Home /News /lifestyle /

गावाचं नाव प्रचंड अश्लिल, गावकरी म्हणता आम्हाला कुठे सांगायलाही लाज वाटते, मग काय?

गावाचं नाव प्रचंड अश्लिल, गावकरी म्हणता आम्हाला कुठे सांगायलाही लाज वाटते, मग काय?

सोशल मीडियावर (Social Media) हे नाव आलं तर ते सेन्सॉर (Sensor) केलं जातं.

सोशल मीडियावर (Social Media) हे नाव आलं तर ते सेन्सॉर (Sensor) केलं जातं.

सोशल मीडियावर (Social Media) हे नाव आलं तर ते सेन्सॉर (Sensor) केलं जातं.

    मुंबई, 17 जानेवारी : आपला देश, आपलं गाव याचा प्रत्येकाला अगदी अभिमान असतो. परदेशात किंवा आपलं गाव सोडून दुसरीकडे गेल्यावर आपल्या गावाचं नाव ऐकलं, की प्रत्येकाला आनंद होतो, अभिमान वाटतो. गावांची नावं पूर्वापार चालत आलेली असतात. त्यामुळे त्यामागे एखादी परंपरा, इतिहास असतो. त्या गावाची ओळख त्यातून निर्माण झालेली असते. त्यामुळे गावाचं नाव (Village Name) बदलण्याची मागणी झाल्याचं फार क्वचित आढळतं; मात्र स्वीडनमधल्या (Sweden) एका गावातल्या नागरिकांवर सध्या आपल्या गावाचं नाव बदलून मिळण्याची मागणी करण्याची वेळ आली आहे. कारण या गावाचं नाव इतकं अजब आहे, की तिथल्या नागरिकांना ते खुलेआम सांगताना लाज वाटते. सोशल मीडियावर (Social Media) हे नाव आलं तर ते सेन्सॉर (Sensor) केलं जातं. त्यामुळे सोशल साइट्सवर या गावातल्या नागरिकांना आपल्या गावाचा उल्लेखही करता येत नाही. त्यामुळे आता इथल्या नागरिकांनी आपल्या गावाचं हे अजब नाव बदलण्याची परवानगी सरकारकडे मागितली असून, त्यासाठी एक मोहीमच सुरू केली आहे. 'झी न्यूज'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. 'डेली स्टार'मधल्या बातमीनुसार, स्वीडनमधील या गावाचं नाव चक्क 'फक' (Fucke) असं आहे. हा शब्द म्हणजे अत्यंत खालच्या पातळीवरची शिवी म्हणून वापरला जातो. आपल्या गावाचं नाव असं अजब असल्यानं इथल्या नागरिकांना कुठेही गावाचं नाव सांगायची वेळ आली की, अक्षरश: लाज वाटते. अनेक दशकांपासून या गावाला हे नाव आहे; मात्र आता सोशल मीडियामुळे सर्वत्र प्रसिद्धी होत असल्यानं इथल्या नागरिकांची चांगलीच अडचण होऊ लागली आहे. त्यांना सोशल मीडियावर आपल्या गावाचं नाव सांगता येत नाही. त्यामुळे गावाला नवीन नाव मिळावं अशी मागणी त्यांनी सरकारकडं केली असून, त्यासाठी मोहीमही सुरू केली आहे. गावकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन नाव बदलायचं की नाही, हा निर्णय नॅशनल लँड सर्व्हे अर्थात भूमापन विभागानं (National Land Survey) घ्यायचा आहे. अर्थात त्यांनाही अशा नाव बदलण्याच्या प्रकरणांमध्ये, नॅशनल हेरिटेज बोर्ड ऑफ स्वीडन (National Heritage Board of Sweden) आणि इन्स्टिट्यूट ऑफ लँग्वेज अँड फोकलोर यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावा लागतो. यापूर्वी फजुकबी (Fjuckby) नावाच्या गावानेही नाव बदलण्याची मागणी केली होती. तेव्हा त्या गावाचे नाव ऐतिहासिक (Historic) असल्याने ते बदलता येणार नाही, असा युक्तिवाद करूम भूमापन विभागाने ती मागणी फेटाळून लावली होती. या पार्श्वभूमीवर, 'फक' या गावाचं नावही अनेक दशकांपूर्वी ठेवण्यात आलं असल्यानं त्याच्या बाबतीतही हा विभाग असाच पवित्रा घेऊ शकतो, असं मानलं जात आहे; मात्र काहीही झालं तरी गावाच्या नामांतरणाची मोहीम (Name Change Mission) सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. स्वीडनमधल्या या छोट्याशा टुमदार गावात फक्त 11 घरं असून, गावाचं नाव बदलून 'दालस्रो' (Dalsro) ठेवावे, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. या शब्दाचा अर्थ शांत दरी असा आहे. गावाच्या 'फक' या नावात तशी कोणतीही अडचण नसली, तरी काही वेळा ती लाजिरवाणी बाब बनते. सोशल मीडिया साइट्सवर आम्ही त्याचा उल्लेखही करू शकत नाही. कारण सोशल मीडिया सेन्सॉरशिपमुळे आक्षेपार्ह किंवा अश्लील वाटणारी नावं काढून टाकली जातात. त्यामुळे आमच्या गावाचं नाव आलं, की ते काढून टाकलं जातं. फेसबुकवरही हाच प्रकार घडतो. त्यामुळे कोणतीही जाहिरात पोस्ट करता येत नाही. या सगळ्या अडचणींवर गावाचं नाव बदलणं हा एकच उपाय आहे, असं एका ग्रामस्थानं सांगितलं. त्यामुळे आता या गावाचं नाव बदलण्याबाबत काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
    First published:

    Tags: Sweden

    पुढील बातम्या