Home /News /lifestyle /

Alert: 5 दिवसांत तुमच्या गाडीसाठी FASTag रिचार्ज केला नाही तर Toll नाक्यावरच अडकाल; काय आहे नवीन नियम?

Alert: 5 दिवसांत तुमच्या गाडीसाठी FASTag रिचार्ज केला नाही तर Toll नाक्यावरच अडकाल; काय आहे नवीन नियम?

नवीन वर्षापासून सर्व वाहनांसाठी FASTag आवश्यक असेल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा सांगितलं आहे. 1 जानेवारीपासून नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

    नवी दिल्ली, 25 डिसेंबर:  नवीन वर्षापासून सर्व वाहनांसाठी FASTag आवश्यक असेल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा सांगितलं आहे. डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देण्यासाठी आणि टोल प्लाझावर लांब रांगा टाळण्यासाठी ही प्रणाली आवश्यक आहे. सरकारच्या या घोषणेनंतर सर्व वाहनांसाठी FASTag अनिवार्य करण्यात आलं आहे. अशावेळी आपल्याला FASTag रिचार्ज करण्याविषयीची पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. FASTag रिचार्ज नियम काय आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिलेल्या माहितीनुसार, ज्या बॅंकेतून FASTag खरेदी केलं आहे,  त्याच बॅंकतून तुम्हा FASTag रिचार्ज करावा लागेल. जर ग्राहकाने दुसर्‍या बँकेतून FASTag रिचार्ज केला तर त्यासाठी 2.5 टक्के लोडिंग शुल्क आकारलं जाईल. म्हणजेच तुम्ही दुसऱ्या बॅकेतून 1000 रुपयांचा FASTag रिचार्ज केला तर तुम्हाला 25 रुपये अधिक भरावे लागतील. त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्या बॅंकेची FASTag सुविधा आवडली नाही, तर तुम्ही ती मोबाइल नंबरप्रमाणे ही सेवा पोर्ट करू शकता. शिवाय अगोदर खरेदी केलेल्या बँकेला किंवा एजन्सीला तुम्ही FASTag परत करू शकता आणि पून्हा दुसर्‍या बँकेतून FASTag खरेदी करू शकता. पण एकदा FASTag खरेदी केल्यानंतर तुम्हाला तीन महिन्यांनंतरच ही सेवा पोर्ट करता येईल. येथून FASTag सुविधा खरेदी करू शकता SBI, ICICI, HDFC, AXIS बँक अशा जवळपास देशातील सर्व प्रमुख सरकारी आणि खाजगी बँकांमधून  FASTag सुविधा खरेदी करता येऊ शकते. अमेझॉन आणि पेटीएमद्वारेही ऑनलाइन पद्धतीने FASTag खरेदी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर मोठ्या पेट्रोल पंपांवर देखील FASTag खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. 1 जानेवारी 2021 पासून टोल प्लाझामधील सर्व कॅश लेनचे रुपांतर FASTag लेनमध्ये केले जाईल. 1 जानेवारीपासून देशातील कोणत्याही टोलनाक्यांवर रोख रक्कम स्विकारली जाणार नाही. जर तुमच्या  वाहनाला FASTag नसेल तर तुमचं वाहन टोलमधून पुढे जाऊ शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला कारमधून बाहेर उतरून एक विशेष सेवा वापरावी लागेल. त्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं  प्री-पेड टच अँड गो कार्ड वापरावं लागेल. त्यासाठी टोल प्लाझावर 1 जानेवारीपासून सर्व हायब्रीड लेनवर प्री-पेड कार्ड सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Nitin gadkari, Toll

    पुढील बातम्या