पुणे 13 जुलै : महिलांच्या रोजच्या आयुष्यात हँड बॅग्ज या महत्त्वाचा भाग बनला आहे. या बॅगमध्ये आवश्यक साहित्य तर बसतंच त्याचबरोबर चांगला लुकही मिळतो. एकापेक्षा जास्त हॅड बॅग्ज घ्यायच्या असतील तर त्याचं बजेट सांभाळणंही आवश्यक असते. पुण्यात तुम्हाला या बॅग्जची कमी किंमतीमध्ये खरेदी करता येईल, असं एक ठिकाण आम्ही सांगणार आहोत. फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या शिरोळे मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स खरेदी करता येतात. या ठिकाणी तुम्हाला अगदी दीडशे रूपयांपासून वेगवेगळ्या पर्स मिळतात. या पर्सच्या क्वालिटीमध्ये विविधता असून त्यानुसार किंमतीमध्येही फरक आहे.
कोणते प्रकार उपलब्ध? पर्समध्ये क्लचेस, पाऊच, फायबर पर्स, मेकअप बॅग, सॅक कम पर्स, हेवी डिझायनर पर्सेस या सारख्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या पर्स इथं मिळतात. त्याचबरोबर एखाद्या लग्नाच्या ठिकाणी किंवा इव्हेंटसाठी सुट होतील अशा हेवी लुकच्या पर्स देखील इथं अगदी पाचशे रूपयांपासून मिळतात. त्याचबरोबर लहान किचन ठेवण्यासाठी लागणारे छोटे पाऊच देखील इथं पन्नास रुपयांपासून खरेदी करता येतात. या मार्केटमध्ये काही पर्स कॉम्बो ऑफरमध्येही खरेदी करतात. 699 रुपयांमध्ये 3 किंवा 999 रुपयांमध्ये 5 या प्रकारच्या ऑफर इथं आहेत. कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरूणींसाठी पर्स, ऑफिसमध्ये जाणाऱ्यांसाठी लागणाऱ्या थोड्या मोठ्या पर्सही इथं मिळतात. महिलांना वेगवेगळ्या वस्तू पर्समध्ये ठेवण्याची सवय असते. त्यासाठी लागणाऱ्या मोठ्या आकाराच्या पर्सचेही इथं अनेक पर्याय आहेत. या प्रकारत 300 ते 800 रुपयांपर्यंत चांगल्या क्वालिटीच्या पर्स इथं उपलब्ध आहेत. 1000 रुपयांचं फेस मसाजर फक्त 200 रुपयांना, मेकअपचं इतकं स्वस्त साहित्य कुठे पाहिलंय का? हॅण्डबॅग्जमध्ये तुम्हाला अनेक स्टोरेज कंपार्टमेंट्स देण्यात आले आहेत. त्यामध्ये वॉलेट आणि मोबाईलसोबतच अनेक आवश्यक वस्तू सहज कॅरी करू शकता. या बॅग जास्त ड्यूरेबल आणि दिसायलाही स्टाइलिश आहेत . या बॅगमध्ये तुम्ही मोबाईल, चाव्या, पाकीट, एक्झिक्युटिव्ह डायरी, मेकअप सोबतच अनेक महत्त्वाच्या वस्तू ठेवू अगदी आरामात आणि सुरक्षित ठेवू शकता. औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही प्रसंगी या बॅग कॅरी करू शकता अशी माहिती विक्रेते नदीम शेख यांनी दिली