नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : प्रत्येकाची अशी इच्छा असते की, शारीरिक तंदुरुस्ती अशी असावी की तो त्याच्या खऱ्या वयापेक्षा काही वर्षांनी लहान दिसेल. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक व्यक्तीला कायम तरुण रहायचं असतं. म्हणूनच, जेव्हा जेव्हा वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्याच्या उपायांबद्दल बोललं जातं, तेव्हा नेहमीच व्यायाम आणि आहाराकडे अधिक लक्ष देण्याविषयी (Secret of Long and Healthy Life) सांगितलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का की, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य हे फक्त आहार आणि व्यायामावर अवलंबून नसून व्यक्तिमत्वाचाही (Persona/Personality) त्यात महत्त्वाचा सहभाग असतो.
अलीकडील संशोधनात असं दिसून आलंय की, व्यक्तिमत्त्वाचे अनेक गुणधर्मही व्यक्तीला त्याच्या वयानुसार कसं आरोग्य लाभेल, हे ठरवतात. या गुणधर्मांच्या आधारे कोणाला वयाच्या 80 वर्षांनंतरही चांगले आरोग्य लाभेल, हे सांगता येईल. तज्ज्ञांच्या मते व्यक्तिमत्त्व आणि दीर्घायुष्य यांच्यातील संबंध बुद्धिमत्ता आणि संपत्तीइतकाच मजबूत आहे. दोन्ही दीर्घायुष्याशी संबंधित आहेत. दैनिक भास्कर वृत्तपत्रात याविषयीचं वृत्त प्रसिद्ध झालंय.
आज आम्ही तुम्हाला व्यक्तिमत्वाच्या अशा वैशिष्ट्यांबद्दल सांगू, ज्याकडे लक्ष दिल्यास आपण दीर्घ आणि निरोगी आयुष्य मिळवू शकतो. तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही व्यक्तीनं त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या या चार वैशिष्ट्यांकडे लक्ष दिल्यास त्याचं आरोग्य चांगलं राहील आणि जीवनही वाढेल.
विवेकी लोक जास्त काळ जगतात
वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक निकोलस टुरियानो म्हणतात की, कर्तव्यदक्ष लोक जास्त काळ जगतात. त्यांचा असा विश्वास आहे की, प्रामाणिकपणा हा एक असा गुण आहे, जो आरोग्याशी संबंधित कोणताही धोका दूर करण्यात मदत करू शकतो. कर्तव्यदक्ष लोक वर्कआउट्स आणि आहाराच्या पौष्टिकतेबद्दलही जागरूक असतात. ते तणावपूर्ण परिस्थितीचा अधिक चांगल्या प्रकारे सामना करू शकतात. त्यामुळं आरोग्य चांगलं राहतं. दृढ मनोबलामुळे प्रतिकूल परिस्थितीतही माणूस कमजोर होत नाही.
हे वाचा - आता Jio चा Laptop ही येणार? काय असतील JioBook चे फीचर्स, पाहा डिटेल्स
'उद्देश/ध्येय' (ambition/goal) प्रेरणा देतं
पॅट्रिक हिल, वॉशिंग्टन विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ, स्पष्ट करतात, 'उद्देशपूर्ण कार्यांमध्ये सामील होणंदेखील स्मृतिभ्रंश आणि नैराश्य कमी करण्यास मदत करतं.' ते स्पष्ट करतात की, उद्देशपूर्ण असणं म्हणजे वस्तुनिष्ठ असणं. स्पष्ट ध्येयांसह जीवनाची दिशा असणं ऊर्जा देतं. जे लोक म्हणतात की, त्यांचा जीवनात 'उद्देश' आहे, त्यांची तब्येत बिघडली तरी ते लवकर बरे होतात. त्यांच्या मेंदूमध्ये आत्म-जागरूकता आणि निर्णयक्षमता अधिक सक्रिय असते.
सकारात्मक लोकांचा आत्मविश्वास जास्त असतो
येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या मानसशास्त्रज्ञ बेका लेव्ही म्हणतात, "जे लोक वृद्धत्वाकडं सकारात्मकतेनं येतात, ते इतर लोकांपेक्षा 7.6 वर्षं जास्त जगतात." त्या म्हणतात की, दीर्घायुष्यासाठी सकारात्मकता महत्त्वाची आहे. सकारात्मकता लोकांना वृद्धापकाळात त्यांचं ध्येय साध्य करण्यास मदत करते. याच्यामुळं त्यांना अधिक आत्मविश्वास मिळतो.
हे वाचा - Business: कमी खर्चात करा औषधी वनस्पस्तींची शेती; होईल लाखोंची कमाई
बहिर्मुख असल्यास अडचणींना तोंड देणं सोपं जातं
बहिर्मुख असणं चांगलं असून ते वयानुसार वाढत जातं. कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसशास्त्राच्या प्राध्यापिका सुसान चार्ल्स म्हणतात, 'सामाजिक नातेसंबंध आणि दीर्घायुष्य यांच्यात मजबूत दुवा आहे. जे सामाजिक कार्य करतात ते त्यांच्या समस्या इतरांसोबत बोलून त्यांना सांगू शकतात. यामुळं मन हलकं होतं आणि आरोग्य चांगलं राहतं. असे लोक निरोगी जीवनशैलीचा अवलंबही सहजतेनं करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Human face, Personal life