मध्यपूर्वेतल्या या देशात एक अत्याधुनिक शहर उभं राहणार, जिथे ना रस्ता असेल, ना गाड्या!

मध्यपूर्वेतल्या या देशात एक अत्याधुनिक शहर उभं राहणार, जिथे ना रस्ता असेल, ना गाड्या!

सौदी अरेबियाचे (Saudi arebia) प्रिन्स (prince) एका अशा शहराची निर्मिती (New city) करण्याचा विचार करत आहे, जिथे ना गाडी असेल ना रस्ता (No Car Neither Road) असेल. Zero Carbon Emission City असेल ही.

  • Share this:

नियोम (सौदी अरेबिया), 11 जानेवारी: सौदी अरेबियाचे (saudi arebia) प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Prince Mohammed bin salman) हे आपल्या वेगवेगळ्या छंदासाठी ओळखले जातात. नैसर्गिक साधनसंपत्तीनं या देशांच्या पायाशी लोटांगण घातले आहे. त्यामुळे राजेशाहीत (Crown state) जगणाऱ्या या देशाकडे पैशांची कमी नाही. याच पैशाच्या जोरावर सौदी अरेबियाचा प्रिन्स एक अशा शहराची निर्मिती (New city) करण्याचा विचार करत आहे, जिथे ना गाडी असेल ना रस्ता असेल. या नवीन शहरात कार्बनचे उत्सर्जन झिरो असेल. भविष्यातील विविध समस्यांनी मात देण्याची आणि पर्यावरणपूरक जीवनशैली विकसित करण्याची क्षमता या शहरात असेल. हे शहर लाल समुद्राच्या किनारी वसवलं जाणार आहे.

नियोम प्रकल्पांतर्गत सुमारे 170 कि. मी. लांबीमध्ये शहर वसवण्याची प्रिन्सची योजना आहे. त्या या प्रकल्पाला 'द लाइन' असं नाव दिलं आहे. नियोम शहर वसवून तेलाने संपन्न असलेला सौदी अरेबिया हा देश स्वत: साठी तेल विरहीत भविष्य शोधण्याच्या तयारीत आहे. या शहराच्या बांधकामाला या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत सुरुवात होणार आहे, अशी माहिती स्वतः प्रिन्सने टेलव्हिजनच्या माध्यमातून दिली आहे.

10 लाख लोकांना पोसण्याची क्षमता या शहरात असेल

सौदी अरेबियातील नियोम या नवीन शहरात दहा लाख लोकांना राहता येणार आहे. या शहरात शाळा, आरोग्य केंद्रे आणि हिरवीगार वृक्षलागवड यांसारख्या सुविधा असणार आहेत. शिवाय या प्रकल्पाच्या माध्यमातून 3,80,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत पायाभूत सुविधांची उभारण्यासाठी जवळपास 100-200 अब्ज डॉलर्स इतका खर्च येईल, असंही प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सांगितलं.

नियोममध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक होईल

प्रिन्स पुढे म्हणाले की, नियोम शहरात हाय-स्पीड सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तयार केली जाईल. या शहराच्या विकासात आर्टीफिशियल इंटेलिजन्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. हे शहर 100 टक्के स्वच्छ ऊर्जाद्वारे चालवलं जाईल आणि येथील रहिवाशांसाठी प्रदूषणमुक्त, आरोग्यदायी आणि अधिक शाश्वत वातावरण तयार केलं जाईल. नियोम हे 26,500 चौरस किलोमीटर क्षेत्रात वसवलं जाईल. या शहराची सीमा जॉर्डन आणि इजिप्तला लागून असेल. एका अंदाजानुसार, सन 2030 पर्यंत हे शहर सौदी अरेबियाच्या जीडीपीमध्ये सुमारे 48 अब्ज डॉलर्सचे योगदान देईल.

Published by: News18 Desk
First published: January 11, 2021, 11:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading