मुंबई, 24 एप्रिल : जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगात 422 कोटींहून अधिक लोक डायबेटिस म्हणजेच मधुमेहाने ग्रस्त आहेत. दरवर्षी सुमारे 15 लाख जणांच्या मृत्युसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे डायबेटिस कारणीभूत ठरतो. डायबेटिसग्रस्त लोकांमध्ये भारत आघाडीवर आहे. भारतात सर्वाधिक 8 कोटी लोक डायबेटिसने ग्रस्त आहेत. ही संख्या येत्या काळात सातत्याने वाढेल, असं म्हटलं जातंय. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष व अनियमित लाइफस्टाइल यामुळे हा आजार झपाट्याने वाढतोय. डायबेटिसला हाय ब्लड शुगर असंही म्हणतात. त्यामुळे डायबेटिसच्या रुग्णांना खाण्यापिण्याबाबत खबरदारी घ्यावी लागते. डायबेटिस नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण सदाबहारच्या म्हणजे सदाफुलीच्या फुलांचा आणि पानांचाही वापर करतात. याचे फायदे कसे होतात, ते जाणून घेऊयात. या संदर्भात ‘झी न्यूज हिंदी’ने वृत्त दिलंय. Eggs In Summer : उन्हाळ्यात अंडी खा पण जरा जपून! नाहीतर पडू शकता गंभीरपणे आजारी पिझ्झा, बर्गर, फास्ट फूड, प्रोसेस्ड फूड, पॅकबंद वस्तू, जास्त तळलेले पदार्थ आपली लाइफस्टाइल आणखी बिघडवत आहेत. डायबेटिसमध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू लागते. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की सदाफुलीच्या फुलांचा व पानांचा रस बनवून तो प्यायल्याने रक्तातील साखर झपाट्याने कमी होते.
डायबेटिसमध्ये सदाबहारच्या फुलांचे फायदे डायबेटिसमध्ये सदाबहार फायदेशीर कसे आहे, यामागचं कारण जाणून घेऊया. आयुर्वेदतज्ज्ञांच्या मते, सदाफुली फुलांमध्ये अॅजमेलिसिन, सर्पेन्टाइन, अल्कलॉइड्स आणि व्हिन्क्रिस्टीन नावाचे पोषक घटक आढळतात, हे घटक रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्यापासून रोखतात. सदाफुलीच्या पानांत असतात हे गुण ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी सदाफुलीच्या पानांचं रोज सेवन करणं उत्तम ठरू शकतं. याच्या पानांमध्ये अल्कलाइन गुणधर्म आढळतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तुम्ही सदाफुलीची पानं चावूनदेखील खाऊ शकता. उकळून करता येते सेवन डायबेटिस नियंत्रणात ठेवण्यासाठी व रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सदाफुलीची फुलं आणि पानं उकळूनही तुम्ही सेवन करू शकता. तुम्ही सदाफुलीच्या पानं आणि फुलांची पावडर करून रोज थोडी-थोडी सेवन करू शकता. असे केल्याने डायबेटिस नियंत्रणात येऊ लागतो. भाजीच्या चवीसोबत दृष्टी वाढवण्यासाठीही उत्तम आहेत ही हिरवी पानं, फायदे वाचून थक्क व्हाल! डॉक्टरांचा सल्ला घ्या डायबेटिस नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही सदाफुलीचा ज्युस बनवून पिऊ शकता. याची चव थोडी कडू वाटेल, पण तुम्ही हा ज्युस इतर ज्युसमध्ये मिसळून पिऊ शकता. परंतु एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की त्याचे सेवन मर्यादित प्रमाणातच करा आणि त्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.