गाझियाबाद, 31 जानेवारी : गेल्या काही वर्षांत रेस्टॉरंट आणि हॉटेल्सची संख्या वेगानं वाढत आहे. देशभरात अनेक थीम बेस्ड रेस्टॉरंट्स, कॅफे आहेत. पारंपरिक पदार्थांसह चायनीज, कॉन्टिनेंटल, थाई पद्धतीचे पदार्थ त्यात मिळतात. ग्राहकांना एक वेगळा अनुभव मिळावा, यासाठी रेस्टॉरंट मालक एखादी खास थीम निवडतात. अशा खास थीमचा अनुभव घेत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची पावलं असे कॅफे किंवा रेस्टॉरंटकडे वळतात. गाझियाबादमध्ये अशाच एका अनोख्या थीमवर आधारित रेस्टॉरंट खवय्यांची विशेष पसंती मिळवत आहे. एखाद्या गुन्ह्यासाठी झालेली शिक्षा भोगण्याकरिता आरोपीची रवानगी कारागृहात केली जाते.
कारागृहात गेल्यानंतर कैद्यांना तिथल्या नियमांनुसार सर्व गोष्टी करणं बंधनकारक असतं. अर्थात याला जेवणदेखील अपवाद नाही. गाझियाबादमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये कारागृहाची थीम वापरण्यात आली आहे. या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केल्यानंतर ग्राहकांना कारागृहात आल्याचा फील मिळतो. या अनोख्या थीममुळे हे रेस्टॉरंट अल्पावधीतच लोकप्रिय झालं आहे. अनेक जण या ठिकाणी पार्टी आणि वाढदिवस साजरे करण्यासाठी येतात. या कॅफेविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
कारागृहात कैद्यांना बेड्या घातलेल्या असतात. असाच अनुभव घ्यायचा असेल तर दिल्लीजवळच्या गाझियाबादला जा. एनसीआरमधल्या अनेक शौकिनांसाठी हे ठिकाण पार्टी आणि मौजमजेसाठी आवडतं बनलं आहे. जेल कॅफे हे खरं तर थीमवर आधारित रेस्टॉरंट आहे. नावाप्रमाणेच या कॅफेची रचना आहे. या कॅफेत लहान सेल अर्थात बराकी तयार करण्यात आल्या आहेत. कॅफेत दुसऱ्या बाजूला एक मोठं कारागृह आहे. त्या ठिकाणी पार्टी किंवा वाढदिवस साजरे केल जातात.
`ही` आहेत कॅफेची वैशिष्ट्यं
- जेल कॅफेत स्वतंत्र सेल तयार करण्यात आले आहेत. या सेलमध्ये सहा जणांची बसण्याची व्यवस्था आहे. या सेलच्या बाहेर बेड्या ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी येणाऱ्या व्यक्ती बेड्या घालून जेवणाचा आस्वाद घेतात. या सेलमधली प्रकाशयोजना अशा पद्धतीनं करण्यात आली आहे की कारागृहात आल्यासारखं वाटतं.
- जेल स्पेशल फूड : या कॅफेत चायनीज, कॉन्टिनेंटल आणि साउथ इंडियन फूड मिळतं; मात्र या अन्नाची चव जेलमधल्या जेवणासारखीच असते. त्यामुळे अनुभव संस्मरणीय ठरतो.
`न्यूज 18 लोकल`शी बोलताना कॅफेचे मालक प्रतीक यांनी सांगितलं, `शालिमार गार्डन इथल्या या कॅफेत दिल्ली-एनसीआरमधले खवय्ये आवर्जून येतात. 2018 मध्ये आम्ही हा कॅफे सुरू केला. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही कारागृहाची थीम निवडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Prisoners, Restaurant