पुणे, 6 जुलै : महिलांसाठी शॉपिंग हा विषय अगदी जिव्हाळ्याचा आहे. शॉपिंगसाठी त्यांना कुठल्या सण उत्सवाची गरज नसते. एक छोटस कारण देखील पुरेसं असत. पुण्यामध्ये अशी अनेक ठिकाण आहेत जिथे तुम्हाला शॉपिंग करता येते. त्यामुळे लग्नापासून ते विविध समारंभासाठी सजून जाण्यासाठी लागणाऱ्या ज्वेलरीच्या मार्केट बद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या ठिकाणी तुम्ही वेगवगेळ्या प्रकारच्या ज्वेलरीची स्वस्तात खरेदी करू शकतात. कोणत्या प्रकारची मिळते ज्वेलरी? पुण्यातील रविवार पेठेत मनीष मार्केट आहे या ठिकाणी तुम्ही वेगवगेळ्या प्रकारच्या ज्वेलरीची खरेदी करू शकतात. या ठिकाणी ऑक्साइड ज्वेलरी, गोल्डन ज्वेलरी, होलसेल दरात मिळते. याच बरोबर मंगळसूत्र, बांगड्या, कानातले, डायमंडचे गळ्यातले, फॅन्सी क्लिप, क्लेचर हेअर ऍक्सीस, बांगड्या ब्रेसलेट, कानातले, ठुशी, अंगठ्या विविध प्रकार इथे पाहिला मिळतात. या ज्वेलरीची किंमत 5 रुपयांपासून ते 2000 रुपयापर्यंत आहे.
सर्वाना परवडेल अशा किमतीत ज्वेलरी तसेच मोती, कुंदन एंटीक, वेस्टर्न, टेम्पल ज्वेलरी, कॉस्मेटिक, ox ज्वेलरीची सुद्धा या ठिकाणी खरेदी करता येते. चांगल्या कॉलिटीची ज्वेलरी या ठिकाणी आहे. लग्न समारंभपासून ते रोजच्या वापरतील ज्वेलरी अगदीच सर्वाना परवडेल अशा किमतीत आहे. पुण्यातील ज्वेलरीसाठीच फेमस असलेलं हे मार्केट मनीष मार्केट आहे. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची ज्वेलरी पाहिला मिळते, असं व्यावसायिक प्रवीण कुमार यांनी सांगितलं.
कुठे आहे मनीष मार्केट? रविवार पेठ, लक्ष्मी नारायण मंदिर रोड, कापड गंज, गणेश पेठ, पुणे, महाराष्ट्र