नवी दिल्ली, 13 एप्रिल : आलं हा मसाल्याचा पदार्थ विविध आजारांना रोखण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. भारतीय आयुर्वेदात याच्या अनेक वैद्यकीय गुणधर्मांचा उल्लेख आहे. हेल्थ लाइनच्या बातमीनुसार, लैंगिक इच्छा आणि कामवासना नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी आलं पारंपरिक औषध (Ginger Boosts Sex Drive ) म्हणून फार पूर्वीपासून वापरलं जात आहे. आल्यामुळं कामोत्तेजक किंवा उत्तेजन मिळतं. अकाली स्खलनासारख्या लैंगिक समस्यादेखील त्याच्या सेवनाने दूर केल्या जाऊ शकतात. काही संशोधनात असं आढळून आलंय की, आल्याचा कामप्रेरणेवर (सेक्स ड्राइव्ह) थेट परिणाम होतो. हे रक्तप्रवाह गतिमान करते, ज्यामुळे सेक्स ड्राइव्ह वाढण्यास मदत होते. संशोधनात असंही आढळून आलंय की, रक्तदाबाच्या समस्येवरदेखील आलं खाल्ल्यानं आराम पडतो. अशा प्रकारे आलं सेक्ससाठी आहे फायदेशीर काही अभ्यासांनुसार, ऑक्सिडेटिव्ह ताण (Oxidative Stress) शरीरातील अँटिऑक्सिडंट्स आणि फ्री रॅडिकल्सचं संतुलन बिघडवतो. यामुळे शरीराच्या पेशींमध्ये सूज येते आणि अनेक पेशींचं नुकसान होतं. यामुळं प्रजनन क्षमता आणि सेक्स ड्राइव्ह दोन्ही प्रभावित होतात. अभ्यासांमध्ये सिद्ध झालंय की, आल्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि जळजळ कमी करण्याची क्षमता असते. वयानुसार येणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या समस्याही यानं दूर होतात. अभ्यासांमध्ये असंही म्हटलं गेलंय की, आलं नपुंसकतेवरही फायदेशीर आहे. हे वाचा - Chanakya Niti : अशा माणसांसह मैत्री करताना करा 100 वेळा विचार; आपलं नुकसानच होतं एका संशोधनानुसार, आलं टेस्टोस्टेरॉन आणि ल्यूटिनिझिंग हार्मोन वाढवतं. यामुळे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये प्रजनन क्षमता विकसित होते. आलं वीर्याची गुणवत्ता आणि गतिशीलताही वाढवतं. उंदरांवर केलेल्या अभ्यासात असं आढळून आलंय की, आलं पॉलीसिस्टिक ओव्हरीज सिंड्रोम (पीसीओएस) संतुलित करते. पीसीओएसमुळे महिलांमध्ये प्रजनन क्षमता कमी होते. आणखी एका अभ्यासात असं आढळून आलंय की, आल्यामध्ये फॉलिकुलोजेनेसिसच्या (Folliculogenesis) प्रक्रियेस गती देण्याची क्षमता आहे. Folloculogenesis ही महिलांच्या गर्भाशयातील अंड्यांच्या परिपक्वतेसाठी होणारी प्रक्रिया आहे. हे वाचा - अगदी परफेक्ट जीन्स तुम्हाला मिळणारच! कधीही खरेदी करताना या टिप्स ध्यानात ठेवा सेक्स ड्राइव्ह व्यतिरिक्त, आल्याचे इतर अनेक फायदे आहेत. हे साध्या सर्दी-खोकल्यापासून ते हृदयापर्यंत अनेक गंभीर आजारांवरील उपचारांसाठी वापरले जाते. गाठी (गुठळ्या), पोटाचे आजार, मूळव्याध, सूज, मधुमेह, श्वास लागणे, सर्दी, भूक न लागणे, अपचन, मुडदूस, कावीळ, मानसोपचार, खोकला आणि कफ यासारख्या आजारांमध्ये आल्याचे सेवन फायदेशीर आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







