जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Relationship : पतीची पहिली पत्नी आणि मी...; आमचं नातं पाहून अनेकांना बसतो आश्चर्याचा धक्का!

Relationship : पतीची पहिली पत्नी आणि मी...; आमचं नातं पाहून अनेकांना बसतो आश्चर्याचा धक्का!

पतीची पहिली पत्नी आणि मी...; आमचं नातं पाहून अनेकांना बसतो आश्चर्याचा धक्का!

पतीची पहिली पत्नी आणि मी...; आमचं नातं पाहून अनेकांना बसतो आश्चर्याचा धक्का!

पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलांमुळे तर अनेकदा अन्य काही कारणांमुळे तुमचा पतीच्या पहिल्या पत्नीशी संबंध येत असतो. तेव्हा तुमच्या पतीच्या भूतकाळातील नात्याचा आपल्या वर्तमानातील नात्यावर परिणाम होऊ नये, म्हणून पतीच्या पहिल्या पत्नी सोबत मैत्रीपूर्ण नातं असणं महत्वाचं ठरत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

सध्या जगभरात घटस्फोट होण्याच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पती पत्नीचे एकमेकांसोबत न पटणे, सतत वादविवाद होणे, घरगुती हिंसाचार, सासरच्यांकडून होणारा जाच अशा अनेक गोष्टी घटस्फोट होण्याला कारणीभूत असतात. पूर्वी घटस्फोट हा विषय समाजात फारच गंभीर समजला जायचा. परंतु आता घटस्फोटित मुलगा मुलगी दोघेही भविष्याचा विचार करून दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतात. मात्र पहिल्या लग्नात आलेल्या वाईट अनुभवातून सावरत दुसरं लग्न करताना पती पत्नी दोघांनाही बऱ्याच गोष्टी समजुतीने घ्याव्या लागतात. बऱ्याचदा दुसर लग्न करताना पती पत्नी दोघेही घटस्फोटित असतात. तेव्हा काहीवेळा पतीला पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलांमुळे तर अनेकदा अन्य काही कारणांमुळे तुमचा पतीच्या पहिल्या पत्नीशी संबंध येत असतो. तेव्हा तुमच्या पतीच्या भूतकाळातील नात्याचा आपल्या वर्तमानातील नात्यावर परिणाम होऊ नये, म्हणून पतीच्या पहिल्या पत्नी सोबत मैत्रीपूर्ण नातं असणं महत्वाचं ठरत. पतीच्या पहिल्या पत्नी सोबत मैत्रीचं नातं कस निर्माण करावं हे जाणून घेऊयात, मैत्रीण म्हणून संवाद साधा : पतीच्या पूर्व पत्नीशी  समारंभात अथवा कामाच्या ठिकाणी तुमची भेट होऊ शकते. यावेळी तिच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा माणुसकी आणि मैत्रिणीच्या नात्याने तिच्याशी संवाद साधा, तिची विचारपूस करा. परंतु असे करताना संवादादरम्यान तिला तुमच्या पती पत्नीच्या नात्यातील खासगी गोष्टी सांगणं टाळा. कामाच्या ठिकाणी प्रोफेशनलिजम जपा : अनेकदा तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी तुमची आणि पतीच्या पहिल्या पत्नीशी भेट होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टवर एकत्र काम करण्याची ही वेळ येऊ शकते. तेव्हा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील संबंधांना विसरून तुम्ही कामाच्या ठिकाणी  प्रोफेशनलिजम जपायला हवं. तसेच कामाच्या ठिकाणी एक चांगली सहकारी म्हणून एकमेकींना वेळोवेळी मदत करायला हवी. एकमेकींविषयी मत्सर वाटू देऊ नका: तुम्ही आणि पतीच्या पूर्व पत्नीने आपापल्या आयुष्यात काही निर्णय घेतलेले असतात. तेव्हा त्या निर्णयांचा परिणाम तुमच्या आयुष्यावर चांगला किंवा वाईट होऊ शकतो. पतीच्या पूर्व पत्नीने घटस्फोट घेऊन तीच नवीन आयुष्य सुरु केल्यानंतर तिच्यात काही चांगले बदल घडत असतील किंवा तीच आयुष्य हे पूर्वी पेक्षा अधिक चांगलं होत असेल तर तुम्ही त्याविषयी मत्सर वाटू देऊ नका. तुमचं आणि तीच आयुष्यवेगवेगळं आहे हे लक्षात असू द्या. पतीवर विश्वास : अनेकदा पतीला पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलांमुळे पती आणि तुमचा अनेकदा त्याच्या पहिल्या पत्नीशी संबंध येत असतो. तेव्हा काहीवेळा आपल्या मनात आपला पती पुन्हा त्याच्या पूर्व पत्नीकडे आकर्षित तर होणार नाही ना? अशी भीती वाटते. परंतु अशावेळी आपण पतीवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. पती पत्नीतील नातं हे विश्वास आणि प्रेमावर अवलंबून असतं तेव्हा त्याला तडा जाऊ नये यासाठी प्रयत्न करा. आपल्या पतीशी संवाद साधा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात