मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /लक्षणे दिसण्यापूर्वी कोरोना आहे की नाही सांगेल हे Smartwatch - नवीन संशोधन 

लक्षणे दिसण्यापूर्वी कोरोना आहे की नाही सांगेल हे Smartwatch - नवीन संशोधन 

Smartwatch will detect corona : अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी कोरोना लवकर ओळखण्यासाठी myPhD हे मोबाईल अ‌ॅप तयार केलंय, जे स्मार्टवॉच किंवा फिटनेस ट्रॅकरच्या डेटावरून तुम्हाला वेळेत कोरोनाबद्दल माहिती देईल.

Smartwatch will detect corona : अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी कोरोना लवकर ओळखण्यासाठी myPhD हे मोबाईल अ‌ॅप तयार केलंय, जे स्मार्टवॉच किंवा फिटनेस ट्रॅकरच्या डेटावरून तुम्हाला वेळेत कोरोनाबद्दल माहिती देईल.

Smartwatch will detect corona : अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी कोरोना लवकर ओळखण्यासाठी myPhD हे मोबाईल अ‌ॅप तयार केलंय, जे स्मार्टवॉच किंवा फिटनेस ट्रॅकरच्या डेटावरून तुम्हाला वेळेत कोरोनाबद्दल माहिती देईल.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 04 डिसेंबर : अलिकडे स्मार्टवॉच किंवा फिटनेस ट्रॅकर वापरण्याचा ट्रेंड आहे. ही गॅजेट्स तुम्हाला आतापर्यंत तुम्ही किती पावले चाललात, किती वेळ झोपलात किंवा सकाळच्या व्यायामादरम्यान तुमची हृदय गती किती होती हे सांगतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की आता या माहितीच्या आधारे तुम्हाला लक्षणं दिसण्यापूर्वीच तुम्हाला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे देखील कळू शकतं? होय, हे शक्य आहे. ही सर्व माहिती तुम्ही तुमच्या स्मार्टवॉचमधूनच (Smartwatch will detect corona) मिळवू शकता.

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी कोरोना लवकर ओळखण्यासाठी myPhD हे मोबाईल अ‌ॅप तयार केलंय, जे स्मार्टवॉच किंवा फिटनेस ट्रॅकरच्या डेटावरून तुम्हाला वेळेत कोरोनाबद्दल माहिती देईल.

शास्त्रज्ञांचा दावा आहे की, या अ‌ॅपद्वारे 80 टक्के वापरकर्त्यांमध्ये कोरोना संसर्ग असल्याचं कोरोना चाचणी करण्यापूर्वीच आढळून आलंय. या अभ्यासाचे निष्कर्ष नेचर मेडिसीन (nature medicine) या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

अभ्यास कसा झाला?

या अभ्यासासाठी संशोधकांनी 18 ते 80 वयोगटातील 3300 प्रौढांच्या अँड्रॉइड किंवा अ‌ॅपल मोबाईल्समध्ये हे अ‌ॅप इन्स्टॉल केलं. अ‌ॅपनं प्रौढांकडे आधीपासून असलेल्या मनगटांवरील उपकरणांमधून (wearables device) डेटा गोळा केला. म्हणजेच, स्मार्ट घड्याळं किंवा फिटनेस ट्रॅकर यांनी तो सुरक्षित क्लाउड सर्व्हरवर पाठवला. संशोधक या क्लाउड सर्व्हरवरील डेटाचे विश्लेषण करू शकतात.

हे अ‌ॅप फिटबिट (Fitbit), अ‌ॅपल वॉच (Apple Watch), गार्मिन डिव्हाइसेस (Garmin Devices) आणि इतर गॅझेट्समध्ये वापरलं गेलं. शास्त्रज्ञांनी सहभागींनी चाललेल्या पावलांची संख्या, हृदय गती आणि झोपेच्या पद्धतींमध्ये बदल पाहण्यासाठी अल्गोरिदम (Algorithm) वापरला. अपेक्षेपेक्षा वेगळा बदल आढळल्यास अल्गोरिदम सूचना पाठवतो.

हे वाचा - Mental Health : काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात नाहीयेत; या 5 उपायांनी त्यांना पळवून लावा

हृदय गती डेटा

या अभ्यासात, हृदयाच्या गतीमध्ये होणारे बदल, एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती (Immune System) आणि हृदयाचे ठोके (Heart Beat) एकमेकांशी कसे संबंधित आहेत, हे तपशीलवारपणे स्पष्ट केलंय. कोरोनाबाधित वापरकर्त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये कमी बदल दिसून येतो. तर, कोरोना निगेटिव्ह वापरकर्त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये बदल दिसून येतो. हृदयगतीमध्ये अधिक परिवर्तनशीलता सूचित करते की, वापरकर्त्याची मज्जासंस्था (Nervous System) खूप सक्रिय आहे. तणावाचा सामना करण्यासाठी ते अधिक प्रभावी ठरू शकतं.

हे वाचा - स्मार्ट फोन वापरणाऱ्यांना जागं करणारी बातमी! तुमचा लोकेशन डेटा करोडो-अब्ज रुपयांना कसा विकला जातो?

3 दिवसांपूर्वी अलर्ट

या अभ्यासादरम्यान, 2155 हून अधिक वापरकर्त्यांना नोव्हेंबर 2020 ते जुलै 2021 पर्यंत दररोज रिअल-टाइम अलर्ट प्राप्त झाले. तसेच, 2117 सहभागींनी किमान एक सर्वेक्षण पूर्ण केले. या 278 लोकांपैकी ज्यांना संसर्गाचा इशारा मिळाला होता, त्यापैकी 84 सहभागींनी फिटबिट किंवा ऍपल वॉच घातली होती. यापैकी 60 लोकांना संसर्गाची शक्यता सूचित करणारे अलर्ट मिळाले. या स्मार्टवॉचच्या माध्यमातून या लोकांमध्ये लक्षणं दिसण्याच्या 3 दिवस आधी असामान्य वाचन आढळून आलं.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Smartwatch