मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Sweat Proof Makeup Tips : घाम आल्यानं सगळा मेकअप फिसकटतो? तयार होताना या आयडिया वापरा

Sweat Proof Makeup Tips : घाम आल्यानं सगळा मेकअप फिसकटतो? तयार होताना या आयडिया वापरा

तरुणींना या दिवसात मेकअप चांगला राखण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी (summer problem) लागते. घामामुळे मेकअप उतरतो आणि चेहऱ्यावर ठिकठिकाणी ठिपके दिसू लागतात. घामामुळे मेकअप उतरू नये, यासाठी उपाय जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 04 एप्रिल : उन्हाळ्यातील घाम, चिकचिकपणामुळं आपण त्रस्त होतो. कुठे बाहेर पडताना मेकअप (Makeup) करून जायचं झालं तरी तो मेकअप कितीवेळ राहील आणि विचित्र दिसू लागणार नाही, याची कोणतीही खात्री नसते. केलेला सुंदर मेकअप उन्हात बाहेर पडल्यानं पूर्ण बिघडतो. त्याचे स्पॉट चेहऱ्यावर दिसू लागतात. विशेषत: तरुणींना या दिवसात मेकअप चांगला राखण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी (summer problem) लागते. घामामुळे मेकअप उतरतो आणि चेहऱ्यावर ठिकठिकाणी ठिपके दिसू लागतात. घामामुळे मेकअप उतरू नये, यासाठी काय उपाय करता येतील याविषयी जाणून (Sweat Proof Makeup Tips) घेऊया. बर्फ लावा चेहरा धुतल्यानंतर 1-2 मिनिटे बर्फाचे तुकडे घेऊन ते चेहऱ्यावर हलक्या हातांनी चोळावेत. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर झटपट चमक तर येईलच, पण तुमच्या चेहऱ्यावरचा घामही कमी होईल. टोनिंग करा - जर तुम्हाला तुमचा मेकअप गुळगुळीत दिसत नसेल किंवा घामामुळे चेहऱ्यावर ठिपके दिसत असतील, तर तुम्ही चेहरा धुतल्यानंतर टोनिंग करणे आवश्यक आहे. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहील. हे वाचा - शुगर कंट्रोलसाठी या पानांचा काढा आहे गुणकारी; अशा पद्धतीनं बनवा घरच्या घरी कोरफड जेल - टोनिंग केल्यानंतर आणि मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावणे चांगले. एलोवेरा जेल लावल्याने तुम्हाला घाम कमी येतो आणि त्वचा हायड्रेट राहते. हे वाचा - लघवीदरम्यान या चुका ठरू शकतात घातक, महिलांनी अधिक घ्या काळजी जेल सनस्क्रीन - जेल सनस्क्रीन लावल्याने तुम्हाला कमी घाम येईल. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी 15-20 मिनिटे सनस्क्रीन लावा जेणेकरून मेकअप चेहऱ्यावर व्यवस्थित लावता येईल. यामुळे त्वचेला टॅनिंग होण्यापासूनही संरक्षण मिळेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Beauty tips, Skin care, Summer hot

पुढील बातम्या