ताजेतवाने राहण्यासाठी लोकं मोसंबीच्या रसाचे सेवन आवर्जून करतात. मोसंबी अनेक पौष्टिक गुणांनी समृद्ध असते. त्यात सर्वाधिक व्हिटॅमिन सी आणि फायबर असते. बरेच लोक आजारी पडल्यानंतर अशक्तपणापासून मुक्त होण्यासाठी मोसंबीचा रस पितात. याचे कारण असे की मोसंबी च्या रसात पुष्कळ पोषक तत्वे असतात, जे आजारपणानंतर शरीरास मजबुती देतात. मोसंबी केवळ शक्तीच नाही देत, तर त्याचबरोबर त्याचे आणखीही बरेच फायदे आहेत. चला या फायद्यांविषयी जाणून घेऊया– वजन कमी करण्यास उपयुक्त myupchar.com शी संबंधीत डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या मते, रिकाम्या पोटी मोसंबीचा रस घेतल्यास वजन कमी होते. मोसंबी या फळामध्ये भरपूर प्रमाणात सी जीवनसत्व असते, जे चरबीचे ऑक्सिडेशन करण्याचे कार्य करते, त्यामुळे वजन कमी होते. याशिवाय ते शरीरातील इतर विषारी पदार्थ देखील बाहेर काढून टाकते. बद्धकोष्ठतेची समस्या निवार****ते ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी मोसंबीच्या रसाचे आवर्जून सेवन केले पाहिजे. मोसंबीमध्ये काही प्रमाणात अॅसिड देखील असते, जे शरीरातून विषारी द्रव्य काढून टाकण्यास मदत करते. मोसंबी मध्ये तंतुमय पदार्थ देखील लक्षणीय प्रमाणात असतात, जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करतात. पोटाच्या आतड्यांसाठी तंतुमय पदार्थ लाभदायक असतात. ते आतड्यांची स्वच्छता देखील करतात. हिरड्यांसाठी फायदेशीर चार चमचे मोसंबीचा रस, दोन चमचे पाणी आणि चिमूटभर मीठ मिसळून हिरड्यां वर लावल्यास हिरड्यांची सूज आणि त्यातील रक्तस्त्राव यासारख्या समस्या दूर होतात. याने हिरड्या मजबूत होतात कारण यात व्हिटॅमिन सी जीवनसत्त्वाचे अस्तित्व असते, जे नवीन पेशी तयार होण्यास मदत करते. डोळ्यांसाठी सर्वोत्कृष्ट औषध एका ग्लास साध्या पाण्यात मोसंबीच्या रसाचे 3-4 थेंब मिसळा. यानंतर तीन ते चार वेळा या पाण्याने डोळे धुवा. असे केल्याने डोळ्यांना संसर्ग होऊन डोळे येण्याची समस्या दूर होईल, आणि या पद्धतीने डोळ्यांना कोणत्याही प्रकारच्या संक्रमणापासून संरक्षण देखील मिळू शकेल. शरी****राच्या प्रतिकारशक्तीच्या प्रणालीसाठी फायदेशीर myupchar.com शी संबंधीत डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या म्हणण्यानुसार, सी जीवनसत्त्वे जास्त असल्याने मोसंबी फळांचा रस घेतल्यास शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी, दररोज एक ग्लास मोसंबीचा रस पिणे आवश्यक आहे, याने अनेक प्रकारचे संसर्गजन्य रोग आपणाला होणार नाहीत. दम्याच्या रूग्णांसाठी लाभदायक मोसंबीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि एंटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे दम्याच्या रूग्णांसाठी लाभदायक आहेत. दम्याच्या रूग्णांनी मोसंबीच्या रसात थोडे जिरे आणि आले घालून प्यावे, यामुळे दम्याच्या त्रासापासून आराम मिळतो. पचनशक्ती मजबूत करण्यात सहाय्य****क पोटाशी संबंधित अनेक त्रास उन्हाळ्यात सुरू होतात, जसे की अतिसार, अपचन, पित्त, बद्धकोष्ठता. फ्लेवोनॉईड नामक घटक मोसंबीमध्ये असतो, जो शरीराची पचनशक्ती मजबूत करून पोटाशी संबंधित सर्व रोगांपासून त्वरित आराम देते. कर्करोग प्रतिबंध मोसंबीमध्ये डी-लिमोनेन आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आढळतात. हे स्तनाच्या कर्करोगासारख्या आजारांना प्रतिबंधित करतात. नियमित मोसंबीच्या सेवनाने कर्करोगाची शक्यता 20% नी कमी होते असे मानले जाते. हंगामी रोगांपासून बचाव हवामानात बदल झाल्यामुळे बर्याचदा लोकांना सर्दी किंवा अॅलर्जीसारख्या समस्या उद्भवू लागतात. दररोज मोसंबीचा रस सेवन केल्याने ही समस्या लवकरच बरी होते. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - जीवनसत्त्व सी फायदे… न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.