बऱ्याच जणांना पालीला पाहुन भीती वाटते. पालीदेखील आरोग्यासाठी धोकादायक असतात. पालीची विष्ठा आणि लाळेमध्ये सल्मोनेला नावाचा बॅक्टरिया असतो. ज्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं. याशिवाय जेवणामध्ये पाल पडली तर, असं अन्न खाल्लास मृत्यूदेखील होऊ शकतो.
त्यामुळे घरांमधून पाली घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. घरात लहान मुलं असतील तर पेस्ट कंट्रोल करायला भीती वाटते. पाली घरामधून घालवण्यासाठी काही सोपे उपाय तुम्ही करू शकता.
लाल मिरची पावडर आणि काळी मिरी पावडर एकत्र करून पाण्यामध्ये मिसळून घरांमधल्या कोपऱ्यांमध्ये, खिडकी, दरवाजांवर याचा स्प्रे मारा. यामुळे पाली घरातून पळून जातील. मात्र हा स्प्रे करताना आपल्या अंगावर पडणार नाही किंवा डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या.
अंड्याच्या कवचामधून येणाऱ्या वासामुळे पाली पळून जातात. त्यामुळे अंड्याचं कवच घराच्या कोपऱ्यांमध्ये किंवा घराच्या वरच्या भागामध्ये ठेवून द्या.
पाल पळवण्यासाठी कॉफी पावडर देखील वापरता येते. कॉफी पावडरमध्ये तंबाखू टाकून छोटे छोटे गोळे तयार करा. पाली ज्या ठिकाणी फिरतात त्या ठिकाणी आणि ठेवून द्या.
लसणाला उग्र वास येतो. लसणाच्या पाकळ्या दरवाजे, खिडक्या आणि कोपऱ्यांमध्ये ठेवा. त्यामुळे पाली घरात येऊ शकणार नाहीत.