मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Inspiration! खड्ड्यात गेलेल्या कंपनीची या महिलेने करून दाखवली करोडो डॉलरची उलाढाल

Inspiration! खड्ड्यात गेलेल्या कंपनीची या महिलेने करून दाखवली करोडो डॉलरची उलाढाल

वीमिओ कंपनीच्या सीईओ अंजली सूद यांच्या यशाची कहाणी

वीमिओ कंपनीच्या सीईओ अंजली सूद यांच्या यशाची कहाणी

वीमिओ कंपनीच्या सीईओ अंजली सूद (Anjali Sood,CEO of Vimeo Company) यांनी काही वर्षांपूर्वी कंपनीला तोट्यातून (Loss) काढत 1 अब्ज डॉलर्सच्या कंपनीत रुपांतरीत केलं आणि या आठवड्यात कंपनीने नासडॅकसह नवीन सुरुवात केली..

दिल्ली, 28 मे: यश आणि अपयश (Success and Failure) आयुष्याचा भाग आहेत. प्रत्येक वेळी माणूस यश मिळवतो असं नाही. तसच, अपयशही फार काळ टिकत नसतं. पण, म्हणून माणूस प्रयत्न करणं थांबवत नसतो. आयुष्यातली अशीच अडथळ्यांची शर्यत  पूर्ण करत. त्या शिखरावर आपण पोहचलो की तिथून जगाकडे पाहताना या प्रवासात घेतलेल्या अपार कष्टांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. असे काहीसे भाव वीमिओ कंपनीच्या सीईओ अंजली सूद (Anjali Sood,CEO of Vimeo Company) यांच्या मनात असतील.

खड्ड्यात रुतलेली कंपनी करोडोंची झेप घेण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनात घ्यावी लागली आहे. वीमियो ही एक व्हीडिओ कंपनी (Vimeo Video Company) आहे. जिचा वापर काही वर्षआधी केला जात होता. त्यावेळी वीमिओमध्ये अनेक तृटी होत्या. त्यावर व्हीडिओ पाहताना अडचणी यायच्या. त्यातच नेटफ्लिक्स (Netflix) आणि युट्यूबच्या (You Tube) जमान्यात टिकून राहणं वीमियो व्हीडिओ कंपनीला कठीण झालं होतं.

पण, फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घेत वीमिओ व्हीडिओ कंपनीने मागच्या काही वर्षात प्रगती केली आहे. महत्वाचं म्हणचे कंपनीच्या या यशात एका भारतीय वंशाच्या महिलेचा सिंहाचा वाटा आहे. त्या महिलेचं नाव आहे अंजली सूद. अंजली या कंपनीच्या सीईओ आहेत. त्यांनी एक आठवड्यापूर्वी नॅस्डेक कंपनीसोबत आपल्या नव्या प्रवासाला सुरूवात केली आहे. याची माहिती त्यांनीट ट्वीटरवरून दिली आहे.

अंजली सूद यांचा जन्म मिशिगनमध्ये डेट्रॉइट इथे झाला. त्यांनी 2005 मध्ये पेन्सिलवेनिया विश्वविद्यालयाच्या व्हार्टन स्कूल (Wharton School of the University of Pennsylvania) मधून फायनान्स ऍन्ड मॅनेजमेन्टमध्ये (Finance and Management) बीएससी केल. त्यानंतर 2011 मध्ये हार्वर्ड बिजनेस स्कूलमधून (Harvard Business School) एमबीए केलं.

(‘OTT मुळं संपली सुपरस्टार्सची मक्तेदारी’; तमन्नानं का केलं वेब सीरिजमध्ये काम?)

त्यानंतर ऍडवायजर, अमेझॉन आणि टाईम वॉर्नर सारख्या कंपनीत काम केल्यावर 2014ला वीमिओ जॉईन केली. 6 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी वीमिओला एक अब्ज डॉलरची कंपनी बनवलं आहे.

(शाहरुखचा मुलगा अबराम झाला 8 वर्षांचा; पाहा त्याचे Cute Photos)

नुकतंच त्यांनी आपल्या मुलाबरोबर पोटो शेअर केला आहे. त्यांची कंपनी आता पब्लीक कंपनी झाली आहे. त्याची अनाऊन्समेंट होण्याआधी हा फोटो काढलेला आहे. त्याआधीही अंजली यांनी वीमिओच्या सीईओ आणि आपला मुलगा सावन याची आई अशीच ओळख करून दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Inspection, Inspiring story, Success stories, Success story