नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : केसांच्या विविध समस्यांसाठी (Hair Problems) तांदळाचे पीठ हा प्रभावी उपाय ठरू शकतो. यामध्ये जीवनसत्त्वं आणि खनिजं भरपूर प्रमाणात असल्यानं केस गळणं, केसांचा कोरडेपणा आणि कोंडा या समस्या दूर होतात. झी न्यूजनं यासंबंधी माहिती दिली आहे.
मेथीदाणे आणि तांदळाचे पीठ (Rice flour)
मेथी दाणे आणि तांदळाच्या पिठाची पेस्ट केसांशी संबंधित समस्या दूर करेल. तांदळाचे पीठ रक्ताभिसरण सुधारतं. त्याच वेळी, त्यात असलेली अमीनो अॅसिड्स आणि खनिजं टाळूचं पोषण करतात.
ही पेस्ट तयार करण्यासाठी 2 चमचे मेथीचे दाणे भिजवून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता त्यात 3 चमचे तांदळाचं पीठ घाला. मेथी दाणे आणि तांदळाच्या पिठानं बनवलेली ही पेस्ट केसांना 20 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर केस धुवा.
हे वाचा - Memory Power : स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश
केळी आणि तांदळाच्या पिठाचा पॅक
केसांच्या कोरडेपणाची समस्या सहसा हिवाळ्यात उद्भवते. यासाठी एका भांड्यात तांदळाचं पीठ घेऊन त्यात केळी घालून घट्ट पेस्ट तयार करा. 30 मिनिटे केसांवर लावून ठेवा आणि नंतर केस धुवा.
हे वाचा - अवयवदान करणं का आहे महत्त्वाचं? राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त त्याचे महत्त्व जाणून घ्या
बेसन आणि तांदळाचं पीठ
तांदळाच्या पिठाचा वापर केल्यामुळं कोंड्याची समस्या दूर होईल. तांदळाच्या पिठात बेसन पीठ मिसळून करून त्यात थोडं कोमट पाणी घालावं. या पेस्टने टाळूला मसाज करा. 10 ते 15 मिनिटे मसाज केल्यानंतर केसांवर राहू द्या. 20 मिनिटांनी केस शॅम्पूनं धुवा.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Woman hair