Home /News /lifestyle /

Sexual Wellness : माझ्याबद्दलची फॅण्टसी खरंच विचित्र आहे की...?

Sexual Wellness : माझ्याबद्दलची फॅण्टसी खरंच विचित्र आहे की...?

'मला माझ्याविषयी असलेली फॅण्टसी ही सर्वसामान्य आहे की विचित्र आहे हे तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे. '

प्रश्न 20 :  मी बांग्लादेशात राहतो. मी तुमच्या मार्गदर्शनपर असलेल्या अनेक पोस्ट वाचल्या, व्हिडीओ पाहिले. त्यामुळे मी तुम्हाला मेसेज करत आहे. मला माझ्याविषयी असलेली फॅण्टसी ही सर्वसामान्य आहे की विचित्र आहे हे तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे.  गेल्या 2-3 वर्षांपासून मी गर्लफेंडसोबत कुकओल्ड (cuckold) रिलेशनशिपमध्ये आहे. मी तिला मोकळीक दिली आहे तिला अन्य कोणाबरोबरही प्रेमसंबंध ठेवण्यास माझी परवानगी दिली होती. परंतु, मी तिच्याशीच एकनिष्ठ राहिलो. त्यांच कारण असं की मला कधीच तिच्याबद्दल असुरक्षितता वाटली नाही.  तिने प्रामाणिकपणे मला तिच्या कॅज्युअल सेक्स पार्टनर्सविषयी सर्वकाही सांगितले होते. त्यानंतर आम्ही आमचे संबंध पुढच्या स्तरावर नेत एसपीएचसारखे (Small Penis Humiliation) प्रयोग करण्यास सुरुवात केली. परंतु, माझ्या जननेंद्रियाच्या आकारावरून ती माझा सतत अपमान करु लागली. परंतु, तिने केलेले काही प्रयोग मला नंतर आवडू लागले. त्यानंतर ती शिक्षणासाठी परदेशात निघून गेली आणि आमचे संबंध आणि तो स्पर्श संपला. ती देत असलेली एसपीएचची ट्रिटमेंट मी खूपच मिस करतोय. अनेकदा मी एकटाच यासाठी रडतो. गेल्या बऱ्याच काळापासून माझ्या कल्पना खुलेपणाने समजून घेईल अशी स्त्री मला भेटलेली नाही. ------------------------------------------- तुमच्या मनातल्या पण आतापर्यंत विचारू न शकलेल्या प्रश्नांची उत्तरं... सेक्शुअल वेलनेस एक्सपर्टकडून. ---------------------------------------- उत्तर - तुमच्या संकल्पनांचा विचार केला असता, असे वाटते की विचित्रपणा हा अत्यंत व्यक्तीनिष्ठ शब्द आहे की जो पूर्णपणे तुम्ही आणि तुमच्या लैंगिक पसंतीवर अवलंबून असतो. मी विचित्र समजत असलेली एखादी गोष्ट कदाचित दुसऱ्या एखाद्यासाठी आश्चर्यकारक रितीने उत्तेजन देणारी असू शकते. मूलतः कोणत्याही वस्तुनिष्ठ किंवा सार्वत्रिक संकल्पना या विचित्र नसतात, तर त्या भिन्न असतात. परस्परांना उत्तेजित करणाऱ्या कोणत्या कल्पनांमध्ये व्यस्त रहावे, हे लैंगिक भागीदारांवर अवलंबून असते. जर तुम्हाला एसपीएचसारखी कल्पना उत्तेजित करत असेल तर तुम्ही तसा जोडीदार शोधा आणि आनंद घ्या. जर तुम्हाला या कल्पनेमुळे पौरुषत्वावर परिणाम होतो, असं वाटत असेल तर ते चुकीचे आहे. या कल्पनेचा तुमच्या लैंगिक गरजा आणि व्यक्तिमत्वाशी कोणताही संबंध नाही. तुमचे बेडवर असताना असलेले व्यक्तिमत्व आणि अन्य वेळी असलेले व्यक्तिमत्व हे वेगळे आहे, असा विचार तुम्ही केला पाहिजे. जेव्हा तुम्ही कामाच्या संदर्भात तुमच्या बॉसची भेट घेता त्यावेळी तुमचं ते ऑफिसातलं  विशिष्ठ व्यक्तिमत्व असतं ती तुमची वर्कप्लेस पर्सनॅलिटी असते. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसमवेत एखाद्या पार्टीचा आनंद घेत असता तेव्हा तुमचे व्यक्तिमत्व निराळे असते. त्याला तुमची कॅज्युअल फन पर्सनॅलिटी असे म्हणता येईल. येथे तुमची वर्कप्लेस पर्सनॅलिटी आणि फन पर्सनॅलिटी सारखी आहे का? ज्या प्रमाणे तुम्ही कामाच्या ठिकाणी वागता तसेच तुम्ही मित्रांसोबत वागत नाहीत. जर तुम्ही कामाच्या ठिकाणी मितभाषी आणि गंभीर असाल तर पार्टीत तुमची वागणूक अशीच असते का? जर आपण लहान जननेंद्रीय हा घटक जर विचित्रपणा आणि वेगळेपणा या विषयी जर बोलायचं ठरवलं तर लक्षात घ्यावं की जननेंद्रियाचा आकार ही बाब अजिबात महत्वाची नाही. कोणताही आकार आणि प्रकाराचे जननेंद्रिय असणारे पुरुष एसपीएचचा आनंद घेऊ शकतात. ही बाब कल्पनाशक्ती आणि संवादावर अवलंबून असते. एखाद्या पुरुषाला एसपीएचमध्ये व्यस्त राहायला आवडते म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्याचे जननेंद्रिय लहान आहे. परंतु, याबाबतचे विचार त्याच्यामनात अन्य लोकांनी तयार केलेले असतात. लैंगिकता किंवा अगदी एसपीएचचा विचार केला तरी जननेंद्रियाचा आकार हा महत्वाचा ठरत नाही. बिर्याणी ही आवडती डिश आहे म्हणून एखाद्या माणसापेक्षा आपण कमी आहोत असे समजणे जसे चुकीचे आहे तसेच सेक्समध्ये आपण ज्या गोष्टींचा आनंद घेत आहात त्याकडे पाहत आहात म्हणजे तुमच्या पौरुषत्वात काही कमी आहे असा निष्कर्ष काढणे हास्यापद आहे. तुमच्या संपत्तीचा, तुमच्या जननेंद्रियाच्या आकाराचा, तुमच्यातील मानवतेचा आणि लैंगिक प्राधान्याचा कोणातही दुरान्वये संबंध नाही हे लक्षात घ्यावे.  काही लोकांना जसे इडली आवडते, काही लोकांना उपमा आवडतो तसेच काही लोकांना फूटजॉब्ज किंवा स्मॉल पेनिस ह्युमलिएशन आवडतं. अशा प्रत्येकाच्या आवडी-निवडी विविध असू शकतात. त्यामुळे याबाबत खूप काही वाचण्याचा किंवा मनोविश्लेषणात्मक अर्थ काढण्याचा प्रयत्न करणे निरर्थक आहे. तुम्ही जसे आहात तसे एक पुरुष आहात. त्यामुळे तुमचा पुरुषार्थ तुमच्याशिवाय अन्य कोणीही मोजू शकत नाही. जर तुम्ही स्वःताला पुरुष समजत असाल तर तुम्ही पुरुषच आहात. पुरुषार्थाच्या अनुषंगाने तयार झालेली ही मानके कृत्रिम, संस्कृती आणि कल्पनेव्दारे निर्मित असून त्या निराधार काल्पनिक कथा आहेत. जर एखादी उथळ व्यक्ती त्याला अपेक्षित गोष्टींसाठी तुम्ही कमी दर्जाचे मनुष्य आहात असे सांगत असेल तर ती त्यांची चूक आहे. तुमचे पुरुषत्व आणि मानवता अन्य व्यक्ती कशा ठरवू शकतात?  याचा शोध घ्या. तुम्ही उगाच दुःख वाटून घेऊ नका. त्या पेक्षा या जगात 7.5 अब्ज लोकं आहेत. त्यामुळे तुमच्या कल्पना जाणून घेणाऱ्या व्यक्तीचा तुम्हाला नक्की शोध लागेल.
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या