मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सर्जिकल मास्कच्या N-95 रेस्पिरेटरसारख्या फिटिंगसाठी रबर बँड करू शकतं मदत, अभ्यासातून माहिती समोर

सर्जिकल मास्कच्या N-95 रेस्पिरेटरसारख्या फिटिंगसाठी रबर बँड करू शकतं मदत, अभ्यासातून माहिती समोर

रेस्पिरेटर्सचा तुटवडा भरून काढण्यासाठी रबर बँड सर्जिकल मास्क सील करण्यासाठी वापरता येऊ शकतात, अशी माहिती अमेरिकेतील पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्सच्या जर्नलमध्ये प्रकाशित केली गेली आहे.

रेस्पिरेटर्सचा तुटवडा भरून काढण्यासाठी रबर बँड सर्जिकल मास्क सील करण्यासाठी वापरता येऊ शकतात, अशी माहिती अमेरिकेतील पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्सच्या जर्नलमध्ये प्रकाशित केली गेली आहे.

रेस्पिरेटर्सचा तुटवडा भरून काढण्यासाठी रबर बँड सर्जिकल मास्क सील करण्यासाठी वापरता येऊ शकतात, अशी माहिती अमेरिकेतील पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्सच्या जर्नलमध्ये प्रकाशित केली गेली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 ऑगस्ट : मागची दोन वर्ष कोरोना (Corona) या संसर्गजन्य आजाराने जगभरात हाहाकार माजवला. जगभरात 590 मिलियन लोकांना या आजाराचा संसर्ग झाला तर, जवळपास 60 लाख लोक यामुळे मृत्युमुखी (Corona Deaths) पडले. अलीकडच्या काळात जगाला भयंकर अनुभव देणारा हा आजार ठरला. भारतात (India) सध्या या आजाराचे रुग्ण कमी असले आणि संसर्ग कमी असला तरी जगात इतर अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. आरोग्य व्यवस्थेवरील ताणामुळे उपचाराअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे. या संदर्भात हिंदुस्थान टाईम्सने वृत्त दिलंय.

जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) मास्क आणि लसीकरणाच्या मदतीने या विषाणूचा प्रसार कमी होण्यास मदत होईल, असं सांगितलंय. याशिवाय काही साध्या उपायांच्या मदतीने हा आजार दूर सारता येतो, याबद्दलही वेळोवेळी माहिती दिली आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून N-95 रेस्पिरेटर्सचा (N-95 respirators) तुटवडा भरून काढण्यासाठी रबर बँड मदत करू शकतात, असं समोर आलंय. रेस्पिरेटर्सच्या मदतीने हवेतील कण प्रभावीपणे फिल्टर केले जातात. रेस्पिरेटर्सचा तुटवडा भरून काढण्यासाठी रबर बँड सर्जिकल मास्क सील (surgical mask seal) करण्यासाठी वापरता येऊ शकतात, अशी माहिती अमेरिकेतील पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्सच्या (United States-based Public Library of Science) जर्नलमध्ये प्रकाशित केली गेली आहे. यामध्ये रबर वापरून चेहऱ्यावर N-95 मास्क कसा लावता येतो याचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत.

"रबर बँड, एक स्वस्त आणि सहज अॅक्सेसेबल मॉडिफिकेशन आहे. ते N95 रेस्पिरेटर्सच्या लेव्हलपर्यंत स्टँडर्ड सर्जिकल मास्कला सील करून संरक्षणात्मक क्षमता सुधारू शकतात," असा निष्कर्ष संशोधकांनी अभ्यासातून काढला आहे. "हे जगभरातील N95 रेस्पिरेटर्सचा तुडवडा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात आणि कमी साधनं असलेल्या प्रदेशातील व्यक्तींचं वैयक्तिक श्वसन संरक्षण वाढवण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते," असंही म्हटलंय. दरम्यान, या सर्जिकल मास्कना फार संरक्षक मानलं जात नाही, कारण ते घालणाऱ्याच्या चेहऱ्याभोवती घट्ट बसत नाहीत.

सध्याच्या स्टँडर्ड सर्जिकल मास्कच्या बाजूने रबर बँड लावून तो घट्ट बसवण्याची ही कल्पना तो मास्क घालणारी व्यक्ती आणि इतरांना मास्क फिल्टरेशनच्या माध्यमातून होऊ शकणाऱ्या संभाव्य संसर्गाला रोखण्यासाठी आहे, असंही त्यात म्हटलंय. जर्नलने आठ इंच रबर बँड वापरून प्रात्यक्षिकांचे फोटोही प्रकाशित केले आहेत. “शेवटच्या अॅनॅलिसीसमध्ये सहभागी असलेल्या 40 आरोग्य सेवा कर्मचार्‍यांपैकी 31 जणांनी मॉडिफाय केलेला सर्जिकल मास्क घातला होता. त्यांनी फायनल पोर्टाकाउंट फिट फॅक्टरवर (Final PortaCount Fit Factor) 100 आणि त्याहून अधिक गुण मिळवले. हा वाकणं, बोलणं, मान डावी-उजवीकडे वळवणं, मान खाली-वर करणं या चार स्टँडर्ड सबस्कोरवर आधारित पोर्टाकाउंट-जनरेटेड स्कोअर होता. या मास्कने N95 रेस्पिरेटर्सने नोंदवलेल्या स्टँडर्ड पासिंग क्रायटेरियाला मागे टाकले आहे,” असंही संशोधकांनी सांगितलं.

2021 मध्ये 40 आरोग्यसेवा कर्मचार्‍यांमध्ये हा अभ्यास करण्यात आला आणि तो नुकताच जर्नलमध्ये प्रकाशित झाला. दरम्यान, N-95 रेस्पिरेटर्सना प्राधान्य दिले जात असताना, यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (US Food and Drug Administration) हे मास्क वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची शिफारस केली आहे. ज्यांना श्वसनासंबंधित त्रास, हृदयविकार किंवा इतर वैद्यकीय समस्या आहेत, त्यांनी हा मास्क वापरल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असं सांगण्यात आलंय.

First published:

Tags: Corona, Face Mask