हल्ली सगळ्यांनाच जंक फूड खायला आवडतं. पण, जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे आपल्या शरीराबरोबर आयुष्यावरही परिणाम होत असतो.
खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपलं आयुष्य कमी होऊ लागलेलं आहे. पिझ्झा आपल्या आयुष्यावर सर्वात जास्त परिणाम करतो. एका संशोधनानुसार पिझ्झाची एक स्लाईस खाण्यामुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य 7 ते 8 मिनिटांनी कमी होतं. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या तज्ज्ञांनी अन्नपदार्थां संदर्भात एक कॅल्क्युलेशन करून हा अंदाज लावलेला आहे.
बदाम खाण्याने आपलं आयुष्य वाढतं. रिपोर्टनुसार बदाम खाल्ल्यामुळे 26 मिनिटांनी आपलं आयुष्य वाढतं तर, पीनट बटर आणि जॅम सँडविच खाल्ल्यामुळे देखील अर्ध्या तासांनी आयुष्य वाढू शकतं.
केळं खाल्ल्यामुळे 13.8 मिनिटं, 3.5 मिनिटं टोमॅटोमुळे, आवोकाडोमुळे 2.8 मिनीटांनी आयुष्य वाढतं. याशिवाय सालमन फिश खाल्ल्यामुळे 16 मिनिटांनी आपलं आयुष्य वाढतं.
पिझ्झाची 1 स्लाइस आपल्या आयुष्याची 8 मिनिटं कमी करते तर, सॉफ्टड्रिंक 12 तासात 04 मिनिटांनी आपलं आयुष्य कमी करतात. याशिवाय बर्गर, प्रोसेस्ड मीट जास्त प्रमाणात खाणाऱ्यांच्या आयुष्यावरही परिणाम होतो.
जर्नल नेचर फूडमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार अमेरिकेमध्ये प्रति ग्रॅम प्रोसेस मटण खाल्ल्यामुळे जवळजवळ 0.4 मिनिटांनी आयुष्य कमी होतं. म्हणजे 1 हॉटडॉग सँडविच खाल्ल्यामुळे पोटात 61 ग्रॅम प्रोसेस्ड मीट जात असेल तर, त्या व्यक्तीचे आयुष्य 27 मिनिटांनी कमी होतं.
तज्ज्ञांच्यामते नैसर्गिक स्रोतांपासून मिळणारे पदार्थ जास्त पौष्टिक आणि आयुष्य वाढवणारे असतात. त्यामुळेच झाडांपासून मिळणारी फळं आणि भाज्या मधून मिळणारं प्रोटीन अॅनिमल बेस्ड प्रोटिनपेक्षा चांगला असतं.