महिलांसाठी मासिक पाळी (menstrual period) नियमित ठेवणं फार महत्त्वाचं आहे. जर हे नियमित नसेल तर इतर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. तसं मासिक पाळी 2-4 दिवस मागेपुढे होणं सामान्य आहे. काही स्त्रियांमध्ये पाळीचा काळ निश्चित नसतो. जर त्यांची मासिक पाळी एका विशिष्ट वेळेत न येता खूप कालांतराने येत असेल तर या मागे अनेक कारणं असू शकतात. अनियमित दिनक्रम आणि चुकीचा आहार myupchar.com शी संबंधित एम्सच्या डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांच्या मते, मासिक पाळीचं चक्र बदलण्याचं सर्वात मोठे कारण अनियमित जीवनशैली आहे. सुस्त जीवनशैलीमुळे शरीराच्या संप्रेरकांवर देखील परिणाम होतो. अनियमित दिनक्रमांमध्ये व्यायाम न करणं, वेळेवर झोप न घेणं, वेळेवर न खाणं इत्यादींचा समावेश आहे. उच्च तणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे देखील मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो. या व्यतिरिक्त म्हातारपणाचा किंवा तरुणपणाचा परिणामही मासिक पाळीवर दिसून येतो. ज्या स्त्रियांचं वय 40 पेक्षा जास्त आहे त्यांना रजोनिवृत्ती पूर्वी मासिक पाळीमध्ये अनियमितता असू शकते. या व्यतिरिक् तरुण स्त्रियांमध्ये संप्रेरक बदलांमुळे देखील मासिक पाळीत विलंब होऊ शकतो. लठ्ठपणा जास्त असलेल्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी अनियमित असू शकते. बर्याच स्त्रियांमध्ये जास्त वजनांमुळे थायरॉईडची पातळी असंतुलित होऊ लागते, यामुळे मासिक पाळीवर परिणाम होतो. पोलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम पॉलिसिस्टिक अंडाशय सिंड्रोम हा गर्भाशयाचा रोग आहे ज्यामुळे मासिक पाळीमध्ये अनियमितता उद्भवते. काही आजारांमुळे मासिक पाळीत विलंब होऊ शकतो. गर्भनिरोधक औषधं myupchar.com शी संबंधित एम्सच्या डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांच्या मते, ज्या स्त्रिया बहुतेक गर्भनिरोधक गोळ्या वापरतात त्यांनादेखील मासिक पाळीशी संबंधित अनियमितता आढळते. वास्तविक गर्भ निरोधक गोळ्या शरीरातील संप्रेरकांवर परिणाम करतात. अनियमित मासिक पाळीवर हा आहे उपचार शिस्तबद्ध दिनक्रमाचं अनुसरण करा: मासिक पाळीच्या दिरंगाईची सर्व कारणं लक्षात ठेवून**,** नित्यक्रम आयोजित करणं**,** शिस्तबद्ध ठेवणं आणि तणाव मुक्त राहण्याचा प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे**.** नियमित व्यायाम करा आणि प्राणायाम करा आणि सकाळी फिरायला जा**,** जेणेकरून शरीरात पुरेसा प्राणवायू वाहू शकेल. प्रथिनं आणि जीवनसत्त्वंयुक्त आहार घ्या. पुरेशी झोप घ्या जेणेकरून आरोग्य चांगले राहील**.** वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा वजन वाढल्यास शरीराला अधिक इन्सुलिन तयार करण्याची आवश्यकता असते, ज्यामुळे मासिक पाळीत उशीर होतो. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा, यासाठी व्यायामासह वजन कमी करण्यात मदत करणारा आहार घ्या. डॉक्टरांचा सल्ला देखील आवश्यक शरीरात संप्रेरक बदलांमुळे बर्याचदा मासिक पाळीला उशीर होऊ शकतो. यासाठी डॉक्टर त्यावर योग्य उपचार करू शकतात. म्हणून अशी कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. योग्य समस्या तसंच योग्य उपचारांद्वारे डॉक्टर ही समस्या दूर करू शकतात. बर्याच वेळा महिला गर्भाशयाच्या संबंधित आजारांना समजण्यास असमर्थ असतात आणि मासिक पाळीच्या उशीराबद्दल काळजीत असतात. अशा परिस्थितीत डॉक्टर या समस्या समजून योग्य सल्ला देऊन यावर उपचार करण्यास मदत करू शकतात. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - मासिक पाळीच्या समस्या न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.