नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : कोरोना टाळण्यासाठी अधिक काढा पिणे देखील हानिकारक असल्याचे सिद्ध होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशातील रुग्णालयांमध्ये मूत्रपिंड आणि यकृताच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये मूत्रपिंडाच्या रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. देशातील सर्वात मोठ्या हॉस्पिटल ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मध्येही लघवीशी संबंधित रुग्ण येऊ लागले आहेत. दिल्ली सरकारचे सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या एलएनजेपीचीही अशीच स्थिती आहे. अनेक राज्यांच्या प्रमुख रुग्णालयांमध्येही मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्या असलेले रुग्ण येत आहेत.
कोरोनाचा (Coronavirus) कहर आणि भीती लक्षात घेता लोकांनी काढा पिण्याचे प्रमाण प्रचंड वाढवले आहे. अलिकडे जवळजवळ प्रत्येक घरात काढा प्यायला जातो. आयुर्वेदात काढा पिणं
(Drinking kadha during corona period) आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. परंतु काढा जास्त प्रमाणात पिणं
(Side Effects of Drinking Kadha) शरीरासाठी हानिकारक ठरत आहे. हे लक्षात घेऊन डॉक्टरांनी कोरोना टाळण्यासाठी अधिक काढा पिणाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
डॉक्टरांच्या मते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या अनावश्यक औषधांचा वापर वाढवल्यानं शरीर दुखणे आणि अस्वस्थतेच्या तक्रारी करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. बहुतेक रुग्णांमध्ये सीरम क्रिएटिनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे मूत्रपिंड खराब होण्यासारखी गंभीर बाब दिसून येत आहे.
किडनीच्या आजारांचे तज्ज्ञ डॉ. राजेश कुमार म्हणतात की, हे काढा (Side Effects of Drinking Kadha) हा गरम असतो आणि तो जास्त प्रमाणात प्यायल्याने तोंड आणि पोटात अल्सर होऊ शकतो. दालचिनी, गिलोय, काळी मिरी सारख्या गोष्टींच्या प्रमाणामुळे पोटदुखी, छातीत जळजळ किंवा अॅसिडिटी सारख्या समस्या सुरू होतात. जर त्याचे उपचार वेळेवर सुरू झाले नाहीत तर मूत्रपिंड (किडनी) खराब होण्याची शक्यता वाढते. जास्त प्रमाणात काढा घेणे यकृतासाठी देखील हानिकारक आहे.
हे वाचा -
नोटबंदीनंतरही बनावट नोटांचा सुळसुळाट; महाराष्ट्रातील Fake नोटांचा आकडा पाहून संताप होईल!
जास्त प्रमाणात काढा पिण्याचे दुष्परिणाम
डॉक्टरांच्या मते, जास्त प्रमाणात काढा पिण्यामुळे नाकातून रक्तस्त्राव, आंबट ढेकर आणि लघवीमध्ये समस्या यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. विशेषत: लघवीमध्ये संसर्ग झाल्यामुळे, मूत्रपिंड संक्रमणाचा धोका देखील वाढतो. ज्यांना आधीच हृदयाशी संबंधित आजार आहेत आणि ते रक्त पातळ करणारी औषधे घेतात, त्यांना अधिक काढ्याच्या वापरामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.
हे वाचा - Shocking! स्वस्त साबण पडला महागात; अचानक पेट घेतल्यानं 4 वर्षीय मुलाची झाली भयंकर अवस्था
दिल्ली-एनसीआरसह बिहारच्या अनेक मोठ्या रुग्णालयांमध्ये मेडिसिन ओपीडीमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या समुपदेशनात, लोक कोरोनापासून बचाव करण्यासाठी जास्त प्रमाणात काढा पिण्याविषयी बोलत आहेत. जर अशा रुग्णांना किडनीच्या आजाराबरोबरच कोरोनाची लागण झाली तर त्यांचे आयुष्य धोक्यात येण्याची शक्यताही वाढते. डॉक्टरांच्या समुपदेशनात असे आढळून आले आहे की, सुमारे 90 टक्के लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काढ्याचे सेवन केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.