मुंबई, 22 सप्टेंबर : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (anurag kashyap) अभिनेत्री पायल घोषने (payal ghosh) लैंगिक छळाचा आरोप केला. सोशल मीडियावर ती व्यक्त झाली. दरम्यान यानंतर आता अनुराग कश्यपबाबत आणखी एका अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. ही अभिनेत्री म्हणजे सैयामा खेर (saiyami kher). सैयामाने अनुरागबाबत केलेली ही पोस्ट जुनी आहे. जी त्याच्यावर आता लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर व्हायरल होऊ लागली आहे. सैयामीने अनुरागने दिग्दर्शित केलेल्या चोक्ड - पैसा बोलता या फिल्ममध्ये काम केलं होतं. या चित्रपटाच्या कामानिमित्त अनुरागने तिला आपल्या घरीच बोलावलं होतं. सैयामी तेव्हा अनुरागला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली आणि त्यानंतरचा आपला अनुभव तिनं आपल्या इन्स्टाग्रामवर मांडला होता.
सैयामी म्हणाली, “अनुरागला मी त्याच्या वर्सोवातल्या घरी पहिल्यांदा भेटले. त्याने तिथं मला भेटायला बोलावलं होतं. मी काही बोलणार याआधीच तो मला म्हणाला, माझे आईवडील माझ्यासोबत राहतात, काळजी करू नको. त्याला बॉलिवूडचा बॅड बॉय म्हटलं जायचं. बाहेरच्या जगात त्याला ड्रग्जी, महिलांसोबत गैरवर्तन करणारा म्हणून ओळखलं जातं. मात्र मला त्याच्याबाबत जे खरं समजलं ते पूर्णपणे विरुद्ध होतं” हे वाचा - PHOTO - इन्स्पेक्टर ‘चंद्रमुखी चौटाला’ने दिली अशी पोझ, पाहतच राहिले अनुराग कश्यप “इतर भारतीय घरांप्रमाणे त्याच्या घरातही गडबड असते. त्याचे आईवडील न्यूजपेपर वाचत असायचे, दरवाजावर सतत वाजणारी बेल, येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवण, मांजर इथंतिथं फिरत असायची आणि एके त्याच्याच घरात एक शांत जागा शोधायचा. ‘चोक्ड’ प्रदर्शित होईपर्यंत हे सगळं तीन वर्ष अनुभवलं आहे. तो माझा मित्र आणि मेन्टॉर झाला आहे”, असंही तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हे वाचा - दीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन? अभिनेत्रीकडून स्पष्टीकरण अनुराग कश्यपसह काम करणाऱ्या बहुतेक अभिनेत्री आणि त्याच्या एक्स पत्नींनीदेखील त्याला पाठिंबा दिला आहे. कंगना रणौत सोडता इतर अभिनेत्रींनी त्याचं समर्थनच केलं आहे. मराठी अभिनेत्री अमृता सुभाष आणि राधिका आपटेही त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत.

)







