जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Corn Aloo Pakoda Recipe : कांदा-बटाटा भजी खाऊन कंटाळलात? मग यंदा पावसाळ्यात खा कुरकुरीत कॉर्न भजी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Corn Aloo Pakoda Recipe : कांदा-बटाटा भजी खाऊन कंटाळलात? मग यंदा पावसाळ्यात खा कुरकुरीत कॉर्न भजी, जाणून घ्या सोपी रेसिपी

यंदा पावसाळ्यात खा कुरकुरीत कॉर्न भजी, जाणून घ्या सोपी रेसिपी

यंदा पावसाळ्यात खा कुरकुरीत कॉर्न भजी, जाणून घ्या सोपी रेसिपी

घराच्या खिडकीत बसून पावसाचा आनंद घेत गरमागरम भजी खाण्याची मजा काही औरच असते. परंतु अनेकदा कांदा, बटाटा, मूग इत्यादींपासून तयार केलेलेच भजी आपण नेहमीच खात असतो. तेव्हा यंदाच्या पावसाळ्यात काही वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही कुरकुरीत कॉर्न बटाटा भजीची सोपी आणि खास रेसिपी नक्की बनवुन पाहा.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पावसाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणात मक्याची आवक होत असते. याऋतूमध्ये कोळश्यावर भाजलेली मक्याची कणसं खाण सर्वच पसंत करतात. परंतु या मक्याच्या दाण्यांपासून आपण अनेक पदार्थ बनवून शकतो. तेव्हा मक्याच्या दाण्यांपासून कुरकुरीत भाजी कशी बनवायची ते पाहुयात. साहित्य : उकडून घेतलेले मक्याचे दाणे - 1 ते 2 कप कांदा बारीक चिरलेला - 1/4 कप बटाटा कच्चा किसून घेतलेला - 1/2 कप बेसन पीठ 1/4 कप कोथिंबीर तांदळाचे पीठ - 1/4 कप हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या - 2 चमचे हळद - 1 / 2 चमचे धणे जिरे पावडर - 1 / 2 चमचे मीठ चवीनुसार तळण्यासाठी तेल लाल तिखट 1 चमचा Chicken Recipe : घरच्या घरी बनवा टेस्टी KFC स्टाईल चिकन, जाणून घ्या खास रेसिपी कृती - सर्वप्रथम एका भांड्यात उकडून घेतलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, किसलेला बटाटा, हे सर्व साहित्य एकत्र करून घ्या. आता यामिश्रणात बेसन पीठ, चिरलेली कोथिंबीर, तांदळाचे पीठ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर आणि शेवटी चवीनुसार मीठ घालावे. सर्व मिश्रण एकत्र करून घेतल्यावर एकीकडे तेल तापवायला ठेवा. तेल गरम झाल्यावर गॅस मध्यम आचेवर करून त्यात भजी तळा. भजी गोल्डन ब्राऊन होई पर्यंत तळून घ्या. अशाप्रकारे गरमागरम कुरकुरीत कॉर्न बटाटा भजी तयार होते. ही भाजी तुम्ही पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात