Home /News /lifestyle /

गर्भाशयात नव्हे तर महिलेच्या लिवरमध्ये झाली होती गर्भधारणा; अल्ट्रासाउंडचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले

गर्भाशयात नव्हे तर महिलेच्या लिवरमध्ये झाली होती गर्भधारणा; अल्ट्रासाउंडचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले

महिला गर्भवती असल्याची डॉक्टरांनाही खात्री होती. तरीही खात्री करण्यासाठी डॉक्टरांनी महिलेचे अल्ट्रासाऊंड (Ultrasound test) केले. या अल्ट्रासाऊंडच्या अहवालाने डॉक्टरांसह महिलेलाही आश्चर्याचा धक्का बसला.

    नवी दिल्ली, 16 डिसेंबर : आई होणे (become mother) ही कोणत्याही स्त्रीसाठी खूप मोठी गोष्ट असते. गर्भधारणेमुळे स्त्रीचे आयुष्यच बदलत नाही तर तिच्या शरीरातही अनेक बदल होतात. या काळात अनेक त्रास होत असूनही स्त्री तिच्या गर्भधारणेचा आनंद घेते. पण प्रत्येक महिला यासाठी भाग्यवान नसते. जगातील अनेक महिलांना त्यांच्या गरोदरपणात विचित्र समस्यांना तोंड द्यावं लागतं. असात एक विचित्र गर्भधारणेचा प्रकार कॅनडातून समोर आला आहे. येथील एक गर्भवती महिला डॉक्टरकडे आली असता डॉक्टरांनी सांगितलेली माहिती ऐकून ती थक्क झाली. कॅनडाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मायकल यांनी त्यांच्या टिकटॉक अकाउंटवरील व्हिडिओद्वारे (Tick tok video) या प्रकरणाची माहिती दिली. डॉ. मायकल (Canadian pediatrician Dr Michael Narvey) यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात गर्भधारणेच्या अनेक प्रकारच्या केसेस पाहिल्या, परंतु अशी केस कधीच पाहिली नव्हती. डॉक्टर मायकल यांच्याकडे एक 33 वर्षीय महिला उपचारासाठी आली होती. या महिलेची मासिक पाळी 14 दिवस राहत होती तसेच गेल्या दीड महिन्यापासून तिला मासिक पाळी येत नव्हती. यामुळे ती गर्भधारणेची खात्री करण्यासाठी डॉक्टरांकडे आली होती. महिला गर्भवती असल्याची डॉक्टरांनाही खात्री होती. तरीही खात्री करण्यासाठी डॉक्टरांनी महिलेचे अल्ट्रासाऊंड (Ultrasound test) केले. या अल्ट्रासाऊंडच्या अहवालाने डॉक्टरांसह महिलेलाही आश्चर्याचा धक्का बसला. खरे तर ती महिला गरोदर होती पण मूल तिच्या गर्भाशयात नव्हते. हे वाचा - Healthy Breakfast: सकाळी नाश्त्यामध्ये या गोष्टी खाणं आहे फायदेशीर; अनेक आजार राहतील दूर महिलेच्या शारीरिक संबंधावेळी कोणत्यातरी कारणाने शुक्राणू महिलेच्या यकृतात गेले होते आणि महिलेच्या यकृतामध्ये भ्रूण वाढू लागले होते. डॉक्टरांनी सांगितले की, महिलेच्या यकृतामध्ये एक्टोपिक गर्भधारणा आढळून आली. एक्टोपिक गर्भधारणा तेव्हा होते जेव्हा अंडी फॅलोपियन ट्यूबमध्ये चुकीच्या दिशेने प्रवास करू लागतात आणि यामुळे गर्भधारणा योग्यरित्या होत नाही. असे पोटात अनेकदा होऊ शकते पण यकृताच्या आत हे पहिल्यांदाच दिसले. हे वाचा - मुंबईत 64,700 लोकसंख्येसाठी एकच दवाखाना; प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड हा प्रकार पाहताच डॉक्टरांनी महिलेवर शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा जीव वाचला मात्र, यकृताच्या आत गर्भाचा आधीच मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी यकृतातून मृत गर्भ बाहेर काढला. याविषयी जर्नल ऑफ इमर्जन्सीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 2012 मध्ये, एका महिलेच्या यकृताशी 18 आठवड्यांचा गर्भ जोडलेला आढळला होता. महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यादरम्यान रक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झाला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pregnancy, Pregnent women

    पुढील बातम्या