सकाळच्या वेळी हेल्दी नाश्ता हवा म्हणून पराठा खाऊ नये. पराठा तेलकट असतो. सकाळच्यावेळी तेलकट पदार्थ खाल्ल्याने पोटाला त्रास होतो. या प्रमाणेच ब्रेड सुद्धा खाऊ नये. ब्रेड खाल्ल्याने पोट भरतं पण, ब्रेड पचायला जड असतो. त्यामुळे पोटात गॅस होण्याची शक्यता असते.
केळं शरीराला तात्काळ उर्जा देणाऱ्या आहारापैकी एक आहे. यामुळे बद्धकोष्ठतेसारखे त्रास होत नाहीत पण, सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये केळ खाणं योग्य नाही. याने मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचं संतुलन बिघडतं. यामुळे अॅसिडिटी वाढू शकते.
दही आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. मात्र सकाळच्या वेळी दही खाण्य़ाने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. सकाळी केळं खाल्याने पोटात अॅसिड वाढू शकतं. याशिवाय दह्यात पित्त वाढवणारे घटक असतात. सकाळी खाल्ल्यास कफ वाढून खोकला होऊ शकतो.
कच्चा टॅमेटो रोज खायला हवा. पण, सकाळी रिकामं पोट असताना खाऊ नये. यात मोठ्या प्रमाणात आम्ल असतं. सकाळी खाल्ल्याने अॅसिडिटी, छातीत जळजळ, पोटदुखी, गॅस सारखे त्रास होऊ शकतात.
संत्र, लिंबू, मोसंबी सारखी आंबट फळं आणि लोणचं, चटणी सकाळच्या वेळी खाऊ नये. यामुळे अॅसिडिटी वाढून छातीत जळजळ होते.