शारीरिक संबंध ठेवताना अनेक आजार होण्याचा धोका असतो. त्यांना सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज अथवा एसटीडी असं म्हटलं जातं. संभोग, मुख मैथुन आणि एकमेकांच्या गुप्तांगाना स्पर्श केल्याने सुद्धा लैंगिक संसर्गाने होणारे आजार (एसटीआई) होऊ शकतात. हे आजार महिलांना आणि पुरुषांना सारखेच होतात. ह्याच कारणामुळे शरीर संबंध ठेवताना ह्याची खात्री करून घ्यावी की जोडीदाराला कुठलाही लैंगिक आजार नाही. सर्वसाधारण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजची नावं - जननांगाला फोड, गनोरिया, क्लॅमाइडिया, सिफलिस, एचपीव्ही म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, एचआयव्ही म्हणजेच ह्युमन इम्युनोडिफिशिएन्सी व्हायरस या सर्वांची लक्षणं वेगवेगळी आहेत. myupchar.com च्या डॉ. मेधावी अग्रवाल यांनी सांगितलं, एसटीडीला गुप्तरोगही म्हटलं जातं. हा आजार अनेक रुपात समोर येऊ शकतो, जसं संभोगानंतर त्वचेवर डाग येणे, संभोग करताना किंवा लघवी करताना वेदना होणं, महिलांना योनीच्या आसपास खाज येणं, योनी स्राव होणं, पुरुषांच्या लिंगामधून स्राव होणं. जर व्यक्तीला विनाकारण थकवा येत असेल, रात्री घाम येत असेल, अचानक वजन कमी झालं असेल तर ही एसटीडीची लक्षणं असू शकतात. काही एसटीडीच्या रुग्णांना खूप तापही येतो. अनेकदा कुठलीच लक्षणं न दिसताही हे आजार होऊ शकतात आणि नकळत हे आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होतात. जर वेळेवर या आजारांवर उपचार केले नाही तर ते आपल्या शरीरातील आजारांना नुकसानदायक होऊ शकतात. विशेषतः महिलांमध्ये हा धोका जास्त असतो. एसटीडीमुळे महिलांमध्ये वंध्यत्व, निरनिराळ्या प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. योग्यवेळी उपचार मिळाले नाही तर मृत्यूही होऊ शकतो. कशी होते एसटीडी****ची तपासणी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज म्हणजेच एसटीडीचे निदान करण्यासाठी डॉक्टर काही तपासण्या करायला लावतात. त्यात लघवी आणि रक्ताच्या तपासण्या असतात. आतल्या अंगाच्या जखमांची ब्रशने सफाई करून डॉक्टर आजाराचं निदान करतात. याशिवाय मूत्रमार्ग आणि योनीमार्गातून नमुने घेऊन त्यांचीदेखील तपासणी केली जाते. एसटीडी****चा प्रतिबंध कसा कराल सुरक्षित लैंगिक संबंधाने या आजारापासून रक्षण करता येते. कंडोमचा योग्य उपयोग एसटीडीचं संक्रमण कमी करू शकतं. महिला कंडोम तितकं परिणामकारक नाही पण जर पुरुष कंडोमचा उपयोग योग्यप्रकारे करत नसतील तर महिलांनी करायला हवा. myupchar.com च्या डॉ. मेधावी अग्रवाल म्हणाल्या, शरीरसंबंध ठेवण्याअगोदर आपली आणि आपल्या साथीदाराची तपासणी करणं हे महत्त्वाचं आहे. संभोग करताना संयम राखा आणि वेळोवेळी तपासणी करत राहा. संभोगानंतर अवयवांना साबणाने धुवा. शक्य असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने एचपीव्ही आणि हेपेटायटिसची लस टोचून घ्या. जर कुणाला वाटत असेल की त्याच्या शरीरात एसटीडीची लक्षणं दिसत आहेत किंवा ती व्यक्ती एसटीडी असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आली आहे तर तात्काळ डॉक्टरांना दाखवा. संयमाने रहा आणि स्वस्थ्य जीवनशैलीचा अवलंब करा. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - लैंगिक संक्रमित रोग (एसटीडी) न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.