Home /News /lifestyle /

या देशात फोफावतोय Surrogacy चा व्यवसाय! गर्भाशय भाड्याने देण्यासाठी महिलांना मिळतात इतके पैसे?

या देशात फोफावतोय Surrogacy चा व्यवसाय! गर्भाशय भाड्याने देण्यासाठी महिलांना मिळतात इतके पैसे?

युक्रेनमध्ये (Ukrain) सरोगसीला (Surrogacy) कायदेशीर मान्यता मिळाल्यामुळे येथे दरवर्षी हजारो मुलांना जन्म दिला जातो. याच कारणामुळे हा देश सरोगसीचे केंद्र बनत आहे. युक्रेनच्या सर्व कंपन्या या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. यासाठी प्रमोशनल व्हिडिओ आणि इव्हेंट्स प्ले केले जातात.

पुढे वाचा ...
  मुंबई, 25 जानेवारी : आई (Mother) होणे ही प्रत्येक स्त्रीसाठी खूप आनंदाची बाब असते. मात्र, अनेक कारणांमुळे काही महिलांना आई होता येत नाही. अशा परिस्थितीत अनेक महिला सरोगसीच्या माध्यमातून आई होतात. जगभरात अशी अनेक जोडपी आहेत जी सरोगसीचा पर्याय निवडतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा देशाविषयी सांगणार आहोत जिथे सरोगसी व्यवसायाप्रमाणे चालवली जात आहे. सोबतच भारतात सरोगसी (Surrogacy) विषयी काय परिस्थिती आहे? चला जाणून घेऊ. गेल्या काही वर्षांत पालक होण्याची इच्छा बाळगणारे बरेच लोक या देशात जात आहेत. आम्ही बोलत आहोत तो देश आहे युक्रेन. युक्रेनमध्ये सरोगसीला कायदेशीर मान्यता मिळाल्यामुळे येथे दरवर्षी हजारो मुलांना जन्म दिला जातो. याच कारणामुळे हा देश सरोगसीचा कारखाना म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे. सरोगेट मदर बनण्यासाठी महिलांना दर महिन्याला दिले जातात पैसे युक्रेनच्या सर्व कंपन्या या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. यासाठी प्रमोशनल व्हिडिओ आणि इव्हेंट्स चालवले जातात, ज्यामध्ये मुलांसह आनंदी जोडप्यांना पाहून लोक आकर्षित होतात. ज्या स्त्रिया स्वतःच्या इच्छेने सरोगेट बनतात, त्यांना कंपन्या एकदा गरोदर राहिल्याबद्दल 11,000 (सुमारे 8 लाख रुपये) देतात आणि त्याव्यतिरिक्त 250 डॉलर (सुमारे 18,000 रुपये) दरमहा स्टायपेंड म्हणून देतात. 2002 मध्ये कायदेशीर मान्यता मिळाल्यापासून, अनेक परदेशी जोडपी परवडणाऱ्या सरोगसी सेवांच्या शोधात युक्रेनमध्ये जात आहेत. येथे सरासरी पॅकेजची किंमत सुमारे 30,000 डॉलर (अंदाजे 22 ते 23 लाख रुपये) आहे.
  Photo: AFP_Relaxnews / vgajic / Istock.com
  2015 पासून भारत, नेपाळ, बांग्लादेश यासह अनेक देशांमध्ये व्यावसायिक सरोगसीबाबत कठोर नियम करण्यात आले आहे. अशात युक्रेनमध्ये याला कायदेशीर मान्यता मिळणे ही ज्या जोडप्यांना मुले होऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. युक्रेनमध्ये सरोगसीचे प्रमाण इतके वाढले आहे की येथील आरोग्य मंत्रालयही सरोगेट मातांच्या संख्येची आकडेवारी देऊ शकत नाही. Surrogacy मध्ये जैविक आई-वडील कोण असतात? सेक्सशिवाय मूल कसे जन्माला येते? युक्रेनमध्ये दरवर्षी 2,000 ते 2,500 मुले सरोगसीद्वारे जन्मतात वैद्यकीय आणि पुनरुत्पादक क्षेत्रात तज्ञ असलेले कीव-आधारित वकील सेर्गेई अँटोनोव्ह यांच्या मते, युक्रेनमध्ये दरवर्षी 2,000 ते 2,500 बालकांचा जन्म सरोगसीद्वारे होतो. त्यापैकी जवळपास निम्मे बायोटेक्सकॉमच्या माध्यमातून आहेत. मुलांची मागणी असणाऱ्यांपैकी एक तृतीयांश चीनमधील आहेत. अँटोनोव्ह म्हणतात की मुलांची मागणी जसजशी वाढत आहे, तसतसे सरोगेट मातांचे शोषण होत असल्याच्याही बातम्या येत आहेत. युक्रेनमधील सरोगेट मातांची परिस्थिती धक्का देईल सरोगेट बनण्याचा निर्णय घेणाऱ्या अनेक स्त्रिया म्हणतात की त्यांच्यासाठी परिस्थिती खूप वाईट आहे. त्यांना कधीकधी इतर सरोगेट मातांसोबत बेड शेअर करायला भाग पाडले जाते. बहुतेक स्त्रिया छोट्या गावातून आलेल्या आहेत आणि हताश परिस्थितीत आहेत. या महिलांना निर्धारित रक्कम दिली जात नाही आणि गर्भधारणेनंतर त्यांना अत्यंत बिकट परिस्थितीत ठेवले जाते. या महिलांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलूही दिले जात नाही. काही प्रकरणांमध्ये पालकांना असे आढळून आले आहे की त्यांचा सरोगेटपासून जन्मलेल्या मुलांशी कोणताही अनुवांशिक संबंध नाही. काही रुग्णालये बेकायदेशीर व्यावसायिक दत्तकांना लपवण्यासाठी सरोगसीचा वापर करत असल्याचाही अधिकाऱ्यांना संशय आहे. देशाच्या आयुक्तांपैकी एक, मायकोला कुलेबा यांनी इशारा दिला की "युक्रेन एक आंतरराष्ट्रीय ऑनलाइन बेबी स्टोअर बनत आहे". युक्रेनमधील महिलांच्या या शोषणाचा त्यांनी निषेध केला असून या व्यवसायावर बंदी घालण्याची मागणीही केली आहे.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Pregnancy, Pregnant, Surrogacy

  पुढील बातम्या