अभिनेता रणबीर कपूरने अनेक फिल्ममध्ये काम केलं, त्यासाठी त्याला पुरस्कारही मिळाले. मात्र तितकाच तो वादातही राहिला. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रणबीरबाबत चर्चा झाली होती.
रणबीर सर्वाधिक चर्चेत होता तो त्याच्या तीन फोटोंमुळे. हे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर खळबळ माजली होती.
या तीन फोटोंपैकी एक फोटो म्हणजे कतरिनासोबतचा. हा फोटो कुणीतरी गुपचूप काढला होता. यामध्ये दोघंही बीच लूकमध्ये दिसत आहेत. हा फोटो पाहून दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याचं सर्वांना पक्कं वाटलं मात्र या दोघांनीही याबाबत काही प्रतिक्रिया दिली नव्हती.
रणबीरचा असाच आणखी एक फोटो व्हायरल झाला होता तो पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसह. हा फोटो न्यूयॉर्कमधील एका रेस्टॉरंटबाहेरील असल्याचं सांगितलं जात होतं. ज्यामध्ये दोघंही स्मोकिंग करताना दिसले. हा फोटो समोर येताच दोघांनाही टीकेचा सामना करावा लागला. माहिरा खानने या टीकेला प्रत्युत्तरही दिलं होतं.
रणबीरचा तिसरा फोटो व्हायरल झाला होता तो संजू फिल्मचं शूटिंग करतानाचा. हा फोटो वादात नव्हता मात्र फोटोनो खळबळ मात्र माजवली होती. रणबीर हुबेहुब संजय दत्तसारखा दिसत असल्याने सर्वजण हैराण झाले. फक्त आपला लूक नाही तर बॉडी पॉश्चरदेखील संजय दत्तसारखंच होतं.