नवी दिल्ली, 15 डिसेंबर : कोरिओग्राफर रेमो डीसूजा (Remo D’Souza) सध्या मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई रुग्णालयात दाखल आहे. तिथं त्याच्यावर ICU मध्ये उपचार सुरू होते पण आता तो धोक्याच्या बाहेर आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ (video) देखील समोर आला आहे. जो सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे. हार्ट अॅटॅकनंतर (heart attack) रेमोचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. त्याची पत्नी लिजेल डीसूजा हिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओत रुग्णालयातही रेमो थिरकताना दिसतो. व्हिडिओत म्युझिक ऐकायला येत आहे आणि त्याच्या तालावर रेमोचे पाय हलत आहेत आणि त्याचे फक्त पायच दिसत आहेत. पण तरी त्याचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
हार्ट अॅटॅक आल्यानंतर त्याची पत्नी लिजेल म्हणाली होती, त्यांच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता. कारण त्याला ब्लड प्रेशर किंवा इतर कोणताच आजार नाही. हे वाचा - VIDEO : ‘आज खुश तो बहोत होगे तुम!’ वर मुंबईच्या पोरांचा भन्नाट डान्स; Big B सुद्धा झाले फिदा रेमोचे चाहते त्याच्या प्रकृतीबाबत खूप चिंतेत आहेत. तो लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून त्याच्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे. त्याच्यासाठी सोशल मीडियावर भरभरून पोस्ट करत आहेत.