू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही कुठेही प्रवासाला जात असाल तर कॅमेऱ्यासोबतच सेल्फी स्टिक घ्यायला विसरू नका. बर्‍याच वेळा तुम्ही एकटे फिरत असता, तेव्हा सेल्फी स्टिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते.

First published:

Tags: Travel, Travel with friends, Travelling