
3 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर बोल्ड अभिनेत्री पूनम पांडेने (Poonam Pandey) बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसह (Sam Bombay) लग्न केलं. कोरोना काळातच 27 जुलैला साखरपुडा केला आणि सप्टेंबरमध्ये विवाहबद्ध झाले. मुंबईतील वांद्र्यातील आपल्या बंगल्यातच पूनमने आपलं लग्न आटोपलं. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@sambombay)

पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे फोटो टाकले. दोघंही नेव्ही ब्लू रंगाच्या वेडिंग ड्रेसमध्ये दिसले. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@sambombay)

पूनम पांडेने गुपचूप लग्न का केलं याचा खुलासा केला आहे. बॉम्बे टाइम्सशी बोलताना पूनम म्हणाली, कोरोना महासाथीत आपल्याला रोज वाईट बातम्या वाचायला मिळतात. त्यामुळे अशा परिस्थितीत थोडं आनंदाचं वातावरण निर्माण करावं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@sambombay)

मी आणि सॅम प्रसिद्ध कपलपैकी एक आहोत, कोव्हिड-19 ची परिस्थिती पाहता आम्हाला आमचा लग्न समारंभ सिक्रेट ठेवावा लागल्याचं पूनम म्हणाली. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@ipoonampandey)

वांद्र्यातील घरात कुटुंबं आणि काही जवळच्या मित्रांसह विवाहसोहळा पार पडल्याचं तिनं सांगितलं. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@sambombay)

एका शूटिंगवेळी सॅम आणि पूनमची भेट झाली होती. दोघंही एकमेकांना तीन वर्षांपासून ओळखतात. दोन वर्षे ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@sambombay)

आमच्या दोघांचं रिलेशन एका रोमँटिक बॉलिवूड फिल्मप्रमाणे आहे. मी सॅमवर प्रेम का केलं, याची यादी तयार करण्यासाठीच मला तीन महिने लागतील. आमच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी सारख्या आहेत. तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. आम्ही एकमेकांच्या इतके जवळ आहोत की एकमेकांच्या मनातलंही ओळखतो, असं पूनमने सांगितलं. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@ipoonampandey)




