मुंबई, 27 मे : लघवी हा आहाराच्या गुणवत्तेचा चांगले निदर्शक आहे. काही मिनरल्सच्या अतिरिक्त सेवनाने लघवीचा रंग व गंध बदलू शकतो. क्लाउडी म्हणजे फेसाळ लघवी होणे ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या मुख्यतः डिहायड्रेशन व युरिनरी संसर्गामुळे, पुरुषांमध्ये प्रोस्टेट किंवा स्त्रियांमध्ये योनीची जळजळ, लैंगिक संसर्ग, किडनी स्टोन किंवा काही पदार्थांच्या अतिरिक्त सेवनाने उद्भवते. यामागचं पॅथॉलॉजिकल कारण शोधण्यासाठी तुम्ही डॉक्टरांची प्रत्यक्षात भेट घेऊ शकता; पण आहारातला कोणता पदार्थ किंवा पेयाच्या सेवनाने हा त्रास होऊ शकतो, याबद्दल जाणून घेऊ या. बेंगळुरूच्या फोर्टिस हॉस्पिटलमधल्या Obstetrics & Uro Gynaecologyच्या सीनिअर कन्सल्टंट डॉ. रुबीना शानवाझ झेड. यांनी याविषयी माहिती दिली आहे. 1) खारट पदार्थ : यामध्ये प्रामुख्याने प्रक्रिया केलेले चिप्स, कॅन्ड फूड व मांस यांचा समावेश होतो. कमी पाण्यासोबत मिठाचं जास्त सेवन केल्याने हायड्रेशनचा त्रास होतो व क्लाउडी युरिन होते. 2) हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप : जवळजवळ प्रत्येक पॅकेज्ड फूडमध्ये फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतं. साखरयुक्त सोडा आणि गोड पदार्थांमध्ये हे सिरप जास्त प्रमाणात वापरल्यास शरीरातलं युरिक अॅसिड वाढतं व त्यामुळे क्लाउडी युरिन होते. 3) डेअरी प्रॉडक्ट्स : दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात फॉस्फरसचं प्रमाण वाढतं. त्यामुळे क्लाउडी युरिन होते. तसंच जेव्हा एखाद्या व्यक्तीला किडनीचा आजार असतो तेव्हा याचं प्रमाण वाढतं. 4) मांस : यामध्ये लाल मांस आणि अंड्याचा समावेश असतो. त्यातून मोठ्या प्रमाणात फॉस्फरस बाहेर पडतं. मांस किंवा अंडी खाल्ल्यानंतर पोटात फॉस्फरस व मिठाची प्रक्रिया होते. त्यामुळे क्लाउडी युरिन होते. 5) सी फूड : सार्डिन, अँकोव्हीज आणि शेलफिश या सी फूडमध्ये प्युरिनचं प्रमाण जास्त असतं. मेटाबॉलिझममध्ये त्याचं रूपांतर युरिक अॅसिडमध्ये होतं. परिणामी क्लाउडी युरिन होते. 6) मद्यपान : जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने डिहायड्रेशन होतं आणि त्यामुळे लघवीचा रंग बदलतो. 7) कॅफीन : चहा, कॉफी, ब्लॅक टी व ग्रीन टी यांमध्ये कॅफीन असतं. त्यामुळे त्यांचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने डिहायड्रेशन होतं आणि लघवी क्लाउडी होते. वर दिलेले सर्व खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्स यांचे सेवन मर्यादित प्रमाणात केल्यास आरोग्याला अपाय होत नाहीत. मुख्य म्हणजे योग्य हायड्रेशनसह संतुलित आहार घेतल्यास क्लाउडी युरिनची समस्या टाळता येते. आहाराकडे लक्ष देऊनही ही समस्या दूर होत नसेल, तसंच स्राव, वेदना किंवा ताप येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







