खुपवेळा घाईघाईत किंवा वेळ नाही म्हणून उभं राहून आपण पाणी पितो.पण जेवण शांतपणे खाली बसून करणं आवश्यक असतं, तितकचं पाणीही खाली बसून प्याला हवं याची माहिती आहे का?
उभं राहून पाणी पिताना शरीरातील अनेक स्थायूंवर एकाच वेळी ताण येत असतो. पण बसून पाणी प्यायल्यास पॅरासिम्पॅटेपेटिक म्हणजेच स्नायू आणि मज्जातंतूच्या एकत्रित सहभागाने होणाऱ्या प्रक्रिया रिलॅक्स आणि डायजेशन मोडवर असते.
त्यामुळे अन्नपचन आणि शारीरिक प्रक्रियांसाठी पाण्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होतो. जेव्हा आपण उभं राहून पाणी पितो,तेव्हा अन्ननलिकवर दाब घेऊन पाणी पोटात वेगाने पोहोचतं. यामुळे आपल्या पोटावर जास्त दबाव येतो.
पाण्याने प्रेशरने पोटात प्रवेश जातं तेव्हा, सर्व घाण मूत्राशयात जमा होते, ज्यामुळे किडनीचं गंभीर नुकसान होतं. पाण्याच्या प्रेशरचा बायोलॉजिकल सिस्टीवर परिणाम होतो..
उभं राहून पाणी पिण्याने फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. शरीरात अन्ननलिका आणि श्वासनलिकेत ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. नेहमी लोक उभं राहून पाणी पिणाऱ्याना फुफ्फुसांसह हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते.