मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बापरे! 250 ml ज्यूसमध्ये एवढी साखर; झपाट्याने वाढतं वजन अन् मधुमेहाचाही धोका!

बापरे! 250 ml ज्यूसमध्ये एवढी साखर; झपाट्याने वाढतं वजन अन् मधुमेहाचाही धोका!

 हे ज्यूस आरोग्यासाठी (Health) हानिकारक ठरू शकतं. सातत्याने हे ज्यूस प्यायल्यास डायबेटीस, कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो.

हे ज्यूस आरोग्यासाठी (Health) हानिकारक ठरू शकतं. सातत्याने हे ज्यूस प्यायल्यास डायबेटीस, कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो.

हे ज्यूस आरोग्यासाठी (Health) हानिकारक ठरू शकतं. सातत्याने हे ज्यूस प्यायल्यास डायबेटीस, कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो.

    नवी दिल्ली, 14 एप्रिल : सध्या तीव्र उन्हाळा जाणवत आहे. उकाड्यामुळे (Heat) नागरिक हैराण झाले आहेत. उष्म्यापासून दिलासा मिळावा यासाठी बहुतांश नागरिक घरात, कार्यालयांमध्ये पंखे, कूलर किंवा एसीचा वापर करत आहेत. याव्यतिरिक्त उन्हाळ्यात गारवा मिळावा यासाठी ज्यूस, आइस्क्रीम, सरबतं आदींचा आस्वाद घेण्याकडेही नागरिकांचा कल वाढतो. बाजारात विविध फळांची सरबतं, ज्यूसेस उपलब्ध असतात.

    काही जण दुकानांमध्ये मिळणारं पॅकबंद (Packed Juice) अथवा टेट्रा पॅकमध्ये मिळणारे ज्यूस पिण्यास प्राधान्य देतात, तर काही जण रस्त्यावरच्या गाड्यांवर मिळणाऱ्या ज्यूस, सरबतावर समाधान मानतात. या दिवसांत प्रामुख्याने तरुणाईचा कल टेट्रा पॅकमधलं (Tetra Pack) ज्यूस पिण्याकडे अधिक असतो. परंतु, हे ज्यूस आरोग्यासाठी (Health) हानिकारक ठरू शकतं. सातत्याने हे ज्यूस प्यायल्यास डायबेटीस, कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो, असं संशोधनातून समोर आलं आहे. याविषयीची माहिती देणारं वृत्त `दैनिक भास्कर`ने दिलं आहे.

    उन्हाच्या काहिलीत गारवा मिळावा यासाठी ज्यूस, सरबतं सहज प्यायली जातात. बाजारात मिळणारं टेट्रा पॅकमधलं फ्रूट ज्यूस प्राधान्यानं खरेदी केलं जातं. रिअल फ्रूट ज्यूस पिणं अधिक फायदेशीर असतं. कारण त्यात फळांचा (Fruit) रस असतो. कोल्ड्रिंक्सच्या तुलनेत हे ज्यूस अधिक चांगले असतात. कारण त्यात किमान फळांचा रस तरी असतो. टेट्रा पॅकमधले ज्यूस दीर्घकाळ फ्रीजमध्ये ठेवता येतात. यात फळांसह भाज्यांच्या रसांचंही मिश्रण असतं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हे ज्यूस जास्त हायजेनिक असतात. त्यामुळे आरोग्याला अपाय होत नाही, असं काही जणांचं मत असतं; पण खरंच वस्तुस्थिती तशी असते का? या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. याबद्दल अधिक जाणून घेऊ या.

    बारकाईने पाहायला गेलं, तर सॉफ्ट ड्रिंक (Soft Drink) असोत किंवा पॅकबंद फ्रूट ज्यूस या दोन्ही गोष्टी शरीराला अपायकारक असतात. यामुळे पोटाशी संबंधित आजार, किडनी निकामी होणं, डायबेटीस, हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, लठ्ठपणा आदी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. अमेरिकेत विक्री होणाऱ्या 45 प्रसिद्ध ब्रँड्सच्या फ्रूट ज्यूसची चाचणी केली असता, त्यात कॅडमियम, अजैविक आर्सेनिक आणि पारा किंवा शिसं हे घटक आढळून आले आहेत. या गोष्टी आरोग्यासाठी घातक आहेत. यापैकी बहुतांश ज्यूसमध्ये धातूचं प्रमाण जास्त होतं. सात ब्रँड्सचं ज्यूस तर प्रत्येक स्तरावर अयशस्वी ठरलं. याशिवाय बाजारात विक्री होणाऱ्या पॅकबंद ज्यूसमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह (Preservative) आणि साखरेचं (Sugar) प्रमाण जास्त असतं. हे ज्यूस दीर्घ काळ टिकावेत यासाठी रसायनांचा (Chemical) वापर केलेला असतो. फळांची नैसर्गिक चव यावी यासाठी फ्लेवर (Flavor) वापरले जातात, असं कंझ्युमर रिपोर्ट्सच्या एका अभ्यासात आढळून आलं आहे.

    सॉफ्ट ड्रिंकच्या तुलनेत पॅकबंद फ्रूट ज्यूस अधिक चांगले असतात, हा समज चुकीचा आहे. पॅकबंद फ्रूट ज्यूस प्रमाणापेक्षा अधिक प्यायल्यास डायबेटीसचा (Diabetes) धोका वाढतो. फ्रूट ज्यूस आणि सॉफ्ट ड्रिंक या दोन्हीतही एनर्जी डेन्सिटी शुगरचं प्रमाण समान असतं, असं ग्लासगो युनिव्हर्सिटीच्या कार्डिओव्हॅस्क्युलर आणि वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

    हे ही वाचा-छोटंस दिसणारं हे फळ किडनी, फुफ्फुसांसह त्वचा विकारांवरही आहे भारी; जाणून घ्या फायदे

    250 मिलीच्या एका ग्लासमध्ये पॅकबंद फ्रूट ज्यूस आणि दुसऱ्या ग्लासमध्ये कोला टाकून त्याचं परीक्षण केलं असता, पॅकबंद फ्रूट ज्यूसमध्ये 110 किलोकॅलरीज आणि 26 ग्रॅम साखर, तर कोल्ड्रिंक्समध्ये 105 किलोकॅलरीज (Calories) आणि 26.5 ग्रॅम साखर असल्याचं दिसून आलं. 26 ग्रॅम साखरेचं प्रमाण म्हणजे सुमारे 6 मोठे चमचे होतात. याचाच अर्थ 1 ग्लास पॅकबंद ज्यूस प्यायलं तर तुम्ही एकावेळी 6 चमचे साखर सेवन करता. हे प्रमाण कायम राहिलं तर लिव्हर, किडनी आणि डोळ्यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

    हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधनानुसार, नॉर्मल कोल्ड्रिंक असो अथवा डाएट ड्रिंक हे दोन्ही सातत्यानं प्यायल्यामुळे दर वर्षी जगभरात दोन लाखांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू होतो. सुमारे दीड लाख जणांना डायबेटीस होतो. 6000 जण कॅन्सरला बळी पडतात आणि 44000 जणांना हृदयविकाराची समस्या सुरू होते.

    याबाबत फूड, लाइफस्टाइल आणि वेलनेस तज्ज्ञ डॉ. सिद्धांत भार्गव यांनी सांगितलं, `टेट्रा पॅकमधली म्हणजेच पॅकबंद फ्रूट ज्यूसेस प्यायल्यामुळे लहान मुलांना आजार होऊ शकतात. या ज्यूसमध्ये कोणतीही पोषक तत्त्वं किंवा फायबर नसतात. यात साखरेचं प्रमाण आणि कॅलरीज अधिक असतात. यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. डबाबंद फ्रूट ज्यूसमध्ये फळांचं प्रमाण केवळ 25 टक्के असतं. तसंच त्यात फळांचे फ्लेवर्स वापरले जातात. यात कॅडमियम, कार्बनिक, आर्सेनिक, पारा किंवा शिसं आढळून येतं. याचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. वाढत्या वयात मेंदूचा विकास होण्यास अडचणी निर्माण होतात.`

    पॅकबंद, डबाबंद फ्रूट ज्यूसऐवजी घरी बनवलेलं ताज्या फळांचं ज्यूस (Fresh Fruit Juice) आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतं. कारण, त्यात फायबर्स असल्याने रक्त स्वच्छ राहतं. त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारतं. बद्धकोष्ठता आणि पाण्याची कमतरता दूर होते. व्हिटॅमिन्स आणि मिनरलमुळे उत्साह जाणवतो. ताजं ज्यूस हे अँटी-एजिंग घटकाप्रमाणे काम करतं. तसंच हे ज्यूस पचनास हलकं असतं. त्यामुळे कृत्रिम गोष्टींचा आणि साखरेचा अतिवापर करून तयार केलल्या ज्यूसपेक्षा घरी तयार केलेलं ज्यूस हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

    First published:

    Tags: Health Tips, Sugar, Weight gain, Weight loss